Namastey Trump LIVE UPDATES | प्रेमाचं प्रतीक ताजमहलला डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नीसह भेट

डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनर देखील असणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 24 Feb 2020 05:42 PM
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प ताजमहल येथे दाखल, मुलगी इवांकाही उपस्थित


चांद्रयान मोहिमेचा उल्लेख करत अवकाश संशोधनात भारताला सहकार्य करण्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं आश्वासन
भारत आणि अमेरिका एकत्र येऊन दहशतवादाचा मुकाबला करु : डोनाल्ड ट्रम्प
महात्मा गांधींविषयी मनात आदरभाव : डोनाल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आग्रा येथे आगमन, प्रेमाचं प्रतीक असलेल्या 'ताजमहल'ला भेट देणार
पंतप्रधान मोदी देशासाठी स्तुत्य काम करत आहेत, मोदींच्या नेतृत्त्वात भारताची अनेक क्षेत्रात प्रगती : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
भारताविषयी आमच्या मनात विशेष प्रेम, आम्हाला भारताबद्दल गर्व आहे, भारताने जगाला मानवतेचा धडा दिला : डोनाल्ड ट्रम्प
मोटेरा स्टेडियममधून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लाईव्ह
LIVE UPDATES : 'नमस्ते ट्रम्प' म्हणत मोदींकडून ट्रम्प यांचं स्वागत
LIVE TV | ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे द्विपक्षीय संबंध दृढ : नरेंद्र मोदी
मोटेरा स्टेडियममधून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाईव्ह
मोटेरा स्टेडियममध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोटेरा स्टेडियममध्ये दाखल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी उपस्थित

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मोटेरा स्टेडियममध्ये पोहोचले. थोड्याच वेळात 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाला सुरुवात होणार

डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमाहून मोटेरा स्टेडियकडे रवाना; थोड्याच वेळात 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाला सुरुवात होणार



'माझे प्रिय मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी... धन्यवाद, अप्रतिम भेट!' ; साबरमती आश्रमातील अभिप्राय पुस्तिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलं आपलं मत

डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमाहून मोटेरा स्टेडियकडे रवाना झाला आहे.

डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमात पोहोचले असून तिथे त्यांनी चरखादेखील चालवला आहे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमातील चरखा चालवला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी साबरमती आश्रमातील चरखा चालवला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल झाले असून ते साबरमती आश्रमला भेट देणार आहेत. ट्रम्प साबरमती आश्रमात पोहोचले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल, मोदींनी गळाभेटे घेऊन केलं स्वागत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल, मोदींनी गळाभेटे घेऊन केलं स्वागत
डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत करण्यासाठी पंतप्रधान मोदी विमानतळावर दाखल. प्रोटोकॉल मोडून मोदी ट्रम्प यांचं स्वागत करणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल झाले असून अहमदाबाद येथील विमानतळावर ट्रम्प यांचं विमान दाखल

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात दाखल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर दाखल

आम्ही भारतात येण्यासाठी उत्सुक आहोत. रस्त्यात असून अवघ्या काही तासांतच आम्ही सर्वांना भेटणार आहोत : डोनाल्ड ट्रम्प

अहमदाबादसोबतच डोनाल्ड ट्रम्प उत्तर प्रदेशातील आग्रातही राष्ट्रपती ट्रम्प यांचं स्वागत करण्यात येणार आहे. त्यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यावर ट्रम्प यांच्या स्वागताच्या पोस्टर्ससोबतच अमेरिकेचे राष्ट्रध्वजही लावण्यात आले आहेत. दरम्यान, ट्रम्प ताजमहाल पाण्यासाठी आग्र्यात जाणार आहेत.
ज्या रस्त्यावरून ट्रम्प यांचा ताफा जाणार आहे. त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेटिंग करण्यात आलं आहे. बॅरिकेट्सच्या आतील बाजूस लोक उभे असणार आहेत. लोकांसाठी मोठ्या एलईडी स्क्रिन लावण्यात आल्या आहेत. एवढचं नाहीतर अहमदाबादच्या रस्त्यांच्या दुतर्फा ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पोस्टर्सही लावण्यात आले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत. ट्रम्प यांचा दौरा भारत दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आमदार रोहित पवार सांगितलं. ते म्हणाले की, डोनाल्ड ट्रम्प यांचा दौरा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आर्थिक अडचण सोडवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष येणार आहेत ही स्वागतार्ह बाब आहे. भारत निर्यात देश कसा बनेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. भारतीय मोठ्या प्रमाणात अमेरिकेत राहतात, त्यांना व्हिसाच्या खूप अडचणी येत असतात. अमेरिकेच्या अध्यक्षांनी मुंबई दौऱ्यावर यायला हवं होतं, याचा महाराष्ट्रासाठी फायदा झाला असता.
डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणाले आहेत की, "भारत तुमची वाट पाहत आहे. तुमचा दौरा निश्चितपणे आपल्या राष्ट्रांमधील मैत्री आणखी मजबुत करणारा असेल. लवकरच अहमदाबादमध्ये भेटू"

