Indian Cricket Team Journey In U19 WC 2024 : उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वातील भारतीय संघाने अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने यजमान दक्षिण आफ्रिका संघाचा दोन विकेटनं पराभव केला. यंदाच्या विश्वचषकातील (U19 WC 2024) भारतीय संघाचा सलग सहावा विजय आहे. तर भारतीय संघाने आतापर्यंत दहाव्यांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघाचा दबदबा राहिलाय. भारताने पाच वेळा अंडर 19 विश्वचषक उंचावलाय.



कोण कोणत्या कर्णधाराने अंडर 19 विश्वचषक उंचावला - 


 भारतीय संघाने 2000 मध्ये पहिल्यांदा अंडर 19 विश्वचषक उंचावला होता. त्यावेळी युवा भारतीय संघाची धुरा मोहम्मद कैफ याच्या खांद्यावर होती. त्यानंतर भारतीय संघाला आठ वर्ष वाट पाहावी लागली. 2008 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलं. 2012 मध्ये उन्मक्त चंद याच्या नेतृत्वात भारताने तिसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. 2018 मध्ये पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वात भारताने चौथ्यांदा चषकावर नाव कोरले होते. 2022 मध्ये यश धुलच्या नेतृत्वात भारतीय संघ पाचव्यांदा जग्गजेता झाला होता.  आतापर्यंत भारतीय संघाने पाचवेळा अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलेय. 


उदय सहरानच्या संघाला इतिहास रचण्याची संधी ?


उदय सहरानच्या नेतृत्वातील युवा भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिका येथे सुरु असलेल्या विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत शानदार कामगिरी केली आहे. स्पर्धेत भारतीय संघ अजेय आहे. सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत सलग सहाव्या विजयाची नोंद केली. भारतीय संघाने विश्वचषकावर नाव कोरल्यास उदय सहरान हा सहावा कर्णधार होणार आहे. याआधी मोहम्मद कैफ, विराट कोहली, उन्मक्त चंद, पृथ्वी शॉ आणि यश धुल यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने अंडर 19 विश्वचषकावर नाव कोरलेय. 


भारतीय संघ अजेय, विश्वचषकाचा प्रबळ दावेदार - 


उपांत्य सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाचा दोन विकेटनं पराभव करत दहाव्यांदा अडंर 19 विश्वचषकाची फायनल गाठली. यंदाच्या विश्वचषकात भारतीय संघ अजय आहे. भारतीय संघाला विश्वचषकाचा प्रबळ दावेदार म्हटले जातेय. अंडर  19 विश्वचषकात युवा भारतीय सघाचा (IND U19 vs SA U19) दबदबा राहिला आहे. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आतापर्यंत एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. सलग सहा सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. युवा ब्रिगेडचा सामना आता पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमधल्या विजयी संघाविरोधात होईल. भारतायी संघाने आतापर्यंत दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आणि नेपाळ संघाचा पराभव केला. भारताच्या संघाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.  


उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बांगलादेशविरात विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात युवा ब्रिगेडने 84 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 201 धावांनी सुपडा साप केला. तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला 201 धावांनी नमवलं. न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव करत टीम इंडियाने विजयाचा चौकार लगावला.  पाचव्या सामन्यात नेपाळचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. भारतीय संघाने तीन सामने 200 पेक्षा जास्त धावांनी जिंकले आहेत. कर्णधार उदय सहारन  याला इतिहास रचण्याची संधी असेल. 


आणखी वाचा :


भारताची अंडर 19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक,यजमान दक्षिण आफ्रिकेवर दोन विकेट्सनी मात, महाराष्ट्राच्या लेकाची सुर्वणकामगिरी