Morning Headlines 28th August : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील
भालफेकीत भारताच्या नीरज चोप्राचं पुन्हा दैदिप्यमान यश, जागतिक अॅथेलेटिक्स स्पर्धेत नीरजची सुवर्णपदकाची कमाई
भालाफेक प्रकारातला भारताचा ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा आता विश्वविजेताही ठरला आहे. त्यानं बुडापेस्टमधील जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केलीय. जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिला भारतीय अॅथलीट ठरला, हे विशेष. नीरज चोप्रानं दुसऱ्या प्रयत्नात फेकलेला भाला तब्बल ८८.१७ मीटर्स अंतरावर लॅण्ड झाला आणि तीच स्पर्धेतली सर्वोत्तम कामगिरी ठरली. या सर्वोत्तम कामगिरीनं नीरज चोप्राला कारकीर्दीतलं दुसरं मोठं यश मिळवून दिलं. (वाचा सविस्तर बातमी)
फक्त भारताकडेच चंद्राचा सर्वात जवळचा फोटो', चाचण्यांसदर्भातही इस्रो प्रमुखांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती
भारत (India) आता चंद्रावर पोहोचला आहे. 23 ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे. याच दरम्यान इस्रो (ISRO) प्रमुख एस सोमनाथ यांनी भारताकडे चंद्राचे (Moon) सर्वोत्तम फोटो असल्याचं म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, केरळमधील तिरुवनंतपुरममधील एका कार्यक्रमामध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, "आपल्याकडे चंद्राचा सर्वात जवळचा फोटो आहे आणि तो जगात कोणाकडेही नाही. (वाचा सविस्तर बातमी)
चंद्रावर भारत-चीन आमनेसामने येणार? भारताचा प्रज्ञान आणि चीनचा युतू 2 या दोन रोव्हरमध्ये नेमकं किती अंतर? समोर आली 'ही' माहिती
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने ऐतिहासिक कामगिरी करत जगाचे लक्ष वेधून घेतलं आहे. याशिवाय चंद्रावर उतरण्याबरोबरच भारताने एक रोव्हरही पाठवला आहे. भारताचा प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) हा चंद्रावर उपस्थित असलेल्या दोन रोव्हरपैकी एक आहे. दुसरा रोव्हर हा भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी चीनचा आहे. युतु-2 असे या रोव्हरचे नाव आहे. हे दोन रोव्हर ऐकमेकांसमोर येतील का? समोरासमोर आले तर काय होईल? असे प्रश्न उपस्थित होत आहे. (वाचा सविस्तर बातमी)
'गगनयान' अंतराळ मोहिमेआधी इस्रोचा मोठा निर्णय; 'व्योममित्र' रोबोट पाठवणार अंतराळात
इस्रोने आता 'गगनयान' मोहिमेची तयारी सुरू केली आहे. गगनयान (Gaganyaan) मोहीम इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहीम असेल. या मोहिमेद्वारे अंतराळवीर पाठवण्याची तयारी सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्यात येणार आहे. परंतु याआधी इस्रोकडून मोहिमेची चाचणी होईल. इस्रो लवकरच गगनयानचं ट्रायल मिशन लाँच करणार आहे, ज्यात मानवाआधी रोबोटला अंतराळात पाठवलं जाईल. (वाचा सविस्तर बातमी)
भारताच्या पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रम मोडला, महिला 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 व्या स्थानावर
भारताच्या पारुल चौधरीने (Parul Chaudhary) हंगेरी येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 (World Athletics Championships) मध्ये महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये 11 वे स्थान मिळविले. त्यात तिने 9:15.31 च्या वेळेसह नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे. (वाचा सविस्तर बातमी)
शाब्बास पोरी! गणिताच्या पेपरात कमी गुण तरीही आईला लेकीचं कौतुक; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
सध्या सोशल मीडियावरची (Social Media) एक पोस्ट मात्र सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे. एका मुलीने ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये या मुलीने तिची इयत्ता सहावीमधील एका विषयाचे फोटो शेअर केले आहेत. या मुलीला गणितात कमी गुण मिळाले आहेत. तिच्या आईने त्यावर स्वाक्षरी केलीच पण काही प्रोत्साहनपर शब्द देखील लिहिले आहेत. (वाचा सविस्तर बातमी)
वृषभ, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचं राशीभविष्य
आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आज मेष राशीच्या लोकांना आपल्य तब्येतीची थोडी काळजी वाटू शकते, पोटाशी संबंधित काही आजारामुळे तुम्ही त्रस्त होऊ शकता. तर, धनु राशीच्या लोकांची व्यवसायात चांगली प्रगती होईल. एकूणच, मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवार कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य.
(वाचा सविस्तर बातमी)
इस्रोचे माजी अध्यक्ष एमजी मेनन यांचा जन्म, लेखक व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन; आज इतिहासात...
इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी ठरल्या आहेत. भारतीय पदार्थवैज्ञानिक आणि इस्रोचे माजी अध्यक्ष एम. जी. के. मेनन यांचा आज जन्मदिन आहे. लेखक, चित्रकार व्यंकटेश माडगूळकर यांचा आज स्मृतीदिन आहे. (वाचा सविस्तर बातमी)