एक्स्प्लोर

विहिंपच्या धर्मसंसदेत मोहन भागवतांनी राममंदिरावर बोलणं टाळलं

आश्वासनं देऊनही साडे चार वर्षात मोदी सरकारनं राम मंदिराची वीटही न रचल्यानं या धर्म संसदेत राम मंदिरावर विहिंप काय भूमिका घेईल, हे पाहणं महत्वाचं होतं, मात्र काल सरसंघचालक मोहन भागवतांनी राममंदिरावर बोलणं टाळलं.

प्रयागराज : प्रयागराजमधील साधूसंताच्या धर्मसंसदेत 21 फेब्रुवारीला अयोध्येत जाऊन राममंदिराची पहिली वीट रचण्याचा प्रस्ताव मान्य झाला.. मात्र विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत काल सरसंघचालक मोहन भागवतांनी राममंदिरावर बोलणं टाळलं. मोहन भागवत यांच्या भूमिकेकडे धर्म संसदेतील साधू-संतांचं लक्ष होतं. मात्र भागवतांनी राममंदिरावर मौन बाळगलं. हिंदू धर्म तोडण्यासाठी कट कारस्थानं शिजत आहे, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी केला आहे. या संसदेत बोलताना मोहन भागवतांनी शबरीमलाच्या मुद्दाही उचलून धरला. कोणत्याही हिंदू महिलांना मंदिरात दर्शनाला जायची इच्छा नाही. तेव्हा काही गट श्रीलंकेतून महिलांना आणून मंदिरात घुसवत आहेत, असा आरोप भागवतांनी केला. विश्व हिंदू परिषदेची 2 दिवसीय धर्मसंसद कालपासून सुरू झाली.  उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये  या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, योगगुरू रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर तसंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. आश्वासनं देऊनही साडे चार वर्षात मोदी सरकारनं राम मंदिराची वीटही न रचल्यानं या धर्म संसदेत राम मंदिरावर विहिंप काय भूमिका घेईल, हे पाहणं महत्वाचं होतं, मात्र काल सरसंघचालक मोहन भागवतांनी राममंदिरावर बोलणं टाळलं. साधू-संत 21 फेब्रुवारीला राम मंदिराची पहिली वीट रचणार राममंदिर उभारणीसाठी आता केंद्र सरकारवर दबाव वाढला आहे. शंकराचार्यांसोबत साधूसंत 21 फेब्रुवारीला राममंदिरासाठी पहिली वीट रचणार आहेत. त्यासाठी 10 फेब्रुवारीपासून साधूसंत प्रयागराजहून अयोध्येकडे रवाना होतील. नुकत्याच शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती यांनी बोलावलेल्या धर्मसंसदेत हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे. येत्या 10 फेब्रुवारीला म्हणजे वसंत पंचमीनंतर साधू संत अयोध्येसाठी रवाना होतील. त्यानंतर 21 फेब्रुवारीला राम मंदिराची पहिली वीट रचली जाईल, असं धर्मसंसदेत सांगण्यात आलं. याशिवाय 21 फेब्रुवारीपासून राम मंदिराचं बांधकाम होईपर्यंत साधू संत आंदोलन करतील. आंदोलनामध्ये कुणी आल्यास साधू संत गोळी झेलण्यासाठीही तयार असतील, असंही धर्मसंसदेत सांगण्यात आलं. निवडणुकांपूर्वी मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. वादग्रस्त जमीन वगळता जी आसपासची 67 एकर जमीन आहे, ती मूळ मालकांना परत करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी याचिका केंद्राने कोर्टात केली आहे. जर ही मागणी मान्य झालीच तर मंदिर निर्मितीसाठी जे काम करायचं आहे, त्याची सुरुवात आसपासच्या परिसरात होऊ शकते. निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकार आणखी एक मास्टरस्ट्रोक मारु शकणार का, याचं उत्तर आपल्याला कोर्टाच्या निकालानंतरच कळू शकेल.

महत्त्वाच्या बातम्या

Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget