एक्स्प्लोर

Morning Headlines 23rd January: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Ram Mandir Darshan: आजपासून प्रभू श्रीरामाचं दर्शन सर्वांसाठी खुलं, दिवसातून तिनदा होणार आरती, कडाक्याच्या थंडीतही मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी

Ram Mandir: अयोध्या : देशाविसायांचं तब्बल 500 वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं आणि प्रभू श्रीराम (Shree Ram) अयोध्येतील भव्य राम मंदिरात विराजमान झाले. काल (सोमवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते प्रभू श्रीरामाचा भव्य अभिषेक सोहळा पार पडला. अभिषेक सोहळ्यानंतर आज अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झालेल्या प्रभू रामचंद्राचं दर्शन सर्वसामान्यांना घेता येणार आहे. रामभक्त आजपासून मंदिरात जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. अभिषेक सोहळा संपन्न झाल्यापासूनच दर्शनासाठी रामभक्तांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या अयोध्येतील पारा 6 अंशावर आहे. अत्यंत कडाक्याच्या थंडीतही भाविकांनी श्रीरामाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. वाचा सविस्तर

चीनमध्ये 7.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; राजधानीही हादरली, दिल्लीकर धास्तावले

Delhi Earthquake Reactor Scale: नवी दिल्ली : भूकंपाच्या धक्क्यांनी चीन (China) सोमवारी रात्री उशिरा हादरुन गेलं. चीनमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 7.2 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली होती, भूकंपाचे धक्के एवढे जोरदार होतो की, याची तीव्रता थेट भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली. सोमवारी रात्री उशीरा दिल्लीकरांनाही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाच्या धक्क्यांनी दिल्ली हादरली, भूकंपाचं केंद्र नेपाळ-चीन सीमेजवळ असल्याचं सांगितलं जात आहे. भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता एवढी होती की, लोक घाबरुन आपल्या घरांच्या बाहेर पडले. वाचा सविस्तर 

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ? आंतरराष्ट्रीय बाजारात चढउतार, लेटेस्ट दर पाहा

Gold Silver Rate Today, 23 January 2024 : आज मंगळवारी सोन्याचे भाव स्थिर आहेत. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा दर स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गुडरिटर्न्स वेबसाईटनुसार, आज मंगळवारी 24 कॅरेट सोन्याची किंमत 6397.0 रुपये प्रति ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 5780 रुपये प्रति ग्रॅम आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 6305 रुपये प्रतिग्रॅम आहे. वाचा सविस्तर 

Reliance Share Price: रिलायन्सचा 'हा' स्टॉक घ्या अन् मालामाल व्हा; देऊ शकतो तब्बल 24 टक्क्यांपर्यंतचा रिटर्न

Reliance Industries Share Price: मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) गेल्या तिमाहीचे रिझल्ट्स समोर आले आहेत. हे रिझल्ट्स गेल्या आठवड्यात 19 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आले. त्यानंतर ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजनं (Elara Securities) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या स्टॉकची टार्गेट प्राईज (Reliance Industries Stock Target Price) वाढवली आहे. इलारा सिक्युरिटीजनं गुंतवणूकदारांना रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर (Reliance Industries Shares) खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या लेव्हलपासून सुमारे 24 टक्क्यांच्या उसळीसह रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आलाय. वाचा सविस्तर 

Maharashtra Weather : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट! विदर्भात पावसाची हजेरी, पुढील 24 तासांत वरुणराजा बरसणार

Maharashtra Weather Update : एकीकडे उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी (Cold Weather) पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्रात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर भारतात थंडीचा गारठा (Winter) वाढत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड (Cold Wave) वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यातच पुढील 48 तासांत महाराष्ट्रात काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. हवामानात अचानक बदल झाल्याने महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं सावट आहे. गेले दोन दिवस विदर्भातील काही शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वाचा सविस्तर 

Weather Update : उत्तर भारतात थंडीचा कडाका! दक्षिण भारतासह महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, आजचं हवामान कसं असेल?

IMD Weather Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, उत्तर भारतातील अनेक राज्यांसाठी थंड लाट आणि दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 ते 4 दिवस थंडीचा कडाका वाढणार असून धुक्याची शक्यताही कायम आहे.  दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या भागात तापमानात घट होताना पाहायला मिळणार आहे. कडाक्याची थंडी आणि थंड लाटेचे प्रतिकूल परिणाम शेतीवरही दिसून येत असून जनजीवनही विस्कळीत झालं आहे. दाट धुक्यामुळे दृष्यमानता कमी होऊन नागरिकांचं पहाटे घराबाहेर पडणं कठीण झालं आहे. धुक्यामुळे ट्रेन आणि विमान उड्डाणेही उशिराने सुरु आहेत. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget