Energy Sector : आपल्या भारत (India) देशात मोठ्या प्रमाणात ऊर्जा (Energy) आयात केली जाते. भारत  हा जगातील सर्वात मोठा तिसरा ऊर्जेचा ग्राहक देश आहे. जवळपास आपल्या 85 टक्के गरजा आयातीद्वारे पूर्ण केल्या जातात. अशा स्थितीत सरकारला आयात कमी करुन देशांतर्गत उत्पादन वाढवायचे आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी (6 फेब्रुवारी)  तेल आणि वायू कंपन्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये विविझ विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. 


आघाडीच्या ऊर्जा कंपन्यांच्या 20 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची घेतली भेट


सरकारला आयात कमी करुन देशांतर्गत ऊर्जेचं उत्पादन वाढवायचे आहे. त्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.  यासंदर्बात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी तेल आणि वायू कंपन्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.  यामध्ये भारतामध्ये उपलब्ध असलेल्या संधी, जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि शोध आणि उत्पादनाच्या दिशेने होत असलेले प्रययत्न यावर चर्चा झाली. पंतप्रधान मोदी यांनी ExxonMobil आणि BP ते कतार एनर्जी आणि टोटल एनर्जी या आघाडीच्या ऊर्जा कंपन्यांच्या 20 उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याच्या संधींबाबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. 


भारत जगातील सर्वात मोठा तिसरा ऊर्जेचा ग्राहक 


मंगळवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी तेल आणि वायू क्षेत्रात सरकारी स्तरावर केलेल्या सुधारणांबद्दल चर्चा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक असलेला देश आहे. भारत आपल्या 85 टक्के ऊर्जेच्या गरजा आयातीद्वारे पूर्ण करतो, परंतु ही आयात कमी करण्यासाठी सरकारला देशांतर्गत उत्पादन वाढवायचे आहे. दरम्यान या बैठकीला वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. तेल आणि वायू उद्योगाशी संबंधित सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत ऊर्जा क्षेत्रातील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर ऊर्जा क्षेत्राबाबत आपापली मते मांडली.


जागतिक स्तरावर गुंतवणूक करण्यासाठी भारत हे सर्वोत्तम ठिकाण


दरम्यान, जागतिक स्तरावर गुंतवणूक करण्यासाठी भारत हे सर्वोत्तम ठिकाण असल्याची माहिती वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिली. अलीकडील सुधारणांमुळं मोठ्या जागतिक कंपन्यांना भारतात अन्वेषण आणि उत्पादनात गुंतवणूक करणे अधिक सोयीचं ठरत असल्याचे अग्रवाल म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


PM Suryoday Yojana : सोलर पॅनल योजनेद्वारे 18 हजार कोटी रुपयांची बचत, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होणार