Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहेत. बिग बी यांच्या एका ट्वीटने चांगलीच खळबळ उडाली आहे. ट्विटरचे मालक एलन मस्क (Elon Musk) यांनी अमिताभ बच्चन यांना फसवलं असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
गेल्या काही दिवसांपूर्वी एलन मस्क (Elon Musk) यांनी ब्लू टिक मोफत मिळणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर 20 एप्रिलपासून ब्लू टिक काढण्यात आले. यात मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींपासून राजकीय नेत्यांचा समावेश होता. आता यासंदर्भातच अभिताभ बच्चन यांनी एक ट्वीट केलं आहे.
अमिताभ बच्चन यांचा गंभीर आरोप
अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,"ज्यांचे ट्विटरवर 1 मिलिअनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांना मोफत ब्लू टिक मिळालं आहे. माझे तर 48.4 मिलिअन फॉलोअर्स आहेत. तरीदेखील मला ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागले आहेत". अशाप्रकारे अमिताभ बच्चन यांनी पैसे घेऊन ब्लू टिक दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटवरील युजर्सच्या कमेंट्सने वेधलं लक्ष
अमिताभ बच्चन यांचं ट्वीट आता सोशल मीडियावर चांगलच व्हायरल होत आहे. या ट्वीटवर तुमचे पैसे तुम्हाला आता परत मिळणार नाहीत, एलन मस्क यांनी तुम्हाला फसवलं, अशा कमेंट्स युजर्सने केल्या आहेत.
ट्विटरने 20 एप्रिलपासून मोफत ब्लू टिक हवं असेल तर तुम्हाला पैसे भरावे लागतील, असं जाहीर करण्यात आलं होतं. त्याप्रमाणे ज्यांनी पैसे भरले त्यांना ब्लू टिक मिळालं तर ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांचं ब्लू टिक गेलं. पण 1 मिलिअन फॉलोअर्स असून ज्यांनी पैसे भरले नाहीत त्यांच्या नावासमोरचं ब्लू टिक अजूनही तसंच आहे. बिग बींनी ही बाब लक्षात आणून दिली आहे.
संबंधित बातम्या