एक्स्प्लोर

बुलेट ट्रेन ते गिफ्ट सिटी... मुंबईचं महत्त्व कमी करण्यासाठी मोदी सरकारचा डाव?

अहमदाबाद टू मुंबई बुलेट ट्रेनसोबतच मोदींनी महाराष्ट्रातील उद्योगांना पर्याय म्हणून गिफ्ट सिटीची उभारणी सुरु केली आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या औद्योगिक महत्त्वावर होणार आहे.

मुंबई : मायानगरी... बीएसई टू बॉलिवूड आणि इंडस्ट्री टू इंटरनॅशल ट्रेड सगळं काही मुंबई... पण याच मराठमोळ्या मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने सुरु केलाय का? असा प्रश्न आहे. कारण अहमदाबाद टू मुंबई बुलेट ट्रेनसोबतच मोदींनी महाराष्ट्रातील उद्योगांना पर्याय म्हणून गिफ्ट सिटीची उभारणी सुरु केली आहे. एकेकाळी मुंबई आणि गुजरात दोन्ही मिळून एकच राज्य होतं. पण 1 मे 1960 ला भाषावार प्रांतरचनेत महाराष्ट्र वेगळा झाला. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्रासाठी 105 हुतात्म्यांनी रक्त सांडलं. त्यानंतर उद्योग, शेती, सिंचन, मनोरंजन सगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिला. पण आता लहान भाऊ असलेला गुजरात महाराष्ट्राची ओळख पुसण्याचा प्रयत्न करत आहे. बुलेट ट्रेन आणि गिफ्ट सिटी ही महाराष्ट्राविरोधातली दोन महत्वाची आयुधं आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 7 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या बीकेसीत बुलेट ट्रेनचं स्टेशन  असेल. तिथून अवघ्या तासाभरात टेक्स्टाईल आणि डायमंड हब असलेल्या सूरतला पोहोचता येईल. तर अवघ्या 2 तासावर अहमदाबादच्या फाईव्ह स्टार गिफ्ट सिटीत पोहोचता येईल. देशातल्या हिरे बाजाराची उलाढाल 1 लाख कोटींच्या घरात आहे. हिऱ्याच्या घडणावळीचं काम सूरत, अहमदाबादेत होतं. तर इंपोर्ट-एक्स्पोर्टचं काम मुंबईतून केलं जातं. झवेरी बाजार त्यासाठी प्रसिद्ध आहे. पण आता एवढ्यासाठी मुंबईसारख्या महागड्या शहरात आणि गर्दीत राहण्याची गरज उरणार नाही. कारण मोदींनी अशा सगळ्या उद्योग, व्यापाऱ्यांसाठी साबरमतीच्या काठावर आणि अहमदाबाद-गांधीनगरच्या मध्ये गिफ्ट सिटी बांधायला घेतली आहे. काय आहे गिफ्ट सिटी? तब्बल 880 एकरावर ‘गिफ्ट’ अर्थात गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी उभी राहिल. फायनान्स, बँकिंग, ट्रेडिंग, मार्केटिंग, बीपीओ, आयटी, हॉटेल अशा सगळ्या सेक्टर्ससाठी इथं हक्काची जागा असेल. 2020 पर्यंत इथं 30 लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा केला जात आहे. विकासदरात गिफ्ट सिटी 5 टक्क्यांची भर घालेल, तर वर्षाला 1 लाख 25 हजार कोटीची उलाढाल करेल, असाही दावा करण्यात आला आहे. मोदींच्या गुजरातची शान वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील इंटरनॅशनल फायनान्स सर्विस सेंटरचा बळी गेला आहे. जो बीकेसीत उभा राहणार होता. पण मोदींच्या बुलेट ट्रेनच्या स्टेशनसाठी बीकेसीतील 0.9 हेक्टर जागा द्यावी लागली, आणि फडणवीसांना काहीही करता आलं नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेत मुंबई 6 टक्क्यांचा भार उचलते. देशाच्या एकूण टॅक्सपैकी 30 टक्के पैसा मुंबईतून मिळतो आणि त्याचं कारण मुंबईचं औद्योगिक महत्त्व. आता हेच महत्त्व बुलेट ट्रेनच्या वेगाने गुजरातच्या गिफ्ट सिटीत जाऊन विसावण्याची भीती आहे. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या उलाढालीवर आणि रोजगारावर होऊ शकतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : पुण्यात फडणवीसांनी घेतलं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शनSambhaji Bhide vs Vidya Lolge : संभाजी भिडेंनी महिलांबद्दल वादग्रस्त बोलू नये -विद्या लोलगेNagpur Deekshabhoomi Parking Project : वादात नूतणीकरण; विरोधाचं कारण Special ReportAmbadas Danve vs Prasad Lad : हातवारे,  शिवीगाळ, राजकीय संस्कृती गाळात? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
IND vs ZIM : झिम्बॉब्वेचे 17 धुरंधर देणार युवा टीम इंडियाला टक्कर, सिंकदर रझाकडे नेतृत्व 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
कुठे रोहित शर्मा अन् कुठे तू.. शाहिद आफ्रिदी बाबर आझमवर भडकला, म्हणाला... 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
Team India : रोहित शर्मानंतर सलामीला कोण येणार? पाच दावेदार चर्चेत 
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
IND vs ZIM : विश्वचषक संपला, आता झिम्बाब्वे दौरा, 6 जुलैपासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात  प्रवासी संख्येत दुपटीने  वाढ
पुणे मेट्रो सुसाट! एकाच दिवसात प्रवासी संख्येत दुपटीने वाढ
Medha Patkar : 25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
25 वर्षांपूर्वीच्या बदनामी प्रकरणात मेधा पाटकरांना 5 महिने कारावास आणि 10 लाखांचा दंड, दिल्लीतील न्यायालयाचा निकाल 
Insurance Fraud Case : एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
एकाच व्यक्तीचे वेगवेगळे मृत्यू दाखले, विमा कंपन्यांना घातला 70 लाखांचा गंडा
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
लोकसभेत देवतांचे फोटो दाखवत राहुल गांधींची टीका तर मोदी-शाहांसह भाजप नेत्यांचा पलटवार; आज संसदेत काय काय घडले?
Embed widget