एक्स्प्लोर
Toll Collection | 20 एप्रिलपासून टोल वसुली चालू होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आदेश जारी
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 20 एप्रिलपासून टोल वसुली चालू करण्याबाबत आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या भागात 20 एप्रिलपासून व्यावसायिक तसेच खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : देशात दुसऱ्यांदा 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 24 मार्चपासून 14 एप्रिलपर्यंतच्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आलं होतं. यामध्ये देशभरातील टोल देखील बंद केले होते. मात्र आता राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोलनाक्यांवर 20 एप्रिलपासून टोल वसुली चालू होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. काल, 17 एप्रिल रोजी प्राधिकरणाने हे आदेश जारी केले असून या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खासगी तसेच व्यावसायिक वाहनांकडून टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राष्ट्रीय महामार्गावरीलसर्व टोलनाक्यांवर 20 एप्रिलपासून टोल वसूली सुरु झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून ( MSRDC) देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) पावलावर पाऊल टाकत राज्यातल्या टोलवर वसुली सुरु केली जाण्याची शक्यता आहे.
घरी पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्यांना टोलनाक्यावर अन्न-पाणी पुरवा : नितीन गडकरी
कोरोना विषाणु आणि देशभरात लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक सेवा बंद केल्या आहेत. मात्र देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी 20 एप्रिलपासून सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील तसेच देशातील काही भागांमध्ये अटी शर्तींच्या अधीन राहून काही उद्योगधंद्यांना काम सुरु करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या अत्यावश्यक तसेच इतर काही वस्तुंची देखील ने-आण करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच मोठ्या प्रमाणात व्यावसायिक तसेच खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे 20 एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरु केला जाणार आहे. टोलच्या माध्यमातून मिळालेला कर हा सरकारी तिजोरीला हातभार लावतो. एनएचएआयला देखील यामुळं आर्थिक मदत होईल, असं पत्रात म्हटलं आहे.टोलमाफीचा निर्णय रद्द करा, आरटीआय कार्यकर्त्याची पंतप्रधानांकडे तक्रार
प्राधिकरणाच्या आधीच्या निर्णयानुसार 15 एप्रिलपासून ही टोलवसुली सुरु करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे 15 एप्रिलला पुन्हा टोल माफ करण्यासंदर्भातील अधिसूचना काढली होती.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement