Morning Headlines 5th April : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
मोठी बातमी! महाराष्ट्राच्या मतदारराजाचा कौल कोणाला? मैदान कोण मारणार? ABP माझा आणि सी-व्होटर सर्वेचा धक्कादायक निष्कर्ष
Lok Sabha Election 2024 C Voter Survey : मुंबई : लोकसभेच्या निवडणुकांना (Lok Sabha Election 2024) आता रंग भरतोय. राजकीय पक्ष आणि आघाड्यांकडून उमेदवारांची रोजच्या रोज घोषणा होत आहे. अशा परिस्थितीत मतदारराजा काय विचार करतोय? तो कोणाला मतदान करणार आहे? काय आहे मतदारांच्या मनात? हे सारं एबीपी माझा (ABP Majha) आणि सी व्होटरनं (C Voter) जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचा मूड काय? ते गेल्या मार्च महिन्यात आम्ही पाहिलं होतं, आता पुन्हा एप्रिल महिन्यात महाराष्ट्राचा मतदार काय विचार करतोय? याचा निष्कर्ष आता समोर आला आहे. महाराष्ट्रातल्या मतदारांना आम्ही सात विविध प्रश्नांची उत्तरं विचारली होती. त्याची उत्तरं काय काय आलीत, हे सविस्तर पाहुयात... वाचा सविस्तर
Chandrashekhar Bawankule : मतं मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये; बावनकुळेंची नाना पटोलेंवर खोचक टीका
Chandrashekhar Bawankule On Nana Patole : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे (Sanjay Dhotre) यांच्याबद्दल नाना पटोलेंनी (Nana Patole) केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मतं मिळविण्यासाठी नाना पटोलेंनी गिधाडांच्या वृत्तीनं वागू नये आणि नाना पटोलेंनी घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चींतू नये असे म्हणत बावनकुळेंनी नाना प्तीले यांचा समाचार घेतला आहे. 'अकोल्याचे भाजप खासदार व्हेंटिलेटरवर, केव्हा काढतील माहिती नाही, मात्र निवडणुकीतच त्यांचा व्हेंटिलेटर काढतील, असे वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केले होते. वाचा सविस्तर
Rashmi Barve On BJP : भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण; उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंचा हल्लाबोल, नेमका रोख कुणाकडे?
Rashmi Barve On BJP : नागपूर : भाजपच्या (BJP) एका बड्या नेत्यानं माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप, महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरलेल्या आणि जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे उमेदवारी अर्जही बाद ठरलेल्या रश्मी बर्वे (Rashmi Barve) यांनी केला आहे. तसेच, पुढे बोलताना, "त्यावेळी नागपुरातील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता", असाही गंभीर आरोप नाव न घेता रश्मी बर्वेंनी भाजप नेत्यांवर केला आहे. वाचा सविस्तर
संजय निरुपम शिंदेंची साथ देणार? उत्तर पश्चिमसाठी चाचपणी सुरू, शरद पोंक्षे, सचिन पिळगांवकरांच्या नावांचीही चर्चा
May Sanjay Nirupam Join Shiv Sena Shinde Group : मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) जागावाटपचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाही, तर दुसरीकडे नाराजी नाट्य संपण्याची चिन्ह नाहीत. मुंबईतील (Mumbai News) उत्तर पश्चिम लोकसभा (Mumbai North West Lok Sabha Election 2024) निवडणूक ठाकरे गट (Thackeray Group) लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना (Amol Kirtikar) उमेदवारीही जाहीर केली आहे. मात्र, उत्तर पश्चिमवर ठाकरेंनी केलेल्या दाव्यानं काँग्रेस (Congress Leader) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) नाराज झाले आहेत. तसेच, ते लवकरच वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्यातं बोललं जात आहे. संजय निरुपमांनी काल (गुरुवारी) काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तसेच पक्षाकडूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता संजय निरुपम काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. वाचा सविस्तर
राम कृष्ण हरी! आज पापमोचनी एकादशी, पांडुरंगाच्या कृपेने या राशीच्या लोकांना भाग्य देईल साथ; जाणून घ्या 12 राशींचे भविष्य
Horoscope Today 5 April 2024 : पंचांगानुसार, आज 5 एप्रिल 2024, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशीच्या लोकांच्या जीवनात आज अडथळा येऊ शकतो, तर काहींचं जीवन सहज सोपं असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार कसा राहील? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या... वाचा सविस्तर