Weather Update Today : उत्तर प्रदेशातील हवामानात (Weather Update) दिवसेंदिवस बदल होत आहेत. आठवड्याची सुरुवात पावसाने होत असतानाच मंगळवारी (काल) लख्ख सूर्यप्रकाश पाहायला मिळाल. यामुळे नागरिकांना थंडीपासून किंचित दिलासा मिळाला आहे. सकाळी जिथे काही ठिकाणी दाट धुके दिसले तर जसजसा दिवस सरत गेला तसतसे धुके सरत गेले आणि सूर्यप्रकाश दिसला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज 7 फेब्रुवारी रोजी हवामानात बदल झालेला दिसतोय. आज काही ठिकाणी दाट ऊन दिसण्याची शक्यता आहे. तर, पुढच्या आठवड्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  


'या' भागांत हवामान निरभ्र राहण्याची शक्यता


हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज राज्याच्या बहुतांश भागात हवामान निरभ्र राहण्याची शक्यता आहे. पावसानंतर सूर्यप्रकाशामुळे दिवसा आणि रात्रीच्या तापमानात वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांत गोरखपूर आणि आग्रा विभागात तापमानात वाढ झाली, तर वाराणसी, अयोध्या, लखनौ, कानपूर विभागात सोमवारी तापमान सामान्यपेक्षा खूपच कमी राहिले. 9 आणि 10 फेब्रुवारीपर्यंत राज्यात हवामानात दाट ऊन असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 


दिल्लीच्या हवामानात चढ-उतार सुरूच


देशाची राजधानी दिल्लीच्या हवामानात चढ-उतार सुरूच आहे. मंगळवारी किमान तापमान अचानक 7.2 अंशांवर आले, जे सामान्यपेक्षा दोन अंशांनी कमी होते. तर, सोमवारी किमान तापमान 9 अंशांपेक्षा जास्त तर रविवारी 11.9 अंशांनी नोंदवले गेले. तर कमाल तापमानात अंशत: घट झाली आहे. मात्र, येत्या पाच दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याचे संकेत आहेत. 


IMD च्या अंदाजानुसार, आज दिल्लीत किमान तापमान 7 अंश राहण्याची शक्यता आहे. तर, कमाल तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. दिवसा आकाश निरभ्र राहील आणि जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे. असेही सांगण्यात आले आहे की लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे, कारण येत्या काही दिवसात हवामानातील बदल कायम राहण्याची शक्यता आहे. 


पुढील आठवड्यात पुन्हा पाऊस पडणार 


उत्तर प्रदेशात पुढील काही दिवस सकाळ आणि संध्याकाळ हलके धुके पडण्याची शक्यता असली तरी पुढील पाच दिवस कमाल तापमानात 2-3 अंश सेल्सिअसची हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. . त्याचबरोबर पुढील ३ दिवसांत किमान तापमानात हळूहळू 2 अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. यानंतर कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. दरम्यान, उत्तर पाकिस्तान आणि लगतच्या जम्मू विभाग आणि पंजाबमध्ये ताजे वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होत आहे, ज्याचा परिणाम यूपीमध्येही दिसून येईल. 12 फेब्रुवारीनंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 


मुझफ्फरनगरमध्ये सर्वात कमी किमान तापमान


राज्यातील कमाल तापमान 24 ते 17 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. गेल्या 24 तासात बांदा येथे सर्वाधिक तापमान 24.8 अंश इतके नोंदविण्यात आलं आहे. तर, मुझफ्फरनगरमध्ये सर्वात कमी किमान तापमान 6.1 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आलं आहे. मेरठमध्ये किमान तापमान 7.5, मुरादाबादमध्ये 8.8, आग्रामध्ये 9.2 आणि राजधानी लखनऊ आणि कानपूरमध्ये किमान तापमान 11 अंश सेल्सिअसच्या आसपास होते. 


महत्त्वाच्या बातम्या : 


7 February In History : पुण्यात पहिले चित्रपटगृह सुरू, स्त्रीपात्र असलेला पहिला चित्रपट सैरंध्री प्रदर्शित; आज इतिहासात