(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NEET PG 2023 परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; अशी करा नोंदणी
उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून NEET PG 2023 अधिसूचना डाउनलोड करू शकतात. नोंदणी लिंक अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वर देण्यात आलेली आहे
NEET PG 2023: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (National Board of Examinations in Medical Sciences (NBEMS)) ने आज राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा पदव्युत्तर (NEET PG) 2023 साठी अधिसूचना जारी केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइटवरून NEET PG 2023 अधिसूचना डाउनलोड करू शकतात. नोंदणी लिंक अधिकृत वेबसाईट natboard.edu.in वर देण्यात आलेली आहे. NBEMS नं 5 मार्च 2023 रोजी मास्टर ऑफ सर्जरी (MS), डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD) आणि PG डिप्लोमा अभ्यासक्रमांसाठी NEET PG परीक्षा आयोजित करण्याची घोषणा केली होती.
या अधिसूचनेनुसार अर्ज करण्याची प्रक्रिया आज 7 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजल्यापासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी, रात्री 11:55 पर्यंत आहे. परीक्षा मंडळाकडून 3 जानेवारी रोजी अर्ज फॉर्म दुरुस्ती विंडो उघडली जाणार आहे, जी 3 फेब्रुवारीपर्यंत खुली राहील. छायाचित्र अपडेट करण्यासाठी एक अतिरिक्त विंडो 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना प्रदान केली जाणार असल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे.
NEET PG 2023: नोंदणी कशी करावी
स्टेप 1: NBEMS च्या अधिकृत natboard.edu.in वेबसाइटला भेट द्या
स्टेप 2: होम पेजवर उपलब्ध असलेल्या NEET-PG 2022 लिंकवर क्लिक करा
स्टेप 3: एक दुसरी विंडो ओपन होईल, उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करावी
स्टेप 4: आवश्यक माहितींसोबर आपला अर्ज भरा
स्टेप 5: आवश्यक पेमेंट करा
स्टेप 6: पुढील गरजांसाठी भरलेला फॉर्म डाउनलोड करुन ठेवा
NEET PG 2023 परीक्षेसाठी प्रवेशपत्र 27 फेब्रुवारी रोजी जारी केले जाणार आहे. 5 मार्च रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या वेळेत परीक्षा घेतली जाईल. 31 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
परीक्षा 05 मार्च रोजी तर 31 मार्च 2023 रोजी निकाल
NEET PG 2023 ची परीक्षा 05 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर 31 मार्च 2023 रोजी निकाल जाहीर केला जाईल. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एम्स (AIIMS), पीजीआयएमईआर (PGIMER), निमहांस (NIMHANS), एससीटीआईएमएसटी (SCTIMST) आणि जिपमर (JIPMER) वगळता भारतातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये MD, MS किंवा पदव्युत्तर डिप्लोमा कोर्सेसमध्ये प्रवेश मिळेल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI