Narendra Modi : ट्रम्प म्हणाले वॉशिंग्टनला या, जेवण करुयात, चर्चा करुयात, परंतु मी त्यांना नकार दिला; मोदींनी सांगितलं अमेरिकेला न जाण्यामागचं कारण
Narendra Modi Speech : गेली कित्येक दशके मागास असलेला ओडिसा आता विकासाच्या मार्गावर असून इथल्या गरिबांना आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

मुंबई : G7 देशांच्या बैठकीला गेलो असता अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा फोन आला. अमेरिकेला या, आपण जेवण करुयात, चर्चा करुयात असे ते म्हणाले. परंतु मला महाप्रभूंची धरती ओडिशाला यायचं होते. त्यामुळे मी ट्रम्प यांचे निमंत्रण नाकारलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ओडिशाच्या लोकांचे प्रेम आणि महाप्रभूच्या भक्तीमुळे मी ओडिशाकडे ओढलो गेलो असंही ते म्हणाले. नरेंद्र मोदी हे ओडिशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी एका सभेला संबोधित करताना हा किस्सा सांगितला.
कॅनडाच्या अल्बर्टा प्रांतात तीन दिवसांची जी सेव्हन शिखर परिषद पार पडली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या शिखर परिषदेला पाहुणे राष्ट्र म्हणून उपस्थिती लावली. या काळात त्यांनी अनेक जागतिक नेत्यांना भेट घेतली. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेतली.
जनसेवा और जनविश्वास को समर्पित सरकार की पहली वर्षगांठ पर ओडिशा के सभी परिवारजनों का वंदन-अभिनंदन। आपकी आकांक्षाओं पर खरा उतरने के लिए डबल इंजन सरकार दिन-रात मेहनत कर रही है। जय जगन्नाथ! https://t.co/G7sSPPOSMh
— Narendra Modi (@narendramodi) June 20, 2025
ओडिशाची परिस्थिती बदलली
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "गेल्या 60 वर्षांपासून देशवासियांनी काँग्रेसचे मॉडेल पाहिले. त्यामध्ये ना विकास होता ना सुशासन होते. लोकांचे जीवन वेदनेने आणि कष्टाने भरलेले होते. विकासाच्या योजना थांबल्या होत्या. सर्वाधिक भ्रष्टाचार हेच काँग्रेसचे मॉडेल होतं. परंतु गेल्या काही दिवसांपासून भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर देशाने विकासाचं मॉडेल पाहिलं. देशातील अनेक राज्ये अशी होती की त्या ठिकाणी पहिल्यांदाच भाजपचं सरकार सत्तेत आलं. त्या राज्यांमध्ये फक्त सरकारच बदललं नाही तर त्या ठिकाणची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलली."
डबल इंजिन सरकारमुळे ओडिशाला फायदा
ओडिशा गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सोईसुविधांसाठी झगडताना दिसतोय. पण आता डबल इंजिन सरकारमुळे ओडिशाला फायदा होणार आहे असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, "ओडिशामध्ये गरीब आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं काहीच मिळत नव्हतं. भ्रष्टाचार आणि लाल फितीचा कारभार हीच ओडिशाची ओळख बनली होती. विकासाच्या मार्गावर ओडिशा कोसो दूर होता. पण आता या ठिकाणी भाजपचे सरकार सत्तेत आलं आहे. गेल्या वर्षभरात भाजपने या ठिकाणी पारदर्शक कारभार करत विकास करण्यास सुरुवात केली आहे."
ही बातमी वाचा:























