एक्स्प्लोर

Morning Headlines 11th December : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

जगभरातील सर्वाधिक श्रीमंत कुटुंबांची यादी; कोणी उद्योगातून तर कोणी तेलसाठ्यातून उभारलं कोट्यवधींचं साम्राज्य, भारतातून कोण?

Worlds Richest Families: जगभरातील श्रीमंत व्यक्ती किंवा कुटुंबांची चर्चा नेहमीच रंगल्याचं आपण पाहतो. त्यांची नावं नेहमीच चर्चेत असतात. अशातच भारतातील गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा समावेश जगभरातील श्रीमंत व्यक्तींमध्ये केला जातो. पण आज आपण यांच्याबद्दल बोलणार नाही. आज आपण जाणून घेणार आहोत, जगात अफाट संपत्तीची मालकी असलेल्या कुटुंबांबाबत. जाणून घेऊयात, जगभरातील टॉप 10 श्रीमंत कुटुंबांबाबत... वाचा सविस्तर 

कांदा सरकारला रडवणार! निर्यातबंदीविरोधात थेट शरद पवार मैदानात, पवारांच्या उपस्थितीत चांदवडला राष्ट्रवादीचा रास्तारोको

नाशिक :   केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली आहे. कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकारनं निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतलाय. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) मैदानात उतरले आहेत. आज पवारांच्या उपस्थितीत चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा  होणार आहे.  या आंदोलनाला खुद्द शरद पवार उपस्थित राहणार आहेत. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त आहेत.  कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. वाचा सविस्तर 

MLA Disqualification: राष्ट्रवादीत असताना तुमच्या एबी फॉर्मवर सही कोण करायचं? सामंत म्हणाले, पक्षावर विश्वास होता, सही कधी पाहिलीच नाही

Shiv Sena MLA Disqualification: शिवसेना (Shiv Sena) आमदार अपात्रतेची सुनावणीला (Shiv Sena MLA Disqualification) सुरुवात झाली आहे. नागपुरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्यासमक्ष ही सुनावणी सुरु आहे. आज शिंदे गटाच्या (Shinde Group) उदय सामंत (Uday Samant) आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी होणार आहे. तर परवा खासदार राहुल शेवाळेंची उलटतपासणी झाली आहे. वाचा सविस्तर 

Exclusive : मेळघाटातील बहुतेक गावांत स्थलांतर,कुपोषणाचा प्रश्न कायम; एप्रिल ते नोव्हेंबरमध्ये उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू

नागपूर:  अमरावतीतल्या मेळघाटातील (Amravati Melghat)  कुपोषण (Malnutrition) आणि बालमृत्यूचा (Child Death Rate)  दर दहा वर्षांच्या तुलनेत कमी आहे परंतू बालमृत्यू आणि कुपोषण अजूनही संपलेलं नाही. एबीपी माझाच्या टीमने तीन दिवस मेळघाटातील धारणी, चिखलदरा या भागातील अनेक गावांना भेटी दिल्या. समृद्धी महामार्गापासून 100 ते 125 किमी असलेल्या मेळघाटातील अनेक गावात धड रस्ते नाहीत. जे रस्ते आहेत त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आरोग्याच्या पायाभूत सुविधाही नाहीत. मेळघाटातील सर्वात मोठ्या धारणी परिसरात आजही कुपोषणाची प्रकरणं सर्वाधिक आहे.  एप्रिलपासून नोव्हेंबर अखेरपर्यंत उप जिल्हा रुग्णालयात 43 बालकांचा मृत्यू झाला आहे. वाचा सविस्तर 

Truck AC Cabin Mandatory: 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व ट्रकमध्ये AC केबिन अनिवार्य; रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी

Truck Drivers AC Cabin Mandatory: देशातील ट्रकची (Truck) खराब स्थिती पाहता भारत सरकारनं (Central Government) सर्व ट्रकमध्ये (Truck Drivers) एसी केबिन (AC cabins) अनिवार्य केल्या आहेत. 2025 पासून, सर्व नव्या ट्रकमध्ये फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन असतील, असं एक नोटीस जारी करत रस्ते वाहतूक मंत्रालयानं (Ministry of Road Transport and Highways) स्पष्ट केलं आहे. म्हणजेच, 2025 पासून प्रत्येक नव्या केबिनमध्ये फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन असणं अनिर्वाय आहे. गेल्या पाच वर्षांत अनेक प्रयत्नांनंतर अखेर सरकारनं फॅक्ट्री-फिटेड एसी केबिन अनिर्वाय करण्याच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित केली आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयानं शुक्रवारी रात्री एक अधिसूचना जारी केली आहे. जारी केलेल्या अधिसूचनेत मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे की, 1 ऑक्टोबर 2025 रोजी किंवा त्यानंतर उत्पादित सर्व N2 आणि N3 श्रेणीतील ट्रकच्या केबिनमध्ये वातानुकूलन यंत्रणा बसवली जाईल. वाचा सविस्तर 

11 December In History : कोयना भूकंपाने महाराष्ट्र हादरला, अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म; आज इतिहासात 

मुंबई : कोयना येथे 6.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन 180 जण ठार आणि 1500 लोक जखमी झाले आणि मोठया प्रमाणात वित्तहानी झाली होती. बुद्धिबळाचा राजा विश्वनाथन आनंद याचा जन्म 11 डिसेंबर  1969 रोजी मद्रास (आताचे चेन्नई) येथे झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचाही जन्म 1922 मध्ये 11 डिसेंबर रोजी झाला होता. आचार्य रजनीश 'ओशो' यांचा जन्मदिवस  आहे. 11 डिसेंबर 1931 रोजी त्यांचा जन्म झाला. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचाही जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी बंगालमध्ये (आता पश्चिम बंगाल) झाला. याबरोबरच साहित्याचे नोबेल पारितोषिक जिंकणारे इजिप्शियन कादंबरीकार नजीब महफूज यांचाही जन्म 11 डिसेंबर रोजी झाला. वाचा सविस्तर 

Horoscope Today 11 December 2023 : आजचा सोमवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 11 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 11 डिसेंबर 2023, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, मिथुन राशीच्या लोकांना आज नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. आज कन्या राशीच्या लोकांना कुटुंबाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget