Harda Factory Explosion : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) हरदा (Harda) येथे फटाख्याच्या कारखान्यात स्फोट (Firecracker Factory Blast) होऊन मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला असून 100 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती आहे. सोमवारी हरदा येथील फटाखा कारखान्यात स्फोट झाला. फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर पोलीस आरोपींचा शोध घेत होते. या प्रकरणी पोलिसांनी कारखान्याच्या दोन मालकांसह तिघांना अटक केली आहे. स्फोटानंतर आरोपी दिल्लीला पळून जाण्याच्या प्रयत्नात होते.


कारखान्यात स्फोट होऊन 60 हून अधिक घरांना आग


मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी मध्य प्रदेश हरदा येथील फटाक्यांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत जखमींवर उपचार करण्यात येत आहे. हरदा येथील अवैध फटाका कारखान्यात स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूच्या 60 हून अधिक घरांना आग लागली. बैरागड येथील मगरधा रोडवरील अवैध फटाक्यांच्या कारखान्यात हा स्फोट झाला. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.






11 जणांचा मृत्यू, 175 जण जखमी


मध्य प्रदेशातील हरदा फटाका कारखान्यात झालेल्या स्फोटप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये राजेश अग्रवाल, सोमेश अग्रवाल आणि रफिक खान यांचा समावेश आहे. राजेश अग्रवाल याला राजगड जिल्ह्यातील सारंगपूर येथून अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. कारमधून दिल्लीला पळून जाण्याच्या तयारीत होता. हरदा कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 175 जण जखमी झाले आहेत.


मालकासह तीन आरोपींना अटक


हरदा येथील बेकायदेशीर फटाका कारखान्याचा संचालक राजीव अग्रवाल आणि त्याच्या मुलाला सारंगपूर येथे वेन्यू कारमधून अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपी फरार झाला होता. राजेश अग्रवाल हे उज्जनईहून दिल्लीला निघाले होते. तसेच सोमेश अग्रवाल हा गाडीत बसून मध्य प्रदेश सोडून दिल्लीला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता.




महत्त्वाच्या इतर बातम्या :


MP Blast : मध्य प्रदेशातील हरदामधील फटाका कारखान्यातील भीषण स्फोटात 10 ठार, 58 जखमी; आतापर्यंत काय घडलं?