एक्स्प्लोर
चांगलं काम केलंत, तर 2019 मध्ये खासदारकी, मोदींची तंबी
सुधारणा न केल्यास 2019 मध्ये तुम्हाला पाहून घेईन, अशा शब्दात मोदींनी खासदारांना दटावलं.
![चांगलं काम केलंत, तर 2019 मध्ये खासदारकी, मोदींची तंबी Narendra Modi Takes Class Of Bjps Loksabha And Rajyasabha Mp Latest Update चांगलं काम केलंत, तर 2019 मध्ये खासदारकी, मोदींची तंबी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/08/01204412/Narendra-Modi-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : 2019 पर्यंत तुम्ही खासदार आहात. पण त्यानंतरही तुम्हाला संसदेत दिसायचं असेल तर चांगलं काम करा, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या सर्वच खासदारांना ताकीद दिली आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह हे राज्यसभेच्या सदस्यपदी निवडून आल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचं पेढा भरवून कौतुक केलं.
भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींनी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांचा क्लास घेतला. याशिवाय गैरहजर राहणाऱ्या खासदारांनाही त्यांनी तंबी दिली. सुधारणा न केल्यास 2019 मध्ये तुम्हाला पाहून घेईन, अशा शब्दात मोदींनी खासदारांना दटावलं.
अमित शाह आता राज्यसभेत येणार असल्यामुळे राज्यसभेतल्या खासदारांवरही त्यांचं बारकाईनं लक्ष असेल, असं म्हणत त्यांनी अमित शाह यांचं तोंडभरुन कौतुक केलं.
मोदी काय म्हणाले?
- तुम्ही खासदार स्वत:ला काय समजता ?
- तुम्ही काहीच नाही, हे कधी कळणार ?
- जे काय आहे ते फक्त भाजप आहे.
- वारंवार व्हीप बजाण्याची गरज का पडते ?
- सभागृहात हजर राहण्यासाठी सारखं का सांगावं लागतं ?
- ज्याला जे करायचं ते करा, मी 2019 मध्ये पाहून घेईन.
- आता राज्यसभेत नवीन सभापती आले आहेत.
- तुमची मौजमस्ती करण्याची लक्षणे बंद करणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)