Morning Headlines 13th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
Pune Ola, Uber : ओला, उबेरला ‘आरटीए’ धक्का; वाहतूक परवाना पुणे ‘आरटीए’ने फेटाळला!
पुणे : ओला (OLA), उबरचा ( Uber ) वाहतूक करणाऱ्यांना ‘आरटीए’ (Pune Regional Transport Authority)धक्का दिला आहे. ओला, उबरचा वाहतूक परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला आहे. या विरोधात अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे. परवाना पुण्यात ‘आरटीए’ने फेटाळला असला तरीही प्रवासी वाहतूक सुरू ठेवता येणार आहे. वाचा सविस्तर
Nitin Gadkari Jalna : जालन्यात कॅन्सर रुग्णांची संख्या का वाढली? नितीन गडकरी यांनी सांगितलं कारण
Nitin Gadkari Jalna : मागील काही दिवसांत जालना (Jalna) शहरात कॅन्सर रुग्णांची (Cancer Patients) संख्या वाढली असून, त्यामुळे टाटाने जालन्यात कॅन्सर हॉस्पिटल उघडले आहे. मात्र, जालन्यात कॅन्सर रुग्णांची संख्या का वाढली? याचं कारण नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मंगळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वेच्या विविध उपक्रमांची उद्घाटन करण्यात आले. जालना शहराजवळील दिनेगाव येथे “गती शक्ती कार्गो टर्मिनल”चेही (ड्रायपोर्ट) दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी देखील उपस्थित होते आणि याचवेळी बोलतांना त्यांनी जालन्यात वाढत्या कॅन्सर रुग्णांच्या संख्येवर भाष्य केले. वाचा सविस्तर
मोठी बातमी! शांतीगिरी महाराज महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार; ठाकरे गटासोबत चर्चाही झाली?
Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या राजकारणातून (Nashik Politics) एक मोठी बातमी समोर येत असून, स्वामी शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकरांसोबत (Milind Narvekar) महाराजांच्या भक्त परिवाराची चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. शांतीगिरी महाराज हे महायुतीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. वाचा सविस्तर
मोठी बातमी! प्रत्येक मतदारसंघात बच्चू कडू 300 ते 400 उमेदवार उतरवणार, राज्यभरात 'मी खासदार' मोहीम राबवणार
Lok Sabha Election 2024 : एकीकडे मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) प्रत्येक मतदारसंघात 200 पेक्षा अधिक उमेदवार उभे करण्यासाठी बैठका सुरु असतानाच, आता माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी देखील अशीच काही भूमिका घेतली आहे. प्रत्येक मतदारसंघात 'मी खासदार' या अभियानाअंतर्गत 300 ते 400 उमेदवार उभे करणार असल्याच बच्चू कडू म्हणाले आहे. त्यांच्या या भूमिकेने निवडणूक आयोगाची (Election Commission) चिंता वाढण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर