Grammy Awards 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट
PM Modi Song For Grammy Awards 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं 'एबंडेंस इन मिलेट्स' हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट झालं आहे.
PM Narendra Modi Song For Grammy Awards 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी ते 'एबंडेंस इन मिलेट्स' (Abundance in Millets) या गाण्याच्या गीतलेखनामुळे चर्चेत आले होते. आता पंतप्रधानांनी लिहिलेलं हे गाणं ग्रॅमी पुरस्कारासाठी नॉमिनेट झालं आहे. धान्याचे फायदे जास्तीत जास्त लोकांना कळावेत यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याला जागतिक पातळीवरील संगीतक्षेत्रात महत्त्वाच्या असणाऱ्या ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. या गाण्याला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. बाजरीसारख्या पौष्टिक धान्याचा प्रचार व्हावा यासाठी त्यांनी हे गाणं लिहिलं आहे.
धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी 'एबंडेंस इन मिलेट्स' गाण्याची निर्मिती
Indian-American singer Falu's 'Abundance in Millets' song featuring PM Modi nominated for Grammy Awards
— ANI Digital (@ani_digital) November 10, 2023
Read @ANI Story | https://t.co/VfCytNpWo1#Millets #PMModi #GrammyAwards pic.twitter.com/ly0VQRXDdt
पंतप्रधानांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केलं आहे. ग्रॅमी पुरस्कार विजेती भारतीय-अमेरिकन गायिका फाल्गुनी शाहच्या मदतीने पंतप्रधानांनी हे गाणं लिहिलं आहे. 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याबद्दल बोलताना फाल्गुनीने ट्वीट केलं होतं की,"धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी, शेतकर्यांना या पिकांचे उत्पादन घेता यावे यासाठी आणि जगातील उपासमार संपवण्यात मदत करण्यासाठी पंतप्रधानांसोबत हे गाणं लिहिलं आहे".
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले...
धान्याचं सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहते आणि शरीर तंदुरुस्त राहायला मदत होते. भाजरीसारखं धान्य हे खूप पौष्टिक आहे. तसेच आरोग्यदायी आहे. अन्न सुरक्षा देण्याच्या आणि उपासमारी दूर करण्याच्या महत्त्वाच्या ध्येयाला या गाण्यातून सर्जनशीलतेची जोड मिळाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
फाल्गुनी शाह आणि तिचे पती व गायक गौरव शाह यांनी 'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्याची निर्मिती केली आहे. फाल्गुनी शाह फालू या नावाने ओळखल्या जातात. युट्यूबवर हे गाणं प्रेक्षक ऐकू शकतात. पंतप्रधानांनी लिहिलेलं हे गाणं चाहत्यांच्या पसंतीस उतरलं आहे.
'एबंडेंस इन मिलेट्स' या गाण्यासह आणखी सहा गाण्यांना सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकन जाहीर झालं आहे. फालू शाहला ग्रॅमी पुरस्कारासाठी आजवर अनेकदा नामांकन जाहीर झालं आहे. फालूताला 2022 मध्ये 'अ कलरफुल वर्ल्ड' या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता.
संबंधित बातम्या