एक्स्प्लोर

Morning Headlines 21st August : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

मुंबईच्या बैठकीत 'INDIA' आघाडीला नवा लोगो मिळण्याची शक्यता

मुंबई : लोकसभा निवडणूक 2024 ची रणनीती आखण्यासाठी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या घटकपक्षांची मुंबई 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान इंडिया आघाडीचा लोगो जारी केला जाण्याची शक्यता आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने रविवारी 20 ऑगस्ट ही माहिती दिली. वाचा सविस्तर

'अब तो ना गरजता है, ना बरसता है'; हवामान विभागाच्या अंदाजानंतरही पावसाची दडी

Rain Update : यंदा पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यात जुलै महिन्यात तुरळक पाऊस  झाला. त्यात आता ऑगस्ट महिना देखील कोरडा जात असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रविवारी मराठवाड्यासह विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मात्र, मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची दडी पाहायला मिळत असून, हवामान विभागाच्या अंदाजानंतर देखील पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, 'अब तो ना गरजता है, ना बरसता है' असे म्हणण्याची वेळ आली आहे. वाचा सविस्तर

कांद्याचा बफर स्टॉक केंद्रानं दोन लाख टनांनी वाढवला,  25 रुपये किलो दराने कांदा विकणार  NCCS

मुंबई : कांद्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. केंद्राने रविवारी कांद्याचा बफर स्टॉक तीन लाख टनांवरून पाच लाख टनांपर्यंत वाढवला आहे. NCCF मार्फत आजपासून 25 रुपये प्रति किलो दरानं कांदा विकण्यात येणार आहे. बफर स्टॉकमधून कांद्याची विल्हेवाट लावण्यास केंद्र सरकारनं सुरुवात केली आहे. जेथे किरकोळ किमती अखिल भारतीय सरासरीपेक्षा जास्त आहेत, अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील प्रमुख बाजारपेठांमध्ये NCCF मार्फत कांदा विकण्यात येणार आहे. आजपर्यंत, बफरमधून सुमारे चौदाशे टन कांदा बाजारपेठेत पाठवले गेला आहे. वाचा सविस्तर

India-China: लडाखच्या पूर्व भागातील परिस्थिती सुधारण्यासाठी भारत आणि चीन प्रयत्नशील, दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु

भारत : भारत आणि चीनच्या सीमेवर म्हणजेच एलएसी भागामध्ये तणावपूर्वक वातावरण निर्माण झाल्यानंतर आता सकारात्मक संकेत मिळत असल्याचं चित्र सध्या आहे. डेमचोक आणि डेपसांग मैदानावर प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवर दोन्ही देशांकडून 'मॅरेथॉन चर्चा'  करण्यात येत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या पूर्व भागातील समस्या सोडवण्यासाठी दौलत बेग ओल्डी आणि चुशुल मेजर आणि जरनल स्तरावर शुक्रवार (18 ऑगस्ट) पासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. वाचा सविस्तर

Petrol-Diesel Price: तुम्ही गाडीची टाकी फुल्ल करण्याचा विचार करताय? जरा थांबा, आजचे दर जाणून घ्या!

कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या सात आठवड्यांपासून कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस बाजारात मंदीचं सावट दिसून आलं. यासाठी चीनची सुस्त अर्थव्यवस्था जबाबदार धरली जात आहे. पण गेल्या आठवड्यातील शेवटचा व्यापार दिवस म्हणजे, शुक्रवारी पुन्हा एकदा दरांत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. वाचा सविस्तर

आजपासून कांद्याची अनुदानित 25 रुपयांनी विक्री, मुंबईत प्लॅस्टिक पिशवी बंद; आज दिवसभरात

21st August Headlines: आज दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. आजपासून कांद्याची अनुदानित 25 रुपयांनी विक्री होणार आहे. मुंबईत आजपासून मुंबईत प्लॅस्टिक पिशवी बंद असणार आहे. केंद्राने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर संतप्त शेतकरी आंदोलन करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्या आजपासून बेमुदत बंद असणार आहेत. वाचा सविस्तर

वृषभ, कर्क, धनु राशीच्या लोकांनी आज 'या' चुका टाळा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 21 August 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज मेष राशीचे लोक धार्मिक यात्रेला जाण्याचा विचार करतील. तर, सिंह राशीच्या लोकांसाठ आजचा दिवस उत्साही असणार आहे. तुम्ही तुमची ऊर्जा योग्य कामात लावणं गरजेचं आहे, नाहीतर अडचणी येऊ शकतात. एकूणच मेष ते मीन राशीसाठी आजचा सोमवारचा दिवस कसा असणार आहे? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर

महाराष्ट्राचे तेरावे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म, ख्यातनाम सनईवादक बिस्मिल्ला खान यांचं निधन; आज इतिहासात

21st August In History: आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राचे 13वे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्म आजच्या दिवशी झाला, त्यांना 'जलनायक' म्हणून संबोधलं जातं. ख्यातनाम सनईवादक बिस्मिल्ला खान यांचं निधन आजच्या दिवशी झालं. आजच्या दिवशी इतर कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया. वाचा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ?Pooja Khedkar Special Report : खेडकर कुटुंबाची मुंडे प्रतिष्ठानला लाखोची देणगी ?Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
Embed widget