एक्स्प्लोर

World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'स्वच्छ आणि हरित' मोहीम, एकल वापरातले प्लास्टीक बंद करण्यासाठी केंद्राचं राज्यांना पत्र 

पर्यावरण दिनानिमित्त आजपासून देशभरामध्‍ये 'स्वच्छ आणि हरित' मोहीम सुरु करण्‍यात येणार आहे. देशाला एकल वापराच्या प्लास्टिक (एसयूपी) मुक्त करण्यासाठी हे मोहीम सुरु करण्यात येणार आहे.

World Environment Day : आज (5 जून) जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानिमित्त राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्‍यावतीनं देशभरामध्‍ये 'स्वच्छ आणि हरित' मोहीम सुरु करण्‍यात येणार आहे. देशाला एकल वापराच्या प्लास्टिक (एसयूपी) मुक्त करण्यासाठी, तसेच पर्यावरण सुधारण्यास हातभार लावण्यासाठी हे आंदोलन सुरु करण्‍यात  येणार आहे. तसेच एकल वापरातले प्लास्टीक (एसयूपी) बंद करण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  29 मे 2022 रोजी 'मन की बात' मधून देशवासियांबरोबर संवाद साधताना 'जागतिक पर्यावरण दिना'निमित्त नागरिकांना एकत्र येऊन स्वच्छता आणि वृक्ष लागवडीसाठी काही प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते. जागतिक पर्यावरण दिन आणि आणि 30 जून 2022 पर्यंत एकल वापराच्‍या प्लास्टिकवर बंदी घालण्याची भारताची वचनबद्धता लक्षात घेवून , गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने सर्व  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या आदेशांची पूर्तता करण्यासाठी तपशीलवार निर्देश  जारी केले  आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता आणि  कचरा गोळा करण्‍याच्‍या  मोहिमेचा समावेश असणार आहे. ज्यामध्ये प्लास्टिक कचरा संकलनावर विशेष भर देण्यात येईल. तसेच सर्व नागरिकांच्या सहभागासह मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम पार पाडण्‍यात येणार आहे. यामध्‍ये  विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, स्वयं-मदत गट, स्थानिक स्वयंसेवी संस्था/सीएसओ, एनएसएस आणि एनसीसी कॅडेट्स, आरडब्ल्यूए, मार्केट असोसिएशन, कॉर्पोरेट संस्था सहभागी होणार आहेत.

स्वच्छ भारत मिशन 

देशभरामध्‍ये एकल वापराच्या प्लास्टिकला बंदी लागू करण्याच्या वचनबदधतेसाठी  निर्देशानुसार सुचवलेले  अनेक उपक्रम सध्या गृहनिर्माण आणि शहरी व्‍यवहार मंत्रालयाद्वारे राबविण्यात येत आहेत. प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, एसयूवपीच्या निर्मूलनासह, 100 टक्के कचऱ्याचे स्त्रोत वेगळे करण्‍याचे ध्‍येय आहे. त्याचबरोबर  सुक्या कचऱ्याचे (प्लास्टिक कचऱ्यासह) पुनर्वापरासाठी आणि/किंवा मूल्यवर्धित प्रक्रियेसाठी पुढील भागांमध्ये वर्गीकरण करण्यासाठी ‘मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी  (एमआरएफ) कडे  पाठवणे  आवश्यक आहे. यामुळे कचरा डंपिंगची स्‍थान त्याचबरोबर  जलस्‍त्रोतांमध्ये जाणारे  प्लास्टिक आणि सुक्या कचऱ्याचे प्रमाण कमीतकमी होणार आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण , वन आणि  हवामान बदल मंत्रालयाच्या निर्देशांनुसार 2 हजार 591 स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांनी  (4,704 पैकी)  आधीच एकल वापराच्या प्‍लास्टिकवर बंदीची अधिसूचना जारी केली आहे. तर उर्वरित 2 हजार  100पेक्षा जास्‍त स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांही अशी अधिसूचना  30 जून 2022 पर्यंत जारी करतील याची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी  खात्री करणे आवश्यक आहे. स्‍थानिक प्रशासनांनी  एकल वापराचे प्लास्टिकचे  'हॉटस्पॉट्स' ओळखणे आणि त्यांना दूर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर  राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून मिळत असलेल्या समर्थनाचा लाभ घेणे आणि विशेष अंमलबजावणी पथके तयार करणे, अचानक तपासणी करणे आणि नियमांचा भंग करणाऱ्यांवर  भारी दंडात्मक कारवाई करुन  एकल वापराच्‍या प्लास्टिकवर बंदी लागू करणे गरजेचे आहे.

