Morning Headlines : देश विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 


पुढील पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा, तर मराठवाड्यासह विदर्भात गारपीटीची शक्यता


राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा मात्र, शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटीसह अवकाळीचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात मात्र या पाच दिवसात अवकाळी पावसाची तीव्रता अधिक राहून गारपीटीची शक्यता जाणवत असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. वाचा सविस्तर


दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू, दोन महिन्यात दुसरी घटना  


मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या आणखी एका चित्त्याचा मृत्यू  झाल्याची घटना घडली. रविवारी चार वाजण्याच्या सुमारास चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 'उदय' असं या चित्त्याचं नाव असून, त्याचे वय सहा वर्ष होते. मागील दोन महिन्यात कुनो नॅशनल पार्कमध्ये दुसऱ्या चित्त्याचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर


ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू पुन्हा आक्रमक; जंतर मंतरवर आंदोलन सुरु


भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. देशातील नामांकित कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर कालपासून पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु केलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी या आंदोलकांनी केली आहे. वाचा सविस्तर


7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने न्यूझीलंड हादरला


न्यूझीलंडमध्ये आज सकाळी जोरदार भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.2 इतकी मोजण्यात आली आहे. भारतीय वेळेनुसार आज सकाळी 6.11 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप न्यूझीलंडच्या केरमाडेक बेटांवर झाला. NCS च्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र जमिनीखाली 10 किलोमीटर खोलीवर होते. वाचा सविस्तर


Horoscope Today 24 April 2023 : मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


आज सोमवार हा एक महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष, सिंह, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळणार आहे. तर, कन्या, मकर राशीसाठी आजचा दिवस तितका लाभदायक नसणार आहे. मेष ते मीन राशीसाठी कसा असेल शुक्रवारचा दिवस? काय सांगतात तुमच्या नशीबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर


24th April Headlines: संभाजीनगरमध्ये आज BRS ची सभा, रत्नागिरी रिफायनरीसाठी आजपासून सर्वेक्षण; आज दिवसभरात


छत्रपती संभाजीनगरमध्ये आज BRS पक्षाची जाहीर सभा होणार आहे. यावेळी अनेक माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश  होणार आहे. रखडलेल्या रत्नागिरी रिफायनरीचे सर्वेक्षण आजपासून सुरू होणार आहे. सध्या विरोधी नेत्यांची पोलिसांकडून धरपकड होत आहे. काही नेते सध्या अंडरग्राउंड आहेत. त्यामुळे सध्याची संपूर्ण परिस्थिती पाहता होणारा विरोध हा मोठा असेल. वाचा सविस्तर


मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे निधन अन् सचिन तेंडुलकरचा जन्म; आज इतिहासात


भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा जन्म झाला होता. सचिनने आपल्या खेळातून जगाच्या क्रिकेट इतिहासावर मोठी छाप उमटवली आहे. तसेच आजच्या दिवशी मास्टर दिनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले होते. वाचा सविस्तर


महानायक अमिताभ बच्चन यांची फसवणूक? ट्वीट करत म्हणाले...


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या चर्चेत आहेत. बिग बी यांच्या एका ट्वीटने चांगलीच खळबळ उडाली आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी अमिताभ बच्चन यांना फसवलं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत. वाचा सविस्तर