एक्स्प्लोर

Morning Headlines 6th February : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Update : उत्तर भारतात थंडीची लाट, 'या' भागात पावसाची शक्यता; आजचं हवामान कसं असेल? जाणून घ्या

Weather Update Today : उत्तर भारतात थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. आज मंगळवारीही अनेक राज्यांमध्ये थंडीसह दाट धुक्याची शक्यता आहे. तर काही भागात पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश आणि काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी (Snowfall) सुरु आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागातही थंडी वाढली आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान, पश्चिम बंगालमध्ये थंडीसह दाट धुक्याची चादर पाहायला मिळत आहे. वाचा सविस्तर...

PM Modi : पंतप्रधान मोदी स्वत:ला म्हणाले 'सर्वात मोठा OBC', काँग्रेसवरही निशाणा; राहुल गांधीचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

Rahul Gandhi Targeted PM Narendra Modi : संसदेत केलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र डागलं. ओबीसींच्या (OBC) मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर (Congress) हल्ला चढवला. संसदेत भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ओबीसींच्या मुद्द्यावर बोलताना काँग्रेसला लक्ष्य केलं आणि स्वत: ओबीसी असल्याचा उल्लेख केला आहे. ज्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

Ajit Pawar : 'माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला', शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवारांचं स्पष्टीकरण

Ajit Pawar on Sharad Pawar : बारामती (Baramati) दौऱ्यावर असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार निशाणा साधला. 'शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन तुम्हाला केलं जाईल, मात्र कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत? असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला होता. अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन शरद पवार गटाने टीकेची झोड उठवली. शरद पवार गटाकडून झालेल्या टीकेनंतर ट्वीट करत अजित पवारांनी त्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. वाचा सविस्तर...

पतीच्या निधनानंतर चुलत सासऱ्यावर जडला जीव, चार मुलांच्या आईचा लग्नाचा हट्ट, पोलीस ठाण्यातच हायवोल्टेज ड्रामा

Crime News: न उमर की सीमा हो, न जनम का हो बंधन, जब प्यार करे कोई, तो देखे केवल मन... गझलकार जगजित सिंहांच्या या ओळी एका प्रेमीयुगुलानं खऱ्या ठरवल्या आहेत. प्रेम आंधळं असतं, प्रेमात सारं काही माफ असतं, हे आपण नेहमीच ऐकतो. प्रेम करणाऱ्यांसाठी सगळं जग एकीकडे असतं आणि ते आणि त्यांचं प्रेम एकीकडे. मग आपलं प्रेम मिळवण्यासाठी संपूर्ण जगाशी झगडावं लागलं तर बेहत्तर, ते कायम तयार असतात. असंच काहीसं प्रकरण बिहारमधल्या (Bihar Crime) गोपाळगंज (Gopalganj) जिल्ह्यात समोर आलं आहे. वाचा सविस्तर...

Ulhasnagar Firing : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी पोलीसच साक्षीदार, जखमी महेश गायकवाडांवर आयसीयुमध्ये उपचार

BJP MLA Ganpat Gaikwad Firing : उल्हासनगरमधील (Ulhasnagar) हिल लाईन पोलीस (Hill Line Police Station) ठाण्यातील (Thane) गोळीबार (Firing) प्रकरणी पोलीसच (Police) साक्षीदार (Witness) बनले आहेत. भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडसह (Mahesh Gaikwad) राहुल पाटील (Rahul Patil) यांच्यावर गोळीबार (Firing) केला होता. महत्त्वाचं म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांसमोरच ही गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे आता या प्रकरणी उपस्थित सर्व पोलिसांचे जबाब नोंदवले जाणार आहेत. वाचा सविस्तर...

ब्रिटनचे किंग चार्ल्स III यांना कर्करोगाचं निदान; बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी करत माहिती

Britain King Charles Diagnosed With Cancer: ब्रिटनचा राजा चार्ल्स तिसरा (Britain King Charles) यांना कर्करोगाचं निदान झालं आहे.  बकिंघम पॅलेसनं (Buckingham Palace) एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. बकिंगहॅम पॅलेसनं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राजा चार्ल्स तिसरा कर्करोगानं ग्रस्त आहे. प्रोस्टेट ग्रंथीची (Prostate Cancer) तपासणी केली असता, त्यांना कर्करोग झाल्याचं निष्पन्न झालं. मात्र, कर्करोगाचा प्रकार समोर आलेला नाही. हा कर्करोग कोणत्या प्रकारचा आणि शरीराच्या कोणत्या भागांत आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वाचा सविस्तर...

IND U19 vs SA U19 World Cup : कमऑन टीम इंडिया... सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकाविरोधात आज काटें की टक्कर

Indian Cricket Team In U19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषकात भारतीय युवा (Team India) संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वातील भारतीय संघासमोर आज यजमान दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असेल. सेमीफायनलच्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये लढत होणार आहे. भारतीय संघाने सलग पाच सामन्यात विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आज दुपारी दीड वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये लढत होणार आहे. भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जातेय. वाचा सविस्तर...

Horoscope Today 6 February 2024 : या राशींना करिअरमध्ये नव्या संधी, रखडलेली कामे मार्गी लागणार, वाचा मंगळवारचे राशिभविष्य

Horoscope Today 6 February 2024 :  आजचं माझं  भविष्य काय? आज  काय होणार?  किंवा आजचा  आपला दिवस कसा असणार प्रत्येक जण कधी ना कधी हा विचार करतच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच  भविष्यात काय होणार हे जाणून घेण्याची प्रबळ इच्छा असते. यासाठीच  आपल्या राशी आपल्याला मदत करतात. आज मेष ते मीन राशीमध्ये काय लिहीले आहे. कोणासाठी  आजचा दिवस कोणासाठी शुभ किंवा  अशुभ कोणासाठी हे  समजण्यासाठी आजचे राशीभविष्य सविस्तर वाचा...

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Pune NCP Protest : ड्रग्ज प्रकरणाविरोधात पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमकTOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 10 AM :  ABP MajhaABP Majha Headlines :  10:00AM : 25 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सGanpatipule Beach: गणपतीपुळे समुद्रकिनारी गर्दी; प्रशासनाकडून सतर्कतेचे फलक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच
Mumbai Accident: मुंबईत कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
कोस्टल रोडच्या कामासाठी जाणारा ट्रक काळ बनून आला, दोरी तुटून लोखंड डोक्यात पडलं, फुटपाथवरुन चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू
Mumbai Rains : मुंबईत जोरदार पावसाचं कमबॅक कधी?  समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
मुंबईत पाऊस कधी वेग पकडणार? समुद्राला दोन दिवस भरती ओहोटी, मोठी अपडेट समोर
Marathi Serial Updates Tu Bhetashi Navyane : छोट्या पडद्यावर  नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
छोट्या पडद्यावर नव्वदीचा नॉस्टेल्जीया, सुबोध भावे-शिवानीचा मालिकेत हटके लूक
NEET Paper Leak Case : मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
नीट पेपर फुटी प्रकरणात दुसरी अटक; फरार जिल्हा परिषद शिक्षकाला बेड्या, इतर दोघांचा शोध सुरू
MLC Election : काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेवर कुणाला संधी,  कोणत्या नेत्यांची नावं चर्चेत?
महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभेची रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत, विधानपरिषदेचा फैसला होणार? कुणाला संधी
Munjya Box Office Collection Day 18 :  बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना,  18 व्या दिवशी किती केली कमाई?
बॉक्स ऑफिसवरून 'मुंज्या'चं भूत उतरेना, 18 व्या दिवशी किती केली कमाई?
Pirates Of the Caribbean actor Tamayo Perry Dies :  सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा...
सर्फिंग करताना शार्कचा हल्ला, अभिनेत्याचा मृत्यू, सिनेसृष्टीवर शोककळा...
Embed widget