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमच्या बाहेर पिण्याच्या पाण्यासाठी एकूण 16 स्पॉट तयार करण्यात आले आहेत. स्टेडियममध्ये 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमासाठी येणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मोटेरा स्टेडियममधील ट्रम्प यांच्या कार्यक्रमासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. 25 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये 10 हजारपेक्षा जास्त सुरक्षाकर्मी तैनात करण्यात आले आहेत. यादरम्यान अमेरिकेच्या सीक्रेट सर्विसचे एजंट्सचे अधिकारीही उपस्थित असणार आहेत.

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मोटेरा स्टेडियमच्या बाहेर बीएसएफची कॅमल रेजिमेंट सलामी देणार आहे. राजस्थानच्या सीमेवर तैनात असणाऱ्या रेजिमेंटची तुकडी अहमदाबादमध्ये पोहोचली आहे.
अहमदाबादमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रोड शोच्या मार्गावर 28 मंच उभारण्यात आले आहेत. त्या मंचांवर देशभरातील 28 राज्यांच्या विविधतेचं दर्शन घडणार आहे. डोनाल्ड ट्रम्प गांधीजींच्या जीवनशैलीचा अनुभव घेण्यासाठी साबरमती आश्रमालाही भेट देणार आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पने आपल्या मागील भारत दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये इवांकासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदीही आहेत.

डोनल्ड ट्रम्प स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी साडेअकरा वाजता विमानतळावर उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि लष्करातील तीनही दलांचे प्रमुख उपस्थित असणार आहेत.
भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना झाले आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन काल रात्री ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलं आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता डोनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचणार आहेत.

पार्श्वभूमी

अहमदाबाद : भारत दौऱ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना झाले आहेत. वॉशिंग्टनमधल्या एअर बेसवरुन काल रात्री ट्रम्प यांच्या विमानानं उड्डाण घेतलं आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता डोनल्ड ट्रम्प अहमदाबादला पोहोचणार आहेत. हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबादमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते 22 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत आणि मोटेरा क्रिकेट स्टेडियममधील 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमात मोदींसोबत जनसभेला संयुक्तरित्या संबोधित करणार आहेत. याचसोबत डोनाल्ड ट्रम्प साबरमती आश्रमलाही भेट देणार आहेत.



डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दौरा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प, त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इव्हांका ट्रम्प आणि जावई जेरेड कुशनर देखील असणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज झालं आहे. विमानतळ ते मोटेरा स्टेडियम पर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी नमस्ते ट्रम्पचे बॅनर लावण्यात आले आहेत. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. ट्रम्प यांचं आलिशान आणि शाही स्वागत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगाच्या नजरा उद्या भारताकडे लागणार आहेत.


Namaste Trump | भारत दौऱ्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सहकुटुंब रवाना; कसे असतील ट्रम्प यांचे देशातील 36 तास


मोदी आणि ट्रम्प यांचा रोड शो


अहमदाबाद विमानतळावर पोहोचल्यावर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं भव्य स्वागत केलं जाणार आहे. जिथे मोदी आणि ट्रम्प रोड शो करणार आहेत. अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोड शोनंतर ट्रम्प आणि मोदी मोटेरा येथे असलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत. ट्रम्प यांच्या रोड शोला अहमदाबाद महानगरपालिकेने 'इंडिया रोड शो' असं नाव दिलं आहे. रोड शोमध्ये कार्यक्रम सादर करण्यासाठी जवळपास सर्व राज्यांमधून कलाकारांना आमंत्रण देण्यात आलं आहे. रोड शोनंतर मोदी आणि ट्रम्प 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमासाठी मोटेरा स्टेडियममध्ये पोहोचतील, जिथे ते लाखो लोकांना संबोधित करतील. मोटेरामध्ये उभारण्यात आलेलं क्रिकेट स्टेडियम जगातील सर्वात मोठं स्टेडियम आहे. ज्यामध्ये एक लाख दहा हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.


राष्ट्रपती ट्रम्प यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी


अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी भारतात जय्यत तयारी सुरू आहे. उद्या म्हणजेच, 24 फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर येणार आहेत. उद्या भारतात अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प 11 किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत. हा रोड शो खास करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. रोड शोसाठी रस्त्यामध्ये 28 स्वागत मंच तयार केले आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रदेशातील लोक कलाकार आपल्या कला सादर करणार आहेत. तसेच अनेक विद्यार्थीदेखील या रोडशोसाठी उत्सुक आहेत.


Namaste Trump | ट्रम्प यांच्या स्वागतासाठी असलेला मोटेरा स्टेडियमजवळील गेट कोसळला


ट्रम्प यांच्यासोबत मुलगी आणि जावईदेखील भारत दौऱ्यावर


डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीसोबत आता मुलगी इवांका ट्रम्प आपल्या पतीसह भारत दौऱ्यावर येणार आहेत. इवांका ट्रम्पचा हा दुसरा भारत दौरा असणार आहे. याआधी इवांका 2017मध्ये हैदराबादमधील ग्लोबल बिजनेस समिटमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. परंतु, डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.


पाहा व्हिडीओ : डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी खास जेवणाची सोय, सोन्या-चांदीच्या ताटात जेवण




हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शहरात गस्त घालणार


ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे हेलीकॉप्टरमार्फत संपूर्ण शहरात चोख बंदोबस्त असणार आहे. तसेच अमेरिकन स्नायपर्स, सीसीटिव्ही यांमार्फत नजर ठेवण्यात येणार आहे. एवढचं नाहीतर संपूर्ण शहरावर हेलिकॉप्टरच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे. अहमदाबादमध्ये 11 हजारपेक्षा अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पीएम मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प साबरमती नदीवर काही वेळ थांबणार असल्याचीही माहिती मिळत आहे.


कसा असेल ट्रम्प यांचा भारत दौरा :


24 फेब्रुवारीचा कार्यक्रम


अमेरिकी राष्ट्रपतींसह त्यांचे कुटुंब 24 फेब्रुवारीला सकाळी 11.40 वाजता अहमदाबादमध्ये येणार आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहेत.
अहमदाबाद शहरात ट्रंप यांचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे.
12.15 वाजता ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे.
01.05 वाजता जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करतील आणि या भव्य कार्यक्रमानंतर ट्रम्प मोटेरा स्टेडियममध्ये लाखो जणांना संबोधित करतील.
03.30 वाजता अहमदाबाद येथील नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमानंतर ट्रम्प कुटुंब ताजमहल पाहण्यासाठी 24 फेब्रुवारी रोजी आगरा येथे दाखल होणार आहे.
4.45 वाजता आग्र्याला पोहोचतील.
05.15 वाजता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे.
ताजमहलकडे जाणाऱ्या रस्त्यावर शालेय मुलं आणि दिल्लीकर ट्रम्प यांच्या स्वागतासाठी उभी असतील... सोबतच ३ हजार कलाकार वाटेत नृत्यही सादर करणार आहेत. या कलाकारांना युपीहून आमंत्रित केलं आहे.
06.45 ला निघून 7.30 ला दिल्लीला पोहोचतील.

25 फेब्रुवारीचा कार्यक्रम

सकाळी 10.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत
सकाळी .10.30 महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन करतील
सकाळी 11.00 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल.
दुपारी 12.40 महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होतील त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल.
संध्याकाळी 7.30 वाजता राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींसह चर्चा पार पडेल

संबंधित बातम्या : 

Namaste Trump | कार्यक्रम खासगी संस्थेचा, मग सरकारकडून कोट्यवधींचा खर्च का? : काँग्रेस

डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा; भारतीय सैन्य दलही स्वागतासाठी सज्ज

India-US | भारत आणि अमेरिकेच्या अध्यक्ष भेटीचा इतिहास

डोनाल्ड ट्रम्प झाले 'बाहुबली फॅन'; शेअर केला 'हा' व्हिडीओ

'नमस्ते इवांका'; डोनाल्ड ट्रम्पसोबत इवांका ट्रम्पही येणार भारतात

Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर

डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.