देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


अजित पवारांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे 'राष्ट्रवादी'त काय घडू शकतं? 'या' आहेत शक्यता?


NCP Politics : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना (Ajit Pawar) निवडणूक आयोगाने दिल्यावर शरद पवारांसाठी (Sharad Pawar) हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाच्या (Election Commission) या निर्णयानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात आता अनेक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांच्या बाजूने निकाल लागल्यामुळे 'राष्ट्रवादी'त काय घडू शकतं? याबाबत काही शक्यता वर्तवल्या जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून पक्षाच्या कार्यालयासह अनेक गोष्टींवर दावे प्रतिदावे केले जाण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...


Nitish Kumar : जागा वाटपासाठी नितीश कुमारांची लगबग सुरु? पंतप्रधान मोदींच्या भेटीत कोणत्या होणार चर्चा? वाचा सविस्तर


Nitish Kumar : 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपबरोबर एनडीएमध्ये प्रवेश केला. आता नितीशकुमारांना एनडीएमध्ये 17 जागा मिळतील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जेडीयू इंडियाने युतीकडे 17 जागांची मागणी केली होती. पण, या संदर्भात काही घडत नव्हते. याच दरम्यान, नितीशकुमार यांनी आपली बाजू बदलली. पण, एनडीएमध्ये काही ठिक नाहीये. नितीश कुमार आज (7 फेब्रुवारी) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत, त्याआधीच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...


MP Harda Blast : फटाका कारखान्यात भीषण स्फोट, 11 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी; पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल्या मालकासह तीन आरोपींना अटक


Harda Factory Explosion : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा (Harda) येथे फटाख्याच्या कारखान्यात स्फोट (Firecracker Factory Blast) होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. सोमवारी हरदा येथील फटाखा कारखान्यात स्फोट झाला. फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत होते. या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याच्या दोन मालकांसह तिघांना अटक केली आहे. स्फोटानंतर आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते. वाचा सविस्तर...


मोठी बातमी! प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर; सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ


मुंबई : आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने 7 फेब्रुवारीपासून निवासी डॉक्टरांकडून (Resident Doctor) राज्यव्यापी संपाची (Strike) हाक देण्यात आली होती. त्यानुसार आज राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर जाणार आहे. त्यामुळे याचे परिणाम आरोग्य यंत्रणेवर होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेत बैठक देखील झाली. मात्र, पुन्हा एकदा फक्त आश्वासनच मिळत असल्याने निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर...


Weather Update : उत्तर भारतात थंडीपासून दिलासा! पुढच्या आठवड्यात 'या' भागांत पुन्हा पावसाची शक्यता; वाचा हवामान विभागाचा अंदाज


Weather Update Today : उत्तर प्रदेशातील हवामानात (Weather Update) दिवसेंदिवस बदल होत आहेत. आठवड्याची सुरुवात पावसाने होत असतानाच मंगळवारी (काल) लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळाल. यामुळे नागरिकांना थंडीपासून किंचित दिलासा मिळाला आहे. सकाळी जिथे काही ठिकाणी दाट धुके दिसले तर जसजसा दिवस सरत गेला तसतसे धुके सरत गेले आणि सूर्यप्रकाश दिसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज 7 फेब्रुवारी रोजी हवामानात बदल झालेला दिसतोय. आज काही ठिकाणी दाट ऊन दिसण्याची शक्यता आहे. तर, पुढच्या आठवड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर...


तांदळाच्या दरात वाढ, सरकार देणार सर्वसामान्यांना दिलासा; किंमत कमी करण्यासाठी नवा प्लॅन काय?  


Bharat Rice: तांदळाच्या दरात (Rice Price) वाढ होत आहे. वाढत्या किंमती कमी करण्यासाठी सरकार सातत्यानं प्रतत्न करत आहे. कारण, सरकारला महागाई नियंत्रणात ठेवायची आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. दरम्यान, वाढत्या तांदळाच्या किंमती कमी करण्यासाठी सरकार आता सर्वसामान्यांना 29 रुपये प्रति किलो दराने तांदळाची विक्री करणार आहे. त्यासाठी सरकारनं भारत राईस (Bharat Rice) नावानं नवीन ब्रँड बाजारात आणला आहे. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. वाचा सविस्तर...


युवा टीम इंडिया अंडर 19 विश्वचषकाचा बादशाह, सलग पाचव्यांदा फायनल, उदय सहारनकडे इतिहास रचण्याची संधी


Indian Cricket Team Journey In U19 WC 2024 : उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वातील भारतीय संघाने अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा दोन विकेटनं पराभव केला. यंदाच्या विश्वचषकातील (U19 WC 2024) भारतीय संघाचा सलग सहावा विजय आहे. तर भारतीय संघाने आतापर्यंत दहाव्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघाचा दबदबा राहिलाय. भारताने पाच वेळा अंडर 19 विश्वचषक उंचावलाय. वाचा सविस्तर...


Rose Day : लाल गुलाब प्रेमाचा, तर पिवळा मैत्रीचा, गुलाबाच्या पाच रंगांचा अर्थ काय? 'रोज डे' च्या निमित्ताने आवडत्या व्यक्तीला कोणत्या रंगाचे गुलाब द्याल?


Rose Day 2024 : फेब्रुवारीचा महिना म्हणजे प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात पडायच्या मार्गावर असलेल्यांसाठी विशेष असा असतो. 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन्स डे (Valentine's Day) असला तरीही त्याची सुरूवात मात्र एक आठवडा आधीपासूनच होते. त्यामुळे अनेकजण या व्हॅलेंटाईन वीकची (Valentine's Week) आतुरतेने वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीच्या रोज डे पासून होते तर शेवट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे ने होते. आजचा रविवार रोज डे अर्थात गुलाब दिवसाच्या स्वरुपात साजरा केला जातो. वाचा सविस्तर...


Horoscope Today 7 February 2024 : आजचा बुधवार खास! 12 राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या


Horoscope Today 7 February 2024 :  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...