एक्स्प्लोर

14th October In History : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला, र.धों. कर्वे यांचे निधन, डॉ. अर्मत्य सेन यांना नोबेल जाहीर ; आज इतिहासात....

14th October In History : 14 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आज दिवस भारताच्या सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

14th October In History :  इतिहासात प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. 14 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे. आज दिवस भारताच्या सामाजिक क्रांतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आजच्या दिवशी अर्थात 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तर,  1964 मध्ये मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांना अहिंसेच्या सिद्धांतांचं पालन करत रंगभेदाविरुद्ध संघर्षासाठी नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आजच्या दिवशी भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांना 1998 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता. 

1953 : अग्रणी समाजसुधारक र. धों. कर्वे यांचे निधन  (Ra Dho Karve)

महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक रघुनाथ धोंडो कर्वे यांचा 14 ऑक्टोबर 1953 रोजी मृत्यू झाला होता. त्यांचा जन्म मुरुड-रत्‍नागिरी येथे 14 जानेवारी 1882 साली झाला होता.  ते धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होते सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. र. धों. कर्वे यांच्या हयातीत त्यांना केवळ कुचेष्टाच मिळाली. तरीदेखील ते केवळ स्वतःवरच्या विश्वासावर लढत राहिले, त्यांना हा आत्मविश्वास त्यांच्या पत्‍नीने, व आई-वडिलांनी पूर्ण खंबीरपणे त्यांच्यामागे उभे राहून दिला.  एकदा त्यांची केस बाबासाहेब आंबेडकरांनी लढवली होती. दुर्दैवाने ती केस ते केस हरले पण तरीही त्यांना बाबासाहेबांसारखा आयुष्यभरासाठीचा मित्र मिळाला.  रघुनाथ धोंडो कर्वे यांनी गोपाळ गणेश आगरकरांप्रमाणेच वैचारिक मार्ग पत्करला होता. लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या  रघुनाथ धोंडो कर्वे यांनी सतत 27 वर्ष एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.

1947-  साहित्यसम्राट नरसिंह चिंतामण तथा तात्यासाहेब केळकर यांचं निधन

मराठी पत्रकार, नाटककार, राजकारणी नरसिंह चिंतामण केळकर ऊर्फ तात्यासाहेब केळकर. केसरी वृत्तपत्राचे ते संपादक होते. त्यांनी दीर्घ लेखन केलं. लोकमान्यांचे चरित्र (3 खंड), मराठे आणि इंग्रज, भारतीय तत्त्वज्ञान, ‘तोतयाचे बंड’ (नाटक) ‘कोकणचा पोर’, ‘बलिदान’ यांसह 8 कादंबऱ्या, आदींचा समावेश आहे. त्यांनी लिहिलेली बहुतेक नाटके संगीत नाटके आहेत. त्यांच्या साहित्यातील या अफाट कामगिरीबद्दल त्यांना साहित्यसम्राट म्हटले जायचे. तात्यासाहेबांचे घराणे रत्‍नागिरीजवळच्या ढोकमळे गावचे. त्यांचे वडील मिरज संस्थानात कारकून, फौजदार, मामलेदार अशा विविध हुद्द्यांवर नोकरी करीत होते. ते मोडनिंबला असताना न.चिं. केळकरांचा जन्म झाला. 1887  साली मॅट्रिक झाल्यानंतरचे शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन, कोल्हापूरच्या राजाराम आणि नंतर पुण्याच्याच डेक्कन कॉलेजातून घेतले. डेक्कन कॉलेजात असताना केळकरांना नाटकाची गोडी लागली. तेथेच त्यांनी नाटकात भूमिका करून हौशी रंगभूमीवर प्रवेश केला. मुन्सिफाच्या नोकरीचा कंटाळा आला म्हणून ते लोकमान्य टिळक यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. टिळक चालवीत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये ते शिकवू लागले. त्याच काळात ते केसरी-मराठा या दैनिकांचे आधी सहसंपादक आणि टिळकांच्या अटकेनंतर 1897 सालापासून संपादक झाले. 1935 ते 1947 या काळात ते ’सह्याद्रि’ या मासिकाचेही संपादक होते. टिळकांच्या बरोबर केळकरांनी अनेक सार्वजनिक आणि राजकीय चळवळींत भाग घेतला. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकारणाची सूत्रे केळकरांच्या हातात आली. 1918 मध्ये ते पुणे नगरपालिकेचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1925 साली मध्य पुण्यातून निवडून जाऊन ते मध्यवर्ती कायदेमंदळाचे सदस्य झाले.  केसरी मराठा संस्थेचे ते विश्वस्त होते. लंडनमध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेचे ते भारताचे प्रतिनिधी होते.

1956 - डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली (Dr B.R. Ambedkar converts to Buddhism along with followers)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला 'दीक्षाभूमी' असंही म्हणतात. 1935 मध्ये  येवल्यामध्ये मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नसल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाहीर केले होते. अस्पृश्यता, भेदाभेद याविरोधात बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्यावेळी त्यांनी लाखो अस्पृश्यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. 

