MIB Twitter Account Hacked : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर हॅक, बिटकॉईनची लिंक केली शेअर
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (ministry of information and broadcasting ) ट्विटर (Twitter ) अकाऊंट हॅक झाले आहे. प्रसारण मंत्रालयाने अकाऊंट पुन्हा रिकव्हर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
MIB Twitter Account Hacked : भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे (ministry of information and broadcasting ) ट्विटर (Twitter ) अकाऊंट हॅक झाले आहे. अकाऊंट हॅक करून हॅकर्सने बिटकॉईन (Bitcoin) ची एक लिंक शेअर करत Something Amazing असे म्हटले आहे. सोबतच टेस्ला कंपनीचे सीईओ एलन मस्क यांचा एक फोटो लावला आहे. दरम्यान, प्रसारण मंत्रालयाने हे अकाउंट पुन्हा रिकव्हर करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
आज सकाळी हॅकर्सने अकाऊंट हॅक केले. ट्विटर हॅक करून बिटकॉईनची एक लिंक शेअर केली होती. त्याला Something Amazing असे कॅप्शन दिले होते. याबरोबरच शेअर केलेल्या लिंकच्या खाली हॅकर्सने रिप्लायमध्ये ग्रेट जॉब असेही लिहिले होते.
Twitter account of the Ministry of Information and Broadcasting was briefly comprised this morning.
— ANI (@ANI) January 12, 2022
"The account has been restored," the ministry tweeted.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही ट्विटर झाले होते हॅक
दरम्यान,12 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवरून पहाटेच्या सुमारास मोठी घोषणा करण्यात आली होती. बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. परंतु, काही वेळेत त्यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाले असल्याचे समोर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकाउंटवरून बिटकॉइनबाबत मोठी घोषणा करण्यात आल्याने खळबळ उडाली होती.
दरम्यान, माझ्या मुलांची इंस्टाग्राम (Instagram) अकाउंट हॅक केली जात असल्याचा आरोप काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता.
महत्वाच्या बातम्या
- PM Modi : पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक; बिटकॉइनबद्दल केली होती मोठी घोषणा
- Instagram Account Hacked: माझ्या मुलांची इंस्टाग्राम अकाउंट हॅक केली जातायेत, प्रियंका गांधींचा आरोप
- Pakistan : 'कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्याचं ट्वीट आमचं नव्हे', पाकिस्तानचे स्पष्टीकरण; सर्बियातील दूतावासाचं ट्विटर हॅक झाल्याची माहिती