एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रस्ते अपघात टाळण्यासाठी 3D झेब्रा कॉसिंग
![रस्ते अपघात टाळण्यासाठी 3D झेब्रा कॉसिंग New Delhi Municipal Council Planning On Expanding Its 3d Zebra Crossing Project रस्ते अपघात टाळण्यासाठी 3D झेब्रा कॉसिंग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/20024017/Zebra-Crossing.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : गेल्या वर्षी जुलै महिन्यात दिल्लीतील राजाजी मार्गावर 3D झेब्रा क्रॉसिंगचा प्रयोग करण्यात आला. त्यानंतर अशाच प्रकारे सफदरजंग रोडवरही 3D मध्ये झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आले. आता नवी दिल्ली नगरपरिषदेने या संकल्पनेचा आणखी विस्तार करण्याचे ठरवले असून, लवकरच विज्ञान भवनाबाहेरही 3D झेब्रा क्रॉसिंग दिसेल.
वाहनांचा वेग कमी व्हावा आणि पादचाऱ्यांना नीट रस्ता ओलांडता यावा, यासाठी झेब्रा क्रॉसिंगची मदत होते. मात्र, झेब्रा क्रॉसिंगवरच गाडी उभी करणाऱ्यांची किंवा झेब्रा क्रॉसिंगकडे कानाडोळा करत भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी 3D झेब्रा क्रॉसिंगची कल्पना पुढे आली. परदेशात ही संकल्पना नवीन नाही. मात्र, भारतात दिल्लीत असा प्रयोग करण्यात येतो आहे.
झेब्रा क्रॉसिंग दिसल्यावर वाहनांनी वेग कमी करावा, जेणेकरुन अपघात टळतील, यासाठी 3D झेब्रा क्रॉसिंगची संकल्पना अंमलात आणली आहे, असे नवी दिल्ली नगरपरिषदेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय, राजाजी मार्ग आणि सफदरजंग मार्गावरील 3D झेब्रा क्रॉसिंगचा परिणाम चांगला झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
2017-2018 च्या अर्थसंकल्पात नवी दिल्ली महापालिका क्षेत्रातील अत्यंत संवेदनशील आणि उच्चभ्रू असलेल्या भागातील 130 किमी रस्त्यांना स्मार्ट करण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेचे अध्यक्ष महापौर नरेश कुमार यांनी सांगितले. विशेष म्हणजे सायकलिंग ट्रॅक, झेब्रा क्रॉसिंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून या 130 किमी रस्त्याला स्मार्ट केले जाणार आहे.
जनपथ मार्ग, अशोका मार्ग आणि राष्ट्रपती भवनाबाहेरील मार्गांवरही 3D झेब्रा क्रॉसिंग तयार केले जाणार आहेत. दिल्ली स्ट्रीट आर्टकडून येत्या दोन ते तीन महिन्यात झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यास सुरु केली जाणार आहे.
![रस्ते अपघात टाळण्यासाठी 3D झेब्रा कॉसिंग](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/20024017/Zebra-Crossing-1-580x395.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नागपूर
विश्व
वर्धा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)