प्लास्टिक कचरा व्यवस्‍थापन (सुधारित) नियम, 2021

प्लास्टिक कचरा व्यवस्‍थापन (सुधारित) नियम, 2021 नुसार, पंचाहत्तर मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्‍या  किंवा पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या कॅरी बॅगचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक कचरा व्यवस्‍थापन नियम, 2016 अंतर्गत यापूर्वी शिफारस केलेल्या पन्नास मायक्रॉनच्या विरोधात 30 सप्टेंबर, 2021 पासून अंमलात आणलेल्या  या नवीन तरतुदीचा परिणाम म्हणून, नागरिकांना आता रस्त्यावर विक्रेते, स्थानिक दुकानदारांनी दिलेल्या पातळ प्लास्टिकच्या कॅरीबॅगचा वापर करणे टाळण्यास प्रोत्साहित केले जात आहे. भाजी विक्रेते, दुकानदार यांनी आता इतर पर्याय वापरावेत, यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

नागरिकांमध्ये पर्यायांबद्दल जागरुकता निर्माण करणे आवश्यक

प्लास्टिक कचरा व्यवस्‍थापन (सुधारित) नियम, 2021 नुसार अंमलबजावणी मजबूत करण्यासाठी पूरक उपक्रम होती घेतले जात आहेत. स्थानिक प्रशासनाला एकल वापराच्या प्लस्टिकला -पर्याय (जसे की कापड/ज्यूट/प्लास्टिकच्या पिशव्या, पर्यावरणस्नेही कटलरी इ.) बाजारात सहज उपलब्ध आहेत. नागरिकांमध्ये अशा पर्यायांबद्दल जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. बाटलीबंद पेयांचा व्यवहार करणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांना त्यांच्या विस्तारित उत्पादकांच्या जबाबदारीचा भाग म्हणून बॉटल बँक्स आणि वेगवेगळ्या ठिकाणी पुन्हा वापरता येण्याजोग्या ‘अनुदानित प्लॅस्टिक बाटली केंद्रांची स्थापना करण्याची विनंती केली जाऊ शकते.  तसेच  स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍था नागरिकांना एकल वापराच्या पलास्टिकला  पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पिशव्या, भांडी देवू शकते किंवा भांडार स्थापन करू शकतात. विशेषत: सार्वजनिक सभा आणि उत्सवांमध्ये वापरण्यासाठी, ज्यामुळे एकल वापराच्‍या  प्‍लास्टिक पिशव्‍यांचा  वापर कमी होण्यास मदत होईल. या उपक्रमांना 'स्वच्छता रथ' द्वारे बळकट केले जाऊ शकते.  हे सर्व  सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठांमध्ये आणि इतर योग्‍य  ठिकाणी उपलब्‍ध  केले जातील आणि एकल वापराच्‍या प्‍लास्टिक पिशव्‍यांच्या वापराविरूद्ध जागरुकता पसरवण्यासाठी आणि विविध पर्यायांचा लाभ घेणे गरजेचे आहे.

राज्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्था  यांना जवळपासच्या सिमेंट प्रकल्प  किंवा इतर औद्योगिक उद्योगांबरोर सोबत सामंजस्य करार करण्यासाठी तसेच निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा एक भाग सिमेंट प्लांटमध्ये पर्यायी इंधन म्हणून किंवा रस्ते बांधणीच्या उद्देशांसाठी वापरला जाईल याची खात्री करण्यासाठी सल्ला देण्यात आला आहे. नंतरच्या उद्देशासाठी, स्‍थानिक स्वराज्य संस्‍था  किंवा त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना रस्ते बांधणीत  एकल वापाराच्या प्ल‍ास्टिक /बहु-स्तरित प्लास्टिकच्या वापरासाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकसहभागावर असणे गरजे आहे.

एकल वापराच्‍या प्लास्टिक  बंदीचा  आणि अंमलबजावणीचा संदेश पुढे नेण्यासाठी गट चिह्नित केले  जावेत  आणि त्यांच्याशी संलग्न केले जावे. इतरांनाही  एकल वापराचे  प्ला‍स्टिक  उपयोगामध्ये आणू नये, म्हणून  प्रोत्साहन देण्यासाठी स्‍थानिक संस्‍थांनी  नागरिकांना प्लॅस्टिक कचरा न टाकण्याची आणि प्लास्टिकला डंपिंगमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यास प्रोत्साहित करता येईल. तसेच प्रसार माध्‍यमे  किंवा सामाजिक  नेटवर्क्समध्ये चांगल्या वर्तनाविषयी  प्रसिद्धी  करण्यासाठी बक्षीस मोहीम राबविण्‍यात येणार आहे. या सर्व उपक्रमांची नोंद राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि स्‍थानिक स्‍वराज्य संस्‍थांद्वारे दस्तऐवजासाठी तपशीलवार कार्यपद्धतीनुसार करण्‍यात यावी. तसेच सर्वोच्च स्तरावर देखरेखीसाठी अहवाल सादर करण्‍याची सुचना देण्‍यात आली आहे. 

गृहनिर्माण आणि शहर व्‍यवहार मंत्रालयाच्यावतीने स्वच्छ भारत मिशन शहरी, राबविण्यात येत आहे. देशातील सर्व  शहरांमध्ये सर्वसमावेशक स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन उपायांद्वारे "कचरामुक्त शहरे" तयार करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घेतली खासदार शाहू महाराज छत्रपतींची भेट, स्वागतासाठी सतेज पाटलांसह समरजित घाटगे हजर
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.