NEET-UG Exam 2022 : 'नीट' परीक्षा 17 जुलैला तर 2 एप्रिलपासून रजिस्ट्रेशन सुरू
NTA च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार NEET-2022 परीक्षेचे नोटिफिकेशन आज जारी करण्याची शक्यता आहे
NEET-UG Exam 2022: मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या 'नीट -2022' राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेचे (National Eligibility Cum Entrance Test) आयोजन 17 जुलैला करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी ऑनलाई रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) या संदर्भातील माहिती आज जाहीर करण्याची शक्यता आहे.
NTA च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार NEET 2022 परीक्षेचे नोटिफिकेशन आज neet.nta.nic.in या संकेतस्थळावर जाहीर करण्याची शक्यता आहे. मेडिकल आणि डेंटल अंडर ग्रॅज्युएट प्रवेशी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
NEET 2022 परीक्षेचे अधिकृच वेळापत्रक NTA तर्फे nta.ac.in आज जाहीर करण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी 7 मे पर्यंत यूजी-नीट परीक्षा 2022 परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. त्यानंतर पाच दिवसांसाठी करेक्शन विंडो खुली करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अचूक माहितीसाठी nta.ac.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यूजी नीट परीक्षा (NEET-UG 2022) परीक्षेचे आयोजन ऑफलाईन करण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या परीक्षेचे आयोजन 13 भाषांमध्ये केले जाणार आहे. यामध्ये इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेचा समावेश आहे. या शिवाय भारतात वापरल्या जाणाऱ्या आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मराठी, मल्याळम, ओडिसा, पंजाबी, तामिळ आणि तेलगु भाषेत देखील परीक्षा होणार आहे.
31 डिसेंबर 2022 पर्यंत 17 वर्षे पूर्ण झालेले सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहे. 2021 मध्ये 16,14,777 विद्यार्थ्यांनी नीट-यूजी परीक्षा (NEET-UG exam) परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 95.6 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांपैकी 8,70,074 म्हणजे 56.04 टक्के विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र ठरले.
संबंधित बातम्या :
MPSC Result 2022: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, 6567 उमेदवारांची झाली निवड; 'या' दिवशी होणार मुख्य परीक्षा
Kolhapur : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तपासणीसाठी आलेले दहावीचे पेपर परत पाठवले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI