(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Morning Headlines 1st June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. Rules Changing From 1 June 2023: आजपासून बदलणार 'हे' महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम
Rules Changing From 1 June 2023: आजपासून नवा महिना सुरू होत आहे. अशातच जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Gas Cylinder) किमतींत बदल करतात. यासोबतच पीएनजी (PNG) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीही बदलल्या जाऊ शकतात. यामुळे या निर्णयांचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. जाणून घेऊयात आजपासून बदलणार असलेल्या नियमांबद्दल... वाचा सविस्तर
2. LPG Gas Cylinder Price: LPG गॅसच्या दरांत मोठी घट; व्यावसायिक सिलेंडर 83.5 रुपयांनी स्वस्त, पाहा Latest Rates
LPG Cylinder Price Reduce: एलपीजी गॅसच्या किमतींत (LPG Gas Cylinder Price) मोठी घट झाली आहे. एलपीजी (LPG) विकणाऱ्या कंपन्यांनी दर स्वस्त केले आहेत. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही (Commercial LPG Cylinder) कपात झाली आहे. घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर (Cylinder Price) पूर्वीप्रमाणेच आहेत. यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. दरम्यान, आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता. वाचा सविस्तर
3. Petrol-Diesel Price Today: आज जून महिन्याचा पहिला दिवस; कितीनं बदलले पेट्रोल-डिझेलचे दर?
Petrol-Diesel Price Today: देशात दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel Price) नव्या किंमती जाहीर केल्या जातात. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करतात. दररोज सकाळी 6 वाजता देशातील तेल कंपन्या (OMCs) त्यांच्या वेबसाईटवर पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती अपडेट केल्या जातात. आजपासून जून महिना सुरू झाला असून गेल्या 1 वर्षापासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. OMC नं 1 जूनसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. 1 जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिरच असून कोणताही बदल करण्यात आलेला नाही. वाचा सविस्तर
4. Wrestlers Protest : कुस्तीपटूंच्या समर्थनात आज महापंचायत, मुझफ्फरनगरमध्ये देशभरातील खापचे प्रतिनिधी एकवटणार
Wrestlers Protest : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या अटकेच्या मागणीविरोधात कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकेत यांनी आज (1 जून) खाप महापंचायत बोलावली आहे. ही महापंचायत उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यात दिल्ली, यूपी, हरियाणा आणि पंजाब, राजस्थानसह देशभरातील विविध खापचे प्रतिनिधी असतील. खाप आणि शेतकरी गटांचे प्रतिनिधी या महापंचायतीमध्ये कुस्तीपटूंच्या सुरु असलेल्या आंदोलनावर चर्चा करतील. वाचा सविस्तर
5. Nitin Gadkari on Hindu Temples: "देशातील हिंदू मंदिरांमध्ये स्वच्छता नसते, मी..."; नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य
Nitin Gadkari on Hindu Temples: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी बुधवारी देशातील हिंदू मंदिरांबाबत मोठं आणि महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. हिंदू मंदिरांमध्ये (Hindu Temples) स्वच्छतेचं पालन (Cleanliness) केलं जात नाही, असं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरींनी हे वक्तव्य केलं आहे. वाचा सविस्तर
6. Nepal PM India Visit: नेपाळचे पंतप्रधान आज मोदींची भेट घेणार; व्यापारासह सीमा समस्यांवरही चर्चा होणार
Nepal PM India Visit: नेपाळचे (Nepal) पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड (PM Pushpa Kamal Dahal Prachanda) सध्या चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. आज म्हणजेच, गुरुवारी पुष्पकमल दहल प्रचंड पंतप्रधान नरेंद्र मोदींची (PM Modi) भेट घेणार आहेत. यादरम्यान दोन्ही देशांमधील ऊर्जा, कनेक्टिव्हिटी आणि व्यापाराला चालना देण्यावर चर्चा होणार आहे. बुधवारी नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये भारत-नेपाळ संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा झाली. या बैठकीला परराष्ट्र सचिव विनय क्वात्राही उपस्थित होते. वाचा सविस्तर
7. World Milk Day 2023 : 'जागतिक दूध दिन' का साजरा केला जातो? वाचा या दिनाचा इतिहास आणि महत्त्व
World Milk Day 2023 : आज जागतिक दूध दिन (World Milk Day 2023). प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आणि फिटनेससाठी दूध अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण दूधात सर्व प्रकारचे पोषकतत्त्व असल्याने त्याचं सेवन केलं तर त्याचा शरीराला मोठा फायदा होतो. त्यामुळे लोकांना दुधाचं महत्त्व आणि आरोग्याप्रती असलेली गरज लक्षात यावी यासाठी जागतिक अन्न आणि कृषी संशोधन परिषदेने दिलेल्या निर्देशानुसार 2001 पासून भारतासह जगभरात जागतिक दूध दिन साजरा करण्यात येतो. लोकांपर्यंत दुधाचा प्रचार आणि प्रसार करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. सर्वात पहिला दूध दिवस 1 जून 2001 रोजी साजरा करण्यात आला होता. वाचा सविस्तर
8. 1st June in History: 'डेक्कन क्वीन' आणि एसटी बस सेवेची सुरुवात, प्रभात फिल्म कंपनीची स्थापना; आज इतिहासात
1st June in History: आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय महत्वाचा आहे. आजच्या दिवशी महाराष्ट्राची लाइफलाइन एसटी बस सेवेची सुरुवात झाली. तर, भारतीय चित्रपट सृष्टीत आपले दर्जेदार कलाकृतींना जन्म देणाऱ्या प्रभात फिल्म कंपनीचा स्थापना दिवस आज आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीन ही एक्स्प्रेसही आजच्या दिवशी सुरू झाली होती. वाचा सविस्तर
9. Horoscope Today 01 June 2023 : मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य
Horoscope Today 01 June 2023 : आज गुरुवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तर, वृश्चिक राशीचे लोक समाजाच्या भल्यासाठी काम करताना दिसतील. मेष ते मीन राशीसाठी आजचा दिवस नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर