एक्स्प्लोर
दिल्लीत ओबीसी महासंघाचं राष्ट्रीय अधिवेशन
ओबीसींच्या प्रश्नांवर राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी दिल्लीत महाअधिवेशन बोलावण्यात आलं आहे. 7 ऑगस्ट 1990 या दिवशी देशात मंडल आयोग लागू झाला होता. त्या अनुषंगाने आजच्या दिवशी हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनाला दिल्लीत सुरूवात झाली आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर राज्य आणि केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यासाठी महाअधिवेशन बोलावण्यात आलं आहे. राज्य आणि केंद्रातले सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थिती लावणार आहेत.
महाराष्ट्रातून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, अनंत गीते, खासदार नाना पटोले, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांची उपस्थिती असेल. 7 ऑगस्ट 1990 या दिवशी देशात मंडल आयोग लागू झाला होता. त्या अनुषंगाने आजच्या दिवशी हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं आहे.
प्रमुख मागण्या :
- ओबीसींची तातडीने जणगणनेनुसार लोकसंख्या जाहीर करावी
- ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय
- मंडल आयोग, नच्चीपन कमिटीच्या शिफारशी लागू कराव्यात
- ओबीसी क्रिमीलेअरला लावलेल्या चुकीच्या अटी तातडीने रद्द कराव्यात
- ओबीसी प्रवर्गाला अट्रोसिटी कायद्याचं संरक्षण मिळावं
- ओबीसींना पदोन्नतीमधे आरक्षण मिळावं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement