एक्स्प्लोर

Morning Headlines 14th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

पंतप्रधान मोदींचा आज मुंबई दौरा, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सत्राचं उद्घाटन, 40 वर्षांनी भारताकडे यजमानपद

PM Modi Mumbai Visit Today : मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज संध्याकाळी मुंबई (Mumbai News) दौऱ्यावर येतायत. संध्याकाळी 5 वाजता मोदींचं मुंबई विमानतळावर आगमन होईल. तिथून ते बीकेसीमधील जिओ वर्ल्डच्या कार्यक्रमाला जातील आणि हा कार्यक्रम आटोपल्यावर नरेंद्र मोदी पुन्हा नवी दिल्लीला रवाना होतील. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं (International Olympic Committee) अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. वाचा सविस्तर 

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात नेहमीच राडा; गंभीर- आफ्रिदीपासून भज्जी-अख्तरपर्यंत, मैदानातील पाच मोठे वाद

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्या सामन्याला खूप महत्वं दिलं जातं. पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन देशांमध्ये होणाऱ्या सामन्यांमध्ये उत्साह आणि रोमांच शिगेला पोहोचलेला असतो. त्यामुळं क्रिकेटप्रेमींमध्ये हा सामना सर्वाधिक लोकप्रिय आहे. या लोकप्रियतेमुळंचं दोन्ही देशांदरम्यान, कायम अत्यंत तणावाच्या वातावरणात सामना खेळला जातो. जेव्हा दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरतात, त्यावेळी क्रिकेट सामन्याच्या व्यतिरिक्त दोन्ही संघातील खेळाडूतही बऱ्याच वेळा वाद झाल्याचं पाहायला मिळालं. यातील काही असेही वाद आहेत, जे अजूनही कोणीच विसरू शकलेलं नाही. त्याबाबत जाणून घेऊयात... वाचा सविस्तर

Astrology : आज भारत-पाकिस्तान सामना कोण जिंकणार? शनि, गुरू, राहूची सावली, ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घ्या

India Pakistan Match Astrological Prediction : भारत-पाकिस्तान (India Vs Pakistan) सामना नेहमीच रोमांचक राहिला आहे. कारण केवळ हे दोन देशच नाही, तर जगभरातील देशांचे लक्ष या सामन्यावर असते. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवल्यानंतर आता भारताचा सामना 14 ऑक्टोबर 2023 म्हणजेच आज शेजारी देश पाकिस्तान संघाशी होणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशी ग्रहांची स्थिती काय असेल? या सामन्यासाठी ज्योतिषीय गणना काय सांगते? जाणून घ्या... वाचा सविस्तर 

Mahadev App Case: महादेव अॅप प्रकरणी गुन्हा दाखल झाला, तरही जुगार सुरूच, अॅप्सवर बंदी का नाही?

Mahadev Online Gaming App Case: महादेव बुक अॅप प्रकरणी (Mahadev App Case) आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. महादेव बुक अॅप आणि त्यासंबंधित विविध बुक अॅपवर आजही अवैध ऑनलाईन जुगाराचा धंदा (Online Gaming App) सुरूच आहे. त्यामुळे या विविध अ‍ॅप्सवर कोणतंही बंधन किंवा बंदी का नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल होऊन या अॅप चालवणाऱ्यांवरील कारवाईनंतरही हे अॅप्स अजूनही सोशल मीडियावर सक्रीय आहेत. आज विशेष म्हणजे, टीम इंडिया-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या जुगारासाठी जास्त प्रमाणात जाहिरात केली गेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जुगार खेळा जाणार आहे. आम्ही सोशल मीडियावर हे अॅप सर्च केलं आणि प्रत्येक अॅपमध्ये आजच्या भारत-पाकिस्तान सामन्याची जाहिरात असल्याचं आढळलं. वाचा सविस्तर 

Israel-Hamas War : मृत्यूच्या दाढेतून परतली! गाझामधील सुटकेनंतर भारतात परतलेल्या महिलेनं सांगितलं युद्दाचं धक्कादायक वास्तव

Israel-Palestine Conflict : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यात घनघोर युद्द सुरु आहे. दिवसेंदिवस त्यांच्यातील तणाव आणखी वाढताना दिसत आहे. 7 ऑक्टोबरला सुरु झालेल्या युद्धात आतापर्यंत 3000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीवर इस्रायलकडून जोरदार प्रतिहल्ले सुरु आहेत. इस्रायलने गाझामधील नागरिकांना तेथून पलायन करण्यास सांगितलं. यानंतर अनेक नागरिकांनी गाझा सोडलं. इस्रायलच्या इशाऱ्यानंतर एका भारतीय महिलेनेही आपल्या कुटुंबासह गाझा सोडून इजिप्तच्या सीमेवर आली, त्यानंतर आता ती इजिप्तला जाण्याच्या तयारीत आहे. गाझा सोडलेल्या भारतीय महिलेनं तेथील युद्धाचं धक्कादायक वास्तव सांगितलं. त्या महिलेने सांगितलं की, इस्रायलने गाझामधील परिस्थिती फार वाईट आहे. रस्ते, घरे सगळं कोसळलं आहे. वाचा सविस्तर 

Operation Ajay : इस्रायलमधून भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल, दोन चिमुकल्यांसह 235 जणांचा समावेश; 500 हून भारतीय सुखरुप मायदेशी

Indians Airlifted from Israel : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यातील युद्ध सुरुच आहे. या काळात भारतासह इतर देशांतील नागरिकही इस्रायलमध्ये अडकले आहेत. इस्रायलमध्ये अडलेल्या भारतीयांची दुसरी तुकडी भारतात दाखल झाली आहे. इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी भारताने इस्रायल लष्करासोबत मिळून ऑपरेशन अजय हाती घेतलं आहे. ऑपरेशन अजय अंतर्गत भारतीयांची दुसरी तुकडी दिल्लीत दाखल झाली आहे. यामध्ये दोन चिमुकल्यांसह 235 जणांचा समावेश आहे. याआधी पहिल्या तुकडीत 212 भारतीय सुखरुप मायदेशी परतले आहेत. वाचा सविस्तर 

14th October In History : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला, र.धों. कर्वे यांचे निधन, डॉ. अर्मत्य सेन यांना नोबेल जाहीर ; आज इतिहासात....

14th October In History :  इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. 14 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आज दिवस भारताच्या सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी अर्थात 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तर,  1964 मध्ये मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांना अहिंसेच्या सिद्धांतांचं पालन करत रंगभेदाविरुद्ध संघर्षासाठी नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आजच्या दिवशी भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना 1998 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. वाचा सविस्तर 

Horoscope Today 14 October 2023 : आज शनि अमावस्येला 'या' राशींना होणार लाभ, आजचे राशीभविष्य

Horoscope Today 14 October 2023 : शनिवार 14 ऑक्टोबरचे राशीभविष्य सांगत आहे की, आज चंद्र कन्या राशीतून तूळ राशीत जाईल. चंद्र आज शनिसोबत षडाष्टक योग तयार करत आहे, तर शनि कुंभ राशीत विराजमान असल्याने विशेषत: वृषभ आणि मिथुन राशीच्या लोकांना षष्ठ राजयोगाचे फायदे देत आहेत. आज शनि अमावस्येला तुमचा दिवस कसा जाईल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget