Mizoram Election 2023 : मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार मतमोजणी, निवडणूक आयोगाने दिलं कारण
![Mizoram Election 2023 : मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार मतमोजणी, निवडणूक आयोगाने दिलं कारण Mizoram assembly election result date changed counting of votes will be held on 4th December Election Commission gives the reason for it detail marathi news Mizoram Election 2023 : मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली, 'या' दिवशी होणार मतमोजणी, निवडणूक आयोगाने दिलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/13/3258db8d9fc2ed758facac3aa0f9fa0d1681372408156219_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मिझोरम (Mizoram Election 2023) विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख बदलली आहे. निवडणूक आयोगाने (Election Comission) शुक्रवार 1 डिसेंबर रोजी याबाबत माहिती दिलीये. 3 डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. पण यामधील मिझोरामच्या निवडणुकांची तारीख बदलली असून मिझोरामचा निकाल हा सोमवार 4 डिसेंबर रोजी लागणार आहे.
याबाबत निवडणूक आयोगाने कारण देखील सांगितले आहे, मिझोरमच्या लोकांसाठी रविवारचे विशेष महत्त्व आहे. या कारणास्तव तारीख बदलण्यात आली आहे. अनेकांनी तारीख बदलण्यास सांगितले होते. त्यामुळे ही तारीख बदलण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
खरंतर 3 डिसेंबर रोजी रविवार आहे. त्यातच ख्रिश्चन समाजाचे लोक विशेषतः रविवारी चर्चमध्ये जातात. या कारणास्तव तारखेत बदल करण्यात आला आहे.मिझोराममध्ये राज्यातील 87 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन आहे. निकालाच्या तारखेत बदल करावा, अशी मागणी लोकांकडून होत होती. त्यामुळे तारखेत बदल करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीये.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)