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे.   डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि लाखो अनुयायांना दीक्षा दिली. बाबासाहेबांनी आपल्या या अनुयायांना धम्मदीक्षेपूर्वी स्वतःच्या 22 प्रतिज्ञा दिल्या. एकाच वेळी आणि शांततामय मार्गांनी घडून आलेले बौद्ध धर्मांतर जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे सामूहिक धर्मांतर होतं. बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर याला स्थानाला महत्त्व प्राप्त झाले. भारतासह जर्मनी, थायलंड, जपान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी देशांतील बौद्ध उपासक, भिक्खूही इथे उपस्थित राहतात.

1964 - मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांना नोबेल शांती पुरस्कार (Martin Luther King, Jr)

14 ऑक्टोबर 1964 रोजी मार्टिन लूथर किंग ज्युनियर यांना अहिंसेच्या सिद्धांतांचं पालन करत रंगभेदाविरुद्ध संघर्षासाठी नोबेल शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला.  मार्टिन ल्यूथर किंग, ज्युनियर यांचा जन्म 15 जानेवारी 1929 रोजी झाला तर मृत्यू 4 एप्रिल 1968 हे एक अमेरिकन सुधारक आणि धर्मगुरू होते. ते अमेरिकन नागरी अधिकार चळवळीतील प्रमुख नेते होते. त्यांचा मुख्य वारसा म्हणजे अमेरिकेतील समान नागरी अधिकार. यासाठी ते आज मानवाधिकाराचे प्रतीक म्हणून ओळखले जातात.

1993- वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष पद्मश्री लालचंद दोशी यांचा मृत्यू (Lalchand Dhoshi) 

14 ऑक्टोबर 1993 रोजी  वालचंद उद्योगसमूहाचे अध्यक्ष पद्मश्री लालचंद दोशी यांचा मृत्यू झाला. आधुनिक भारताच्या औद्योगिकीकरणाचे प्रमुख शिल्पकार तसेच वालचंद उद्योगसमूहाचे संस्थापक वालचंद हिराचंद दोशी यांचे लालचंद हे भाऊ. वालचंदांच्या पश्चात सबंध उद्योगसमूहाचा कार्यभार लालचंद यांनी कौशल्याने व समर्थपणे सांभाळला आणि पुढे उद्योगसमूहाचा विस्तार-विकासही घडवून आणला. 1993 मध्ये लालचंद ह्यांचे निधन झाल्यानंतर हा उद्योगसमूह दोशी घराण्याच्या नंतरच्या पिढ्यांनी सांभाळला. 

1998 : डॉ. अर्मत्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर 

भारतीय अर्थशास्त्रज्ञ डॉ. अर्मत्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार आजच्या दिवशी जाहीर झाला. अमर्त्य सेन हे जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ, विद्वान, तत्त्वज्ञ आणि लेखक आहेत. त्यांनी सामाजिक निवड सिद्धांत, राजकीय आणि नैतिक तत्त्वज्ञान आणि निर्णय सिद्धांत यासह अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

नोबेल समितीने जाहीर केलेल्या प्रसिद्ध पत्रकारत सेन यांच्या कलेक्टिव्ह चॉईस अँड सोशल वेल्फेअर, ऑन इकॉनॉमिक असमानता, गरीबी आणि दुष्काळ: हक्क आणि वंचितता यावरील निबंध यांचा विशेष उल्लेख केला होता. अमर्त्य सेन यांनी कल्याणकारी अर्थशास्त्रातील मूलभूत समस्यांवरील संशोधनात अनेक महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांचे योगदान सामाजिक निवडीच्या स्वयंसिद्ध सिद्धांतापासून, कल्याण आणि गरिबी निर्देशांकांच्या व्याख्यांपासून, दुष्काळाच्या अनुभवजन्य अभ्यासापर्यंत असल्याचे म्हटले होते. 

अन्न संकट हाताळणारी सरकारे आणि आंतरराष्ट्रीय संस्था सेन यांच्या कार्यामुळे प्रभावित झाल्या होत्या. त्यांच्या विचारांनी धोरणकर्त्यांना केवळ तात्काळ दुःख कमी करण्याकडेच नव्हे तर गरिबांचे गमावलेले उत्पन्न बदलण्याचे मार्ग शोधण्याकडेही लक्ष देण्यास प्रोत्साहन दिले. 

इतर महत्त्वाच्या घटना : 

1643: मुघल सम्राट बहादूरशहा जफर (पहिला) यांचा जन्म.
1882: भारतात (सध्याच्या पश्चिम पाकिस्तान) पंजाब विद्यापीठ सुरु झाले.
1919: जर्मन उद्योगपती जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स यांचे निधन. 
1994: इतिहासकार, विचारवंत, संशोधक सेतू माधवराव पगडी यांचे निधन.
2013: केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया यांचे निधन.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget