एक्स्प्लोर

Morning Headlines 19th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Underworld Don Dawood Ibrahim: "भाई 1 हजार टक्का फीट, मौत की अफवाहें गलत"; दाऊदचा हस्तक छोटा शकीलचा दावा

UnderWorld Don Dawood Ibrahim: बारा मुल्कों की पुलिस किसको ढूंढ रही है... हे वाक्य गेल्या कित्येत दिवसांपासून फक्त एकाच व्यक्तीला लागू होतं, ती व्यक्ती म्हणजे, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld Don Dawood Ibrahim). तब्बल दोन दिवसांपासून जगभरात फक्त एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे, दाऊद (Dawood Ibrahim). मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोस्टवॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला असून तो कराचीमधील (Karachi) रुग्णालयात दाखल आहे, असं सोशल मीडियावर बोललं जात आहे. तेव्हापासूनच सोशल मीडियासह जगभरात खळबळ माजली आहे. नेमकं खरं काय? खोटं काय? याचा शोध जगभरातील एजन्सीकडून घेतला जात आहे. अशातच दाऊद इब्राहिमबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दाऊद अगदी ठणठणीत असून त्याला काहीच झालेलं नाही, त्याच्या मृत्यूच्या बातम्याही अगदी खोट्या असल्याचा दावा समोर आला आहे. वाचा सविस्तर 

Ram Mandir: 1 किलो सोनं, 7 किलो चांदी आणि अनमोल रत्नांनी सजवल्या रामलल्लाच्या पादुका; समोर आला फोटो

Ram Mandir Inauguration:  तब्बल 1 किलो सोनं आणि 7 किलो चांदीचा वापर करत श्रीरामाच्या (Ram Mandir) पादुका तयार करण्यात आल्या आहेत. या पादुका सध्या एसजी हायवेवरील तिरूपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला  राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्याआधी 19 तारखेलाच या पादुका अयोध्येत (Ayodhya)  दाखल होतील. हैदराबादमधील श्री चल्ला श्रीनिवास शास्त्री यांनी या पादुका तयार केल्या आहेत. तर सोन्या चांदी व्यतिरीक्त या पादुका तयार करताना बहुमुल्य रत्नांचा त्यात वापर करण्यात आला आहे. रविवारी पादुका रामेश्वरधामहून अहमदाबादला आणण्यात आल्या होत्या. वाचा सविस्तर 

Horse Market : देशातील सर्वात जुन्या सारंगखेडा घोडेबाजाराला 21 डिसेंबरला सुरुवात, आतापर्यंत 700 हून अधिक घोडे दाखल

नंदुरबार :  देशातील सर्वात मोठा अश्वबाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा (Sarangkhda)  इथल्या घोडेबाजाराला 21 डिसेंबरपासून सुरुवात होत आहे. या घोडेबाजाराचं खास वैशिष्ट्य असलेल्या चेतक फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यावर्षीच्या  फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या अश्व स्पर्धा आणि प्रीमियर लीग. देशभरातून घोडे (Horse)  विक्रीसाठी इथे दाखल होत असतात. घोड्यांच्या खरेदी-विक्रीतून मोठी उलाढाल होत असते. आतापर्यंत जवळपास 700  पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत. वाचा सविस्तर 

'मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला, तुम्ही तुमच्या भावावर ठेवलात का?', आभार मानणाऱ्या उद्धव ठाकरेंना शर्मिला ठाकरेंचं प्रत्युत्तर

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची (Sushant Singh Rajput)  मॅनेजर दिशा सॅलियनच्या (Disha Salian) गूढ मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे. . या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणेंकडून सातत्यानं ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आदित्य असं काही करेल असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)  शर्मिला ठाकरेंचे (Sharmila Thackeray)  आभार मानले आहेत. तर उद्धव ठाकरेंनी मानलेल्या आभारावरुन शर्मिला ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय.  मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवलात का? असा सवाल शर्मिला ठाकरेंनी केली आहे. वाचा सविस्तर 

China Earthquake: चीन हादरलं; 6.2 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे मोठा विध्वंस, 111 जणांचा मृत्यू

China Earthquake: चीनच्या (China) गान्सू (Gansu) प्रांतात सोमवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के (Strong Earthquakes) जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नं दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास उत्तर-पश्चिम चीनच्या गान्सू प्रांतात भूकंप झाला. गान्सूच्या प्रांतीय आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं सांगितलं की, भूकंपाची तीव्रता इतकी होती की, अनेक इमारती कोसळल्या. चीनच्या सरकारी मीडिया रिपोर्टनुसार, गांसू आणि किंघाई प्रांतात 6.2 तीव्रतेच्या भूकंपात किमान 111 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 230 हून अधिक जखमी झाले आहेत. प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. वाचा सविस्तर 

IPL 2024 Auction Updates: आयपीएल लिलावापूर्वी मोठी बातमी; 'या' 3 स्टार खेळाडूंनी नावं घेतली मागे

IPL 2024 Auction Updates: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) साठी मिनी लिलाव (IPL Auction) आज (मंगळवार, 19 डिसेंबर) दुबई येथे होणार आहे. हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल, ज्यामध्ये 215 अनकॅप्ड खेळाडूंसह एकूण 333 खेळाडूंवर बोली लावली जाईल. मात्र, या लिलावाच्या एक दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. वाचा सविस्तर 

19th December In History : काकोरी कटातील क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा, गोवा मुक्ती दिन; आज इतिहासात

19th December In History : आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. स्वातंत्र्य चळवळीत गाजलेल्या काकोरी कटातील  क्रांतिकारक  राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने आजच्याच दिवशी 1927 मध्ये फाशी दिली होती. आजच्या दिवशी स्वतंत्र भारताने पोर्तुगिजांच्या राजवटीतून गोवा मुक्त करत स्वतंत्र केला. तर, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आज वाढदिवस आहे. वाचा सविस्तर 

Horoscope Today 19 December 2023 : आजचा मंगळवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य

Horoscope Today 19 December 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 19 डिसेंबर 2023 मंगळवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीचे लोक आज बदलते हवामान टाळा, अन्यथा सर्दी, ताप इत्यादी त्रास देऊ शकतात. कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती आज चांगली राहील. इतर प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. सर्व राशीच्या लोकांसाठी मंगळवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या... वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 19 January 2024Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Embed widget