(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Income Tax Website : इन्कम टॅक्सच्या नव्या वेबसाईटवरील गोंधळांवरुन निर्मला सीतारमण भडकल्या, नंदन निलकेणी म्हणाले...
इन्फोसिस (Infosys) कंपनीने सोमवारी रात्री अर्थ मंत्रालयाच्या टॅक्स ई-फायलिंग पोर्टलचे लॉन्च केलं होतं. लॉन्चिंग झाल्यानंतर काही वेळातच या वेबसाईटवर तांत्रिक समस्या निर्माण झाली होती.
नवी दिल्ली : इन्फोसिस कंपनीकडून अर्थ मंत्रालयाच्या नव्या टॅक्स ई-फायलिंग वेब साईटचे लॉन्चिंग करण्यात आलं होतं. पण लॉन्चिंग झाल्यानंतर काही वेळेतच या वेबसाईटमध्ये समस्या निर्माण झाल्याने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही वेब साईट विकसित करणारी कंपनी इन्फोसिस आणि त्याचे सह-संस्थापक नंदन निलकेणी यांना लवकरात लवकर ही समस्या सोडवावी असा आदेश दिला.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, "या वेब साईटवरुन अनेक यूजर्सनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे यापुढे करदात्यांना देण्यात येणारी सुविधा प्रभावित होऊ नये. ई-फायलिंग पोर्टल 2.0 सोमवारी रात्री 8.45 वाजता लॉन्च केलं होतं. यात निर्माण झालेल्या समस्यांमध्ये इन्फोसिस आणि नंदन निलकेणी यांनी लक्ष घालावं आणि करदात्यांना गुणवत्तापूर्वत सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. करदात्यांना सुलभता देणं ही आपली प्राथमिकता असायला हवी."
The new e-filing portal will ease the filing process and enhance end user experience. @nsitharaman ji, we have observed some technical issues on day one, and are working to resolve them. @Infosys regrets these initial glitches and expects the system to stabilise during the week. https://t.co/LocRBPCzpP
— Nandan Nilekani (@NandanNilekani) June 8, 2021
The much awaited e-filing portal 2.0 was launched last night 20:45hrs.
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) June 8, 2021
I see in my TL grievances and glitches.
Hope @Infosys & @NandanNilekani will not let down our taxpayers in the quality of service being provided.
Ease in compliance for the taxpayer should be our priority. https://t.co/iRtyKaURLc
केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या या आदेशाला उत्तर देताना नंदन निलकेणी यांनी खेद व्यक्त केला आणि ही वेबसाईट लवकरच सुरळीत होईल असा विश्वास दिला. त्या आधी सहा दिवस ही वेव साईट बंद करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या :
- Corona Vaccination : घरोघरी नाही मात्र, घराजवळ नक्कीच लसीकरण शक्य; मुंबई उच्च न्यायालयात केंद्राकडून प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टीकरण
- पूर्व लडाखजवळील LAC नजीक चीनच्या युद्धाभ्यास, भारतीय सैन्याची करडी नजर
- Centre on Vaccination Price : केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयात लसीच्या किंमती निश्चित; नव्या किमती काय असणार?