एक्स्प्लोर

Morning Headlines 18th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळामुळं राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस, पाच हजार नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवले

Biporjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळ (Biporjoy Cyclone) हे आता पश्चिम राजस्थानमध्ये सक्रिय झाले आहे. या चक्रीवादळामुळं बाडमेर आणि जालोर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांपासून बाडमेरमध्ये (Barmer) पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबले आहे. काल रात्रीपासून बिपरजॉय वादळामुळं ताशी 45 ते 60 किलोमीटर वेगाने जोरदार वारे वाहत आहेत. खबरदारी म्हणून बाडमेर आणि जालोरमधील पाच हजार नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवण्यात आलं आहे. वाचा सविस्तर...

2. Jammu Kashmir Eartquake : जम्मू-काश्मीरसह लडाखमध्ये भूकंपचे झटके

Jammu-Kashmir Eartquake : जम्मू-काश्मीरमधील रामबन आणि डोडा जिल्ह्यात शनिवारी सौम्य तीव्रतेचे दोन भूकंप झाले. यासोबतच लेह-लडाखमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चिनाब खोऱ्यात आठ तासांत 3.. रिश्टर स्केल आणि 4.4 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के जाणवले. त्याचवेळी लडाखमध्ये 4.5 तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्याआधी 13 जून रोजी डोडा आणि किश्तवाडमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते, या भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टर स्केल इतकी मोजली गेली होती. या भूकंपामुळे येथील घरांनाही भेगा पडल्या आहेत. वाचा सविस्तर...

3. Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन, रस्ते बंद ; लष्कराकडून अडकलेल्या 3500 पर्यटकांची सुटका

Sikkim Landslide : सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. सिक्कीम भूस्खलन झाल्याने काही ठिकाणी रस्ते बंद पडले आहेत. यामुळे बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं असून बचाबकार्य सुरु आहे. लष्कराने आतापर्यंत अडकलेल्या तीन हजारहून अधिक पर्यटकांची सुटका केली आहे. या नागरिकांची सुखरूप सुटका आणि व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. वाचा सविस्तर...

4. NIA ची मोठी कारवाई! 10 श्रीलंकन नागरिकांसह 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल, LTTE अतिरेकी संघटना पुन्हा सक्रिय करण्याचा कट

India-Sri Lanka Illegal Drugs Case : राष्ट्रीय तपास संस्था (National Investigation Agency) म्हणजेच एनआयए (NIA) ने मोठी कारवाई केली आहे. एनआयएने ड्रग्स प्रकरणात (Drugs Case) 10 श्रीलंकेसह 13 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यांच्यावर अतिरेकी संघटना एलटीटीई (LTTE) म्हणजेच लिट्टे पुन्हा सक्रिय करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. वाचा सविस्तर...

5. Reserve Bank of India : प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्या नाहीत, RBI चे स्पष्टीकरण

Reserve Bank of India : नोट गहाळ झाल्याप्रकरणी आलेल्या बातम्यांबाबत आरबीआयकडून (Reserve Bank of India ) कडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. नोटा छापण्याच्या प्रिंटिंग प्रेसमधून नोटा गहाळ झाल्या नसल्याचं रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगण्यात आलं आहे. प्रिंटिंग प्रेसमधून RBI ला पुरवलेल्या सर्व नोटांचा योग्य हिशोब केला जात असतो. सोबतच प्रेसमध्ये छापलेल्या आणि आरबीआयला पुरवल्या जाणाऱ्या नोटांच्या ताळमेळासाठी मजबूत यंत्रणा असते असंही RBI ने म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

6. Monsoon : 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगल्या पावसाचा अंदाज

Monsoon Update : राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. राज्यातील काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पूर्व मोसमी पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. 22 जूनपर्यंत हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण आणि गोवा या उपविभागपर्यंतच मर्यादित असु शकतो असेही खुळे म्हणाले. वाचा सविस्तर...

7.18th June In History: आंतरराष्ट्रीय सहल दिवस, राणी लक्ष्मीबाईंना वीरमरण; आज इतिहासात...

18th June In History: आजच्या दिवशी इतिहासात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. आजचा दिवस हा आंतरराष्ट्रीय सहल दिवस म्हणून साजरा केला जातो. तर, राणी लक्ष्मीबाई यांचा आजच्या दिवशी मृत्यू झाला होता. तर पाहूया आजच्या दिवसाचे दिनविशेष. वाचा सविस्तर...

8. Horoscope Today 18 June 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 18 June 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीचे लोक आपली सर्व रखडलेली कामे आज पूर्ण करू शकतील. मीन राशीच्या लोकांना मित्रांच्या मदतीने काही नवीन काम करायला मिळेल, ज्यामुळे उत्पन्न वाढू शकेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर...

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा 06 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange : मराठा - ओबीसींमध्ये Chhagan Bhujbal वाद लावतात, मनोज जरांगेंचा हल्लाबोलMumbai Rain Update | पुढील 3 तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 08 Jully

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Pangong Lake in eastern Ladakh : लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
Embed widget