एक्स्प्लोर

Assembly Elections 2023 : नगालँड-त्रिपुरा-मेघालयात मोतमोजणी, त्याआधी जाणून घ्या Exit Poll

Assembly Elections 2023 Exit Polls : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे.

Assembly Elections 2023 Exit Polls : मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. त्रिपुरामध्ये 16 फेब्रुवारी रोजी 88 टक्के मतदान झाले होते. तर मेघालय आणि नागालँडमध्ये 27 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. नागालँडमध्ये 84 टक्के तर मेघालयमध्ये 76 टक्के मतदान झाले होते. आज तिन्ही राज्यात मतमोजणी होणार आहे. या राज्यात सत्तांतर होणार की सत्ताधारी पक्ष कायम राहणार, हे मतपेट्या उघडल्यानंतर स्पष्ट होईल. पण त्याआधी तिन्ही राज्यांचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत.  या राज्यात कुणाचे सरकार होतेय?, मतदारांचा कौल काय? याबाबत जाणून घेऊयात.. 

त्रिपुरात कुणाची सत्ता येणार ? 

त्रिपुरात 60 विधानसभा जागांसाठी मतदान झाले होते. सत्ता स्थापन करण्यासाठी 31 जागांची गरज आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार त्रिपुरामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळत आहेत. त्रिपुरात भाजपला 36 ते 45 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर टीएमपी (टिपरा मोथा) ला 9-16 जागा, लेफ्ट+काँग्रेस यांना 6-11 जागा मिळण्याची शक्यता आहे. अन्य अथवा अपक्षाला एकही जागा मिळत नसल्याचे एक्झिटमध्ये सांगण्यात आले आहे.  टाइम्‍स नाऊ ईटीजीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला 21-27 जागा मिळू शकतात. तर लेफ्ट+ ला 18-24, टीएमपीला 12-17 जागा मिळू शकतात. बहुतेक सर्वच एक्झिट पोलनुसार, त्रिपुरात भाजपचं सरकार येऊ शकतं. 

 नागालँडमध्ये भाजप-एनडीपीपीला बहुमत?

नागालँड विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-एनडीपीपी यांच्या युतीला मोठा विजय मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया च्या एक्झिट पोलनुसार, भाजप-एनडीपीपी युतीला 38-48 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर एनपीएफला 3-8 जागा मिळू शकतात. काँग्रेसला एक ते दोन जागा मिळू शकतात. अन्य अथवा अपक्ष पाच ते 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. टाइम्‍स नाऊ ईटीजीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप-एनडीपीपीला 39-49 जागा मिळू शकतात. एनपीएफला 4-8 जागांवर विजय मिळतोय. तर काँग्रेसला एकही जागा मिळत नसल्याचे समोर आले आहे. नागालँडमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत, सत्तास्थापन करण्यासाठी 31 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. 

मेघालयामध्ये त्रिशंकू विधानसभा 

मेघालयात त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, येथे एकाही पक्षाला एकहाती सत्ता मिळत नाही. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एनपीपीला 18-24 जाग मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 4-8 जागा, काँग्रेसला 6-12 जागा तर टीएमसीला 5-9 जागा मिळत आहेत. तर इतर अथवा अपक्ष असे 4-8 जागा येतील.  टाइम्‍स नाउ ईटीजीच्या एक्झिट पोलमद्ये एनपीपीला 18-26 जागा मिळू शकतात. भाजपला 3-6 जागा मिळू शकतात. तर टीएमसी ला 8-14 आणि काँग्रेसला 2-5 जागा मिळण्याची शक्यता आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
ट्रकमध्ये गॅस भरताना मोठा स्फोट! तीघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण गंभीर, धक्कादायक घटनेनं राजधानी हादरली
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!
E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget