Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या विरोधात पुन्हा ऑलिम्पियन कुस्तीपटू (Wrestlers) आक्रमक झाले आहेत. देशातील नामांकित कुस्तीपटूंनी  दिल्लीच्या जंतरमंतरवर कालपासून (23 एप्रिल) पुन्हा आंदोलन सुरु केलं आहे. कुस्तीपटू बजरंग पुनिया याच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरु केलं आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी या आंदोलकांनी केली आहे. 


 जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन करणार 


दरम्यान, गेल्या अडीच महिन्यांपूर्वी देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष  बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावेळी त्यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर या मागणीवरुन बृजभूषण शरण सिंह आणि ऑलिम्पियन कुस्तीपटू यांच्यातील वाद पुन्हा तापताना दिसत आहे. काल कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा बृजभूषण शरण सिंह आरोपांचा पुनरुच्चार केला. त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. यासंदर्भात कुस्तीपटूंनी पत्रकार परिषदही घेतली आहे. जोपर्यंत पैलवानांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत जंतरमंतर इथं आंदोलन करणार असल्याचा पवित्रा कुस्तीपटूंनी घेतला आहे.


तक्रारी देऊनही एफआयआर नोंदवला जात नाही


सात कुस्तीपटूंनी मुलींनी  बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रारी केल्या आहेत. परंतू, त्यांच्या तक्रारी देऊनही एफआयआर नोंदवला जात नसल्याचे कुस्तीपटू साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितले. पोलीस अधिकाऱ्याने अद्याप तक्रार दाखल केली नसून, याबाबत जाणून-बुजून विलंब केला जात असल्याचे मलिक म्हणाल्या.  समितीच्या चौकशीत काय निष्पन्न झालं, याबाबत कोणतेही तथ्य मांडण्यात आलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे म्हणणे ऐकावं, अशी आमची इच्छा असल्याचं साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी सांगितलं. आम्हाला न्याय मिळेल याची खात्री आहे. कुस्तीचे भवितव्य सुरक्षित हातात असावे हीच आमची इच्छा असल्याचे ते म्हणावे.


समितीने एप्रिलमध्ये सादर केलेला अहवाल सार्वजनिक का केली नाही?


इतके गंभीर आरोप असतानाही बृजभूषण शरण सिंग कुस्ती महासंघाचे अध्यक्ष असल्याचे कुस्तीपटूंनी सांगितले. दरम्यान, WFI अध्यक्ष म्हणून 12 वर्षे पूर्ण केलेल्या सिंग यांनी 7 मे रोजी होणारी WFI ची निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले. दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय निरीक्षण समितीने एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आपला अहवाल सादर केला होता. परंतु सरकारनं अद्याप तो सार्वजनिक केलेला नाही. सरकारी पॅनलचा अहवाल सरकारनं अद्याप सार्वजनिक केला नसल्याबद्दल कुस्तीपटूंनी नाराजी व्यक्त केली. तीन महिने झाले तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच आम्ही पुन्हा न्याय मागण्यासाठी इथे आलो आहोत. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत इथेच झोपू, इथेच जेवू असं विनेश फोगट यांनी सांगतिलं.


महत्त्वाच्या बातम्या:


Wrestlers Protest : कुस्ती महासंघाला मोठा झटका, नॅशनल चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकून अनेक खेळाडू आंदोलनात सहभागी