एक्स्प्लोर

Monsoon : पुढील पाच दिवस मुंबईसह तळकोकणात मध्यम पावसाची शक्यता, तर 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगल्या पावसाचा अंदाज

मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Monsoon : राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे. राज्यातील काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरुपाच्या पूर्व मोसमी पावसाची शक्यता ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवली आहे. 22 जूनपर्यंत हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण आणि गोवा या उपविभागपर्यंतच मर्यादित असु शकतो असेही खुळे म्हणाले. 

 Rain News : 23 ते 29 जूनदरम्यान देशात चांगल्या पावसाची शक्यता 

पूर्वमोसमी वळीव पावसाच्या (Rain) सध्याच्या या वातावरणातूनच मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तर मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून तेलंगनातून संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात साधारण 23 जून ला नैऋत्य मान्सूनचा प्रवेश होऊ शकतो. मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेमुळेच मान्सूनची बं. उपसागरीय शाखाही उर्जीतावस्थेत येण्याची शक्यता जाणवत आहे. दरम्यानच्या या कालावधीतच (23 ते 29 जुन) तळ कोकणसहीत संपूर्ण कोकण आणि गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होऊन, सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवते असल्याचे खुळे म्हणाले. म्हणजेच 23 ते 29 जुन या आठवड्यात देशाच्या संपूर्ण किनारपट्टीत पावसाच्या धन विसंगतीची म्हणजे सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले. 

जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच पेरणी करावी 

विदर्भात मात्र सध्य:स्थित असलेली दिवसाची उष्णतेची लाटसदृश (Heat wave)  स्थिती आणि रात्रीची दमट वातावरणतून होणारी अस्वस्थता, उद्यापर्यंत (19 जूनपर्यंत) कायम राहू शकते. उर्वरित महाराष्ट्रातील तापमानात मात्र विशेष फरक जाणवणार नाही. 23 जूनला सुरु होणाऱ्या आणि  6 जुलैला संपणाऱ्या पंधरवाड्यात महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पेरणीयोग्य असा मध्यम तर सह्याद्री घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात मात्र साधारण अशा मोसमी पावसाची शक्यता जाणवते असल्याचे खुळे म्हणाले. म्हणजेच 7 जुलै नंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा. कारण 7 जुलैनंतर आठवड्यात पेरणीसाठी कदाचित उघडीपही मिळू शकते, असे खुळे म्हणाले.  

22 जूनपर्यंत गडगडाटीसह वारा, वीज, गारांसह अवकाळी पावसाची शक्यता

बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, तसेच सिमला कुलू मनाली, देहाराडून आणि सभोवतालच्या परिसरात आज 18 जून 2023 पासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार दिनांक 22 जूनपर्यंत गडगडाटीसह वारा, वीज, गारांसह अवकाळी वातावरण आणि पावसाची (Rain) दाट शक्यता जाणवते. या कालावधीत तिकडे जाणाऱ्या पर्यटकांनी याचीही नोंद घ्यावी. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 11  डिसेंबर 2024 : 07 PM ABP MajhaZero Hour PM Modi With Raj Kapoor Family : राज कपूर यांच्या आठवणीत रमले पंतप्रधान नरेंद्र मोदीZero Hour MVA Internal Issue : मविआतील संघर्षावर नागपूरकरांना काय वाटतं?Zero Hour MVA in BCM Election : पालिकेआधी मविआ फुटणार? उद्धव ठाकरेंचा मेगाप्लॅन कोणता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
लाडक्या बहिणींना गुडन्यूज; आदिती तटकरेंनी स्पष्टच सांगितलं, निकषांबाबत पत्रकच जारी
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
रवींद्र वायकरांची खासदारकी राहणार का? मुंबई हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला; युक्तिवाद पूर्ण
Jyotiraditya Shinde : लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
लेडी किलर ते ज्योतिरादित्य शिंदेंजी, तुम्ही खूप सुंदर दिसता, याचा अर्थ चांगली व्यक्ती आहात असं नाही, तुम्ही खलनायकही होऊ शकता; संसदेत जोरदार खडाजंगी!
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
परभणीतील हिंसाचारप्रकरणी 40 जणांना अटक, गुन्हे दाखल; आयजी उमाप ॲक्शन मोडवर
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
संसदेतील कामकाजासाठी 1 मिनिटाला किती खर्च येतो? तुमच्या भुवया उंचावतील
Bangladesh BNP Protest : बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
बांगलादेशचा मोर्चा त्रिपुरा सीमेपर्यंत धडकणार! भारताने नेमका कोणता निर्णय घेतला?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2024 | बुधवार
Pushpa 2: The Rule : 'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
'गंगम्मा जतारा' म्हणजे नेमकं आहे तरी काय? पुष्पा 2 मध्ये फक्त सहा मिनिटांचा सीन अन् तब्बल 60 कोटींचा चुराडा!
Embed widget