एक्स्प्लोर

Monsoon : गुड न्यूज, मान्सून जूनमधील पावसाची तूट जुलैमध्ये भरुन काढणार, पुढच्या तीन चार दिवसात कुठं पाऊस पडणार?

Monsoon News : मान्सून यंदा लवकर दाखल झाला मात्र त्यानंतर त्याचा वेग मंदावला आहे. मान्सून कधी वेग पकडणार याबाबत माहिती समोर आली आहे. 

नवी दिल्ली : भारतील शेतकऱ्यांसह सर्वांचं लक्ष मान्सूनच्या पावसाकडे लागलेलं असतं. गतवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून (Monsoon) लवकर भारतात दाखल झाला.  मात्र, महाराष्ट्रातील काही भागात पोहोचल्यानंतर मान्सूनचा वेग मंदावला होता. आता भारतीय हवामान विभागानं नव्यानं जारी केलेल्या अंदाजानुसार 3 जूलैपर्यंत मान्सून देशात पुन्हा आगेकूच सुरु करेल. उत्तर पश्चिम भारतात मान्सूनचा पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये मान्सूची प्रतीक्षा आहे. 11 जून नंतर भारतात मान्सूनचा वेगव मंदावला होता. दोन दिवसांपूर्वी मान्सून मध्य भारताच्या पुढे पोहोचला होता. 

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी " जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून पुन्हा गती प्राप्त करेल. त्यावेळी चांगला पाऊस होईल त्यामुळं जूनमध्ये कमी झालेल्या पावसाची जुलैमध्ये भरपाई होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. 

पुढील 3-4 दिवसात कुठं पाऊस होणार?

भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सून पुढील तीन ते चार दिवसात गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालमधील काही भाग, बिहारचा काही भाग आणि उत्तर प्रदेशातून पुढे जाईल. या ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 27 जून नंतर उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्ट मध्ये ला नीना विकसित होण्याची अपेक्षा आहे. तर, अलनिनोमुळं भारतातील मान्सूनच्या पावसावर विपरीत परिणाम होत असतो. अलनिनो निर्माण झाल्यास भारतात मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात होतो. 

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एम. राजीवन यांनी मान्सून पुन्हा सक्रीय होत असल्याचं म्हटलं. जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मान्सून पोहोचेल. पुढच्या  2-3 आठवड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. ला नीनाच्या प्रभावामुळं ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होईल, अशी अपेक्षा हवामान विभागाल आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मान्सून खोळंबला होता. जवळपास नऊ दिवस मान्सून नवसारी, जळगाव, मंडला, पेंड्रा रोड, झारसुगुडा, बालासोर, हल्दिया, पाकूर, साहिबगंज रक्सोलपर्यंत पोहोचला होता. पुढील तीन ते चार दिवसात अरबी समुद्राचा उत्तरेकडील भाग, गुजरात, महाराष्ट्र,  मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागातून पुढे प्रवास करेल.

संबंधित बातम्या :

Amol Mitkari : प्रकाश आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा घुमजाव; म्हणाले....

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabhaSharad pawar Baramati : युगेंद्र पवराांसाठी शरद पवारांची सभा, मंचावर जोरदार स्वागतABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 November 2024Nawab Malik on Abu Azmi : फटीचर झालो तरी हात पसरत नाही,मलिक आझमींवर भडकले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
Embed widget