Ganesh Chaturthi : सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान मोदी, मराठमोळ्या पद्धतीने केलं गणेशाचं पूजन
Narendra Modi Meets CJI DY Chandrachud : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली आणि आरती केली.
नवी दिल्ली : राज्यासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सामाजिक असो वा राजकीय किंवा सर्वसामान्य व्यक्ती, सर्वांमध्येच गणेशोत्सवाचा उत्साह दिसतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदीही गणपती पूजनामध्ये सामील होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीनं नरेंद्र मोदींनी बाप्पाची आरती केली.
Prime Minister Narendra Modi attended Ganpati Poojan at the residence of Chief Justice of India DY Chandrachud, in Delhi. pic.twitter.com/HcFEd2dVXF
— ANI (@ANI) September 11, 2024
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या निवासस्थानी भेट दिली होती. तेथेही पंतप्रधानांनी गणपतीपुजेत सहभाग घेतला होता. बुधवारी पंतप्रधानांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सरन्यायाधीशांनी कुटुंबासह त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पीएम मोदींनी बाप्पाची आरती केली. यावेळी अतिशय भक्तीमय वातावरण दिसून आले.
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. हा 10 दिवसांचा उत्सव अनंत चतुर्दशीला संपतो. या निमित्ताने लोक घरोघरी गणपतीची पूजा करतात. ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत बाप्पाला घरी आणून पूजा करतात. यावेळी 7 सप्टेंबर पासून गणेश चतुर्थीला हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
PM Modi At CJI Chandrachud Home: मोंदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी घतलं बाप्पाचं दर्शन#PMNarendraModi #dhananjayachandrachud #ganeshotsav2024 #abpmajha pic.twitter.com/1RrfMKJBLX
— ABP माझा (@abpmajhatv) September 11, 2024
संजय राऊतांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीशांच्या घरी भेट दिल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर टीका केली आहे.
संविधान के घर को आग लगी
— Sanjay Raut (@rautsanjay61) September 11, 2024
घरके चिरागसे….
१) EVM को क्लीन चीट
२) महाराष्ट्र में चलरही संविधान विरोधी सरकार के सुनवाई पर ३ सालसे तारीख पे तारीख
३) प. बंगाल बलात्कर मामले मे suemoto हस्तक्षेप लेकीन
महाराष्ट्र रेप कांड का जिकर नहीं.
४) दिल्ली मुख्यमंत्री केजरीवाल के
bail पर तारीख पे… https://t.co/jzVpQqDQh3
ही बातमी वाचा: