(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बिहार : सुधारगृहातील 16 मुलींवर बलात्कार, एकीची हत्या करून पुरलं
बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिका सुधारगृहात 16 मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तसेच सात वर्षीय मुलीवर बलात्कारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
पाटणा : बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बालिका सुधारगृहात 16 मुलींवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तसेच सात वर्षीय मुलीवर बलात्कारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. तसेच या मुलीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह सुधारगृहाच्या परिसरात पुरण्यात आला आहे. या बालिका सुधारगृहात एकूण 44 मुली राहत होत्या.
मुजफ्फरपूरच्या वरिष्ठ पोलिस अधीक्षक हरप्रीत यांनी सांगितलं की, पीडित मुलीने लैंगिक अत्याचाराचा विरोध केल्यामुळे तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह सुधारगृहाच्या आवारात पुरला. सध्या वसतिगृहाच्या आवारातच खोदकाम सुरू असून तेथे काही संशयास्पद वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
सुधारगृहातील एकूण 44 पैकी 34 मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. सुधारगृहातील 29 मुलींवर बलात्कार झाल्याची शक्यता वैद्यकीय चाचणीत वर्तवण्यात येत आहे. तर 16 मुलींवर बलात्कार झाल्याच खुलासा टाटा इन्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स अहवालात झाला आहे.
Muzaffarpur shelter home alleged rape case : Digging starts in shelter home premises after statement of one of the victims that a girl was beaten to death and buried in the premises after disagreement with staff members #Bihar pic.twitter.com/3hEuUbuZO0
— ANI (@ANI) July 23, 2018
टाटा इन्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी सुधारगृहाचा संचालक बृजेश ठाकूरसह तीन पुरुष आणि आठ महिलांना अटक केली आहे.