एक्स्प्लोर

Morning Headlines 29th September: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

भारताने नेमबाजीत सुवर्णपदक जिंकले, 50 मीटर रायफलमध्ये विश्वविक्रम मोडला 

नेमबाजीत भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले आहे., पुरुष संघाने 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये सुवर्णपदक जिंकले. भारतीय खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. चीनचा संघ दुसऱ्या क्रमांकावर राहिला.  आशियाई क्रीडा 2023 मधील भारताचे हे सातवे सुवर्णपदक आहे.  (वाचा सविस्तर)

कावेरी पाणी प्रश्न पेटला; पाणी तमिळनाडूला दिल्याच्या निषेधार्थ कर्नाटक बंद, कन्नड समर्थक आणि शेतकरी संघटनांचा पाठिंबा 

 कावेरीचे पाणी (Cauvery River) तामिळनाडूला  (Tamil Nadu)  सोडल्याच्या निषेधार्थ कन्नड समर्थक आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी (29 सप्टेंबर) कर्नाटक बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्याच्या दक्षिण भागात सामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. (वाचा सविस्तर) 

उज्जैनमध्ये 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं खळबळ, या प्रकरणात मागील 48 तासांत काय-काय घडलं? 

 मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) 'महाकाल' नगरी उज्जैनमध्ये (Ujjain) एका 12 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Minor Girl Rape Case) झाल्याच्या घटनेनं संपूर्ण देश (Crime News) हादरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित अल्पवयीन मुलगी अर्धनग्न अवस्थेत मदतीसाठी दारोदार फिरत होती.  मात्र, नागरिकांनी तिला मदत केली नाही. निर्दयी लोकांनी माणुसकीला काळीमा फासला. रक्तबंबाळ अवस्थेत अल्पवयीन मुलीने आठ किलोमीटरचं अंतर पायी कापलं. (वाचा सविस्तर)

.....तर पंतप्रधान राजीनामा देणार का? अरविंद केजरीवाल यांचे PM मोदींना खुले चॅलेंज  

 लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर शाब्दिक हल्ले अधिक तीव्र केले आहेत. नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या सिव्हिल लाइन्स येथील सरकारी बंगल्याच्या बांधकामातील अनियमिततेच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच गृह मंत्रालयाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिले. (वाचा सविस्तर)

'पंडित नेहरु देशाचे पहिले पंतप्रधान नाहीत, तर...', भाजप आमदाराच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटलं

 भाजप आमदाराने (BJP MLA) पंडित जवाहलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू नाहीत, असं वक्तव्य आता भाजप आमदार बासनगौडा पाटील यत्नाल (Basangouda Patil Yatnal) यांनी केलं आहे. कर्नाटकमधील (Karnataka) भाजप आमदार (BJP MLA) बासनगौडा पाटील यत्नाल नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे (Former Prime Minister of India) चर्चेत असतात. (वाचा सविस्तर)

 ठाणे, रायगडसह रत्नागिरीत पावसाची हजेरी; IMD कडून येलो अलर्ट जारी

राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी (Monsoon) पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाने आज ठाणे (Thane), रायगड (Raigad) सह रत्नागिरीला (Ratnagiri) पावसाचा येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. आज महाराष्ट्रात (Maharashtra) काही ठिकाणी जोरदार पावसाची (Rain) शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. (वाचा सविस्तर)

उरी हल्ल्याचा बदला, भारताचा पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक, इस्त्रायल-अरब वादाचा बाल्फोर करार; आज इतिहासात 

भारताच्या इतिहासात आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजच्याच दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर 2016 रोजी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करत अनेक दहशतवादी तळे उद्ध्वस्त केली होती. आजच्या दिवशी इतिहासात इंग्लंडमध्ये जगातील पहिल्या मॅरेजची स्थापना करण्यात आली होती. तसेच मद्रास चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीची स्थापनाही आजच्या दिवशी करण्यात आली होती. (वाचा सविस्तर)

मिथुन, कन्या, कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य 

आज शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मेष राशीचे लोक आज आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील. तर, तूळ राशीच्या लोकांच्या मनात काही नकारात्मक विचार येतील. तसेच, इतर राशीच्या लोकांसाठी आजचा शुक्रवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.  (वाचा सविस्तर)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Maharashtra Weather Update: राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल,  हवामान विभागानं काय दिला अंदाज?
राज्यात येत्या 24 तासांत पुढील 3 दिवसांसाठी तापमानात मोठा बदल, हवामान विभागानं काय दिला अंदाज?
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
Guess Who: लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
लेकाला बॉलिवूड 'किंग' बनवण्यासाठी बापानं गहाण ठेवलेलं घर अन् गाड्या; डेब्यू फिल्मनं रातोरांत बनला 'सुपरस्टार'
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, 2100 रुपये कधीपासून मिळणार? राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केलं
सरकार लाडक्या बहिणींना दूर करणार नाही, राधाकृष्ण विखे पाटलांचं 2100 रुपयांबाबत मोठं वक्तव्य
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Embed widget