Happy New Year 2021: ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमध्ये नववर्षाचं धुमधडाक्यात स्वागत, सेलिब्रेशनचे नयनरम्य फोटो पाहा
भारतात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक भव्य पद्धतीने सजविण्यात आला आहे.
जगभरातील लोक नवीन वर्षाच्या उत्सवांमध्ये मग्न असून सरत्या 2020 ला निरोप देत आहेत. लोक नवीन वर्षामध्ये समृद्धीची इच्छा करुन एकमेकांना संदेश पाठवत आहेत. 2021 मध्ये कोरोना साथीच्या आजारापासून लोकांची सुटका व्हावी अशी त्यांची इच्छा आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या घरात तुरुंगवास भोगावा लागला. 2021 जगातील काही देशांमध्ये सुरू झाले आहे.
सर्व प्रथम, नवीन वर्ष 2021 ची सुरुवात न्यूझीलंडमध्ये झाली. यानिमित्ताने तेथील लोकांनी फटाके फोडले आणि नवीन वर्षाचे स्वागत केले.
#WATCH | New Zealand rings in the New Year with fireworks show pic.twitter.com/1Pf2PTUmwj
— ANI (@ANI) December 31, 2020
यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये नवीन वर्ष 2021 चे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सिडनीच्या या चित्रामध्ये आपण पाहु शकतो की लोक नवीन वर्षाच्या स्वागतासाठी किती उत्साही आहेत. कोरोना काळात येथे अतिशय चांगल्या प्रकारे नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
#WATCH | Australia welcomes the New Year with fireworks show; visuals from Sydney (Courtesy: Reuters) pic.twitter.com/vaOq5l7zdQ
— ANI (@ANI) December 31, 2020 भारतात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रात्री वाजेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक भव्य पद्धतीने सजविण्यात आला आहे.Delhi: North Block and South Block illuminated on the eve of New Year. pic.twitter.com/IZPzAekVjE
— ANI (@ANI) December 31, 2020
ओडिशामध्ये कलाकार मानस कुमार साहू यांनी नवीन वर्षासाठी पुरीच्या गोल्डन बीचवर एक भव्य कलाकृती तयार केली आहे. त्यांनी वाळूवर 2021 लिहून नवीन वर्षाच्या शुभेच्छा कोरल्या आहेत. ही कलाकृती साकारण्यास त्यांना 7 तास लागले.
Odisha: Artist Manas Kumar Sahoo created sand art on the occasion of New Year at Golden Beach in Puri. "It took me nearly 7 hours to create this art," he says. pic.twitter.com/xTixZGcYkr
— ANI (@ANI) December 31, 2020