एक्स्प्लोर

Morning Headlines 31th May: मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

केंद्र सरकारकडून 40 वैद्यकीय महाविद्यालयांची मान्यता रद्द; आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालयांवर टांगती तलवार

Recognition of 40 Medical Colleges Canceled: मोदी सरकारनं (Modi Government) देशातील 40 वैद्यकीय महाविद्यालयांची (Medical Colleges) मान्यता रद्द केली आहे. यासोबतच केंद्र सरकारनं (Central Government) 150 वैद्यकीय महाविद्यालयं निगराणीखाली ठेवली आहेत, याचाच अर्थ असा की, त्यांच्यावरही लवकरच कारवाई होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान या महाविद्यालयांमध्ये तसेच, तेथील व्यवस्थेत अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्यानं सरकारनं ही पावलं उचलली आहेत. नॅशनल मेडिकल कमिशनच्या यूजी बोर्डानं ही तपासणी केली होती, त्यानंतर या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

Delhi Crime News : ''होय, मीच साक्षीला ठार मारलं'', 16 वर्षीय प्रेयसीला संपवणाऱ्या आरोपीची कबुली; दिल्लीतील धक्कादायक घटना

Delhi Murder Case : दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने निर्घृणपणे हत्या केली. आता पोलिसांना आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपी साहिलला अटक केली होती, त्यानंतर चौकशीमध्ये त्यांनं साक्षीची हत्या केल्याचं मान्य केलं आहे. दिल्लीतील शाहबाद परिसरात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची तिच्याच प्रियकराने चाकूनं सपासप वार करून हत्या केली. 29 मे रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली अन् सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. पोलिसांना  29 मे रोजी साहिलला अटक करत त्याची चौकशी केली. वाचा सविस्तर

Mumbai Attacks : मुंबईतील 26/11 चा हल्ल्याचा कट रचणारा दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू, पाकिस्तानच्या तुरुंगात होता कैद

26 /11 Mumbai Attacker Dead in Pakistan Jail : मुंबईतील 26/11 च्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कट रचणारा (Mumbai Terrorist Attack) कुख्यात दहशतवादी अब्दुल सलाम भुट्टावीचा (Abdul Salam Bhuttavi ) मृत्यू झाला आहे. तो पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता. लष्कर-ए-तोएबा (Lashkar-e-Taiba) दहशतवादी संघटनेचा दहशतवादी आणि हाफिज सईदचा जवळचा सहकारी अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार समोर आली आहे. अब्दुल सलाम भुट्टावी 78 वर्षांचा होता. अब्दुल सलाम भुट्टावी 2020 पासून टेरर फंडीग प्रकरणी म्हणजेच दहशवतवादाला आर्थिक खतपाणी घालण्यासाठी शिक्षा भोगत पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होता. वाचा सविस्तर 

SCO Summit: 4 जुलैला शिखर परिषद, भारत भूषवणार यजमानपद; 'या' देशांना आमंत्रण

SCO Summit India: भारत (India) शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) शिखर परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. यंदा या परिषदेचं (SCO Summit) आयोजन वर्च्युअली (Virtually) केलं जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयानं (MEA) मंगळवारी (30 मे) यासंदर्भात माहिती दिली. मात्र, व्हर्च्युअल पद्धतीनं शिखर परिषद आयोजित करण्याचं कारण अद्याप सांगण्यात आलेलं नाही. गेल्या वर्षी SCO शिखर परिषद समरकंद, उझबेकिस्तान (Uzbekistan) येथे झाली होती. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping), रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांच्यासह जगभरातील सर्व प्रमुख नेते सहभागी झाले होते. वाचा सविस्तर 

RBI आणणार आहे UPI पेक्षा सोपी प्रणाली; मोबाईल नेटवर्कशिवाय पैसे पाठवणं शक्य, पण...

RBI Will Introduce Lightweight Payment And Settlement System: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) लाईटवेट पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमवर काम करत आहे. ही प्रणाली नैसर्गिक आपत्ती किंवा हिंसाचारग्रस्त भागांत कमीतकमी संसाधनांसह कार्य करेल आणि अगदी सहज युजर्सना पैसे ट्रान्सफर करण्यास मदत करेल. ही सुविधा केव्हा सुरू होईल? याबाबत मात्र आरबीआयनं अद्याप काहीही स्पष्ट केलेलं नाही. वाचा सविस्तर 

31th May In History: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म, गांधींची तिरंगा ध्वजाची संकल्पना आणि दलाई लामा भारतात आश्रयाला; आज इतिहासात 

31th May In History: भारताच्या इतिहासामध्ये आजच्या दिवसाला विशेष असं स्थान आहे. कारण आजच्याच दिवशी, 1921 रोजी महात्मा गांधीजींनी राष्ट्रीय काँग्रेसच्या ध्वजाची संकल्पना मांडली. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेला तिरंगा हा लाल, पांढरा आणि हिरव्या रंगात होता. तसेच आजच्याच दिवशी इंदूरातील मराठा साम्राज्याच्या राज्यकर्त्या अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला होता. यासह इतिहासातल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे... वाचा सविस्तर

Horoscope Today 31 May 2023 : वृषभ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

Horoscope Today 31 May 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीचे लोक अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करतील. तर, सिंह राशीच्या लोकांना कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आजचा दिवस मेष ते मीन राशीसाठी कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget