एक्स्प्लोर

Morning Headlines 11th November : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Weather Update : ऐन दिवाळीत अवकाळी! 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, IMD चा अंदाज काय?

IMD Weather Forecast : पुढील 24 तासांत मुंबई (Mumbai), पुणे (Pune) कोकणासह (Kokan) राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता (Rainfall Prediction) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, उत्तर कर्नाटकच्या काही भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. वाचा सविस्तर...

Air Travel : हवाई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कोविड काळातील तिकीटांचे अडकलेले पैसे लवकरच परत मिळणार

Air Travel : हवाई प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कोविड (Covid 19) कालावधीत हवाई तिकीटांचे (Air Tickets) अडकलेले पैसे परत (Refund ) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जर तुम्ही कोविड-19 महामारी (Coronavirus) दरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत (Lockdown) विमानाचे तिकीट बुक केले असेल, पण रद्द केलेल्या तिकीटाचे पैसे तुम्हाला आजपर्यंत परत मिळाले नसतील तर, त्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे लवकरच परत मिळणार आहेत. केंद्र सरकारने ट्रॅव्हल पोर्टलला यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. देशात लॉकडाऊन काळात अनेक नियोजित उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक प्रवाशांना प्रवास करता आला नाही, शिवाय त्यांचे पैसेही अडकले होते. वाचा सविस्तर...

Grammy Awards 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट

PM Narendra Modi Song For Grammy Awards 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ते 'एबंडेंस इन मिलेट्स' (Abundance in Millets) या गाण्याच्या गीतलेखनामुळे चर्चेत आले होते. आता पंतप्रधानांनी लिहिलेलं हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट झालं आहे. धान्याचे फायदे जास्तीत जास्त लोकांना कळावेत यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं होतं. वाचा सविस्तर...

Air India : नव्या जोमानं सुरुवात! दर सहा दिवसांनी एअर इंडियाला मिळणार नवं विमान, प्रवाशांना मिळणार खास सुविधा

Air India News : टाटा समूहाच्या (TATA Group) मालकीची विमान कंपनी (Airline) एअर इंडियाला (Air India ) पुढील 18 महिन्यांसाठी दर सहा दिवसांनी एक नवीन विमान मिळणार आहे. एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) कॅम्पबेल विल्सन यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. विल्सन यांनी सांगितलं की, एअर इंडिया कंपनीने एकूण 470 विमानांची ऑर्डर दिली आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एअर इंडियाची नवीन विमाने तैनात केली जात आहेत. एअर इंडियाच्या सीईओंनी म्हटलं आहे की, आम्ही अनेक नवीन क्रू आणि कर्मचाऱ्यांची भरती करत आहोत. कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण देण्यात येत आहे. वाचा सविस्तर...

Israel Gaza Attack : गाझातील 3 रुग्णालयांना इस्रायली सैन्याचा घेराव, हजारो लोकांनी काढला पळ

Israel Palestine Conflict Updates : इस्रायल आणि हमास (Israel-Hamas War) यांच्यातील युद्धाचा आज, 11 नोव्हेंबरला 35 वा दिवस आहे. 7 ऑक्टोबरला या युद्धाला सुरुवात झाली. महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या या युद्धामुळे हजारो जणांनी प्राण गमावले आहेत. युद्धात इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या मृतांचा आकडा 12 हजारांच्या पुढे गेला आहे. गाझा पट्टीवर इस्रायलचे हल्ले (Israel Gaza Attack) काही केल्या थांबत नाही आहेत. शुक्रवारी, 10 नोव्हेंबरला गाझा पट्टीच्या उत्तरेकडील भागात अनेक ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक रुग्णालयांच्या बाहेरही स्फोटांचा आवाज ऐकू आला. वाचा सविस्तर...

11 November In History : पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले, पठ्ठे बापूराव यांचा जन्म; आज इतिहासात...

11 November In History : इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आज, 11 नोव्हेंबर रोजीदेखील महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. साने गुरुजी यांच्या सत्याग्रहानंतर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. आजच्या दिवशी लावणी लेखक पठ्ठे बापूराव यांचा जन्म झाला. त्याशिवाय, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलान अबुल कलाम यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. आज इतिहासातील घडामोडी वाचा सविस्तर...

Horoscope Today 11 November 2023 : आजचा शनिवार खास! 6 राशींचे भाग्य चमकेल, 12 राशींचे आजचे राशीभविष्य.

Horoscope Today 11 November 2023 : राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 11 नोव्हेंबर 2023 रोजी शनिवार हा महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी शनीची चाल देखील बदलत असते. या दिवशी शनि मार्गी होत आहे, ज्यामुळे सर्व 12 राशींवर परिणाम होईल. ग्रहांच्या चालीनुसार तुम्हाला आज कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता. आज कोणी तुम्हाला पैसे उसने देण्यास सांगितले, जरी तो तुमचा नातेवाईक असला तरी, कोणालाही पैसे देऊ नका. सर्व राशीच्या लोकांसाठी शनिवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget