एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कामाला उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो लावा, सुस्त अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी झापलं

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी कामांना उशीर करणाऱ्या तसेच टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. गडकरी म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी कामाला उशीर केला आहे, त्यांचे फोटो 12 वर्षांपर्यंत त्या इमारतीत लावायला हवेत.

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी कामांना उशीर करणाऱ्या तसेच टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं आहे. गडकरी यांनी नवी दिल्लीतील एका व्हर्चुअल कार्यक्रमात  भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (NHAI) मधील सुस्त कामावरुन अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले.  द्वारका येथील NHAI च्या नव्या इमारतीचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे उद्घाटन केल्यानंतर  गडकरी म्हणाले की, ज्या अधिकाऱ्यांनी कामाला उशीर केला आहे, त्यांचे फोटो 12 वर्षांपर्यंत त्या इमारतीत लावायला हवीत.

सुस्त कामामुळं 9 वर्षांनंतर पूर्ण झाला प्रोजेक्ट- गडकरी यावेळी गडकरी म्हणाले की, एनएचएआय सुधारणा होण्याची अत्यंत गरज आहे. आता त्या नॉन परफॉर्मिंग एसेट्स (काम न करणारे अधिकारी) यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे. ते गोष्टींना किचकट बनवतात आणि अडचणी निर्माण करतात, असं गडकरी म्हणाले. ते म्हणाले की,  50 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट 2008 मध्ये तयार केला होता. याचं टेंडर 2011 मध्ये निघालं आणि आता नऊ वर्षांनी हे काम पूर्ण झालं. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, एनएचआयमधील अकर्मण्य, कामचुकार आणि भ्रष्ट लोक इतके पावरफुल आहेत की मंत्रालयानं सांगितल्यानंतर देखील ते आपले निर्णय चुकीचे घेतात. अशा ‘अक्षम' अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे. गडकरी म्हणाले की, इमानदार अधिकाऱ्यांना ताकद देण्याची गरज आहे, अन्यथा ते निर्णय घेऊ शकणार नाहीत. वेळेवर पूर्ण होणाऱ्या प्रकल्पांमुळं भारत आत्मनिर्भर होईल- गडकरी नितीन गडकरी म्हणाले की, वेळेवर पूर्ण होणाऱ्या गुणवत्तापूर्ण चांगल्या प्रकल्पांमुळंच आत्मनिर्भर भारताचे लक्ष्य प्राप्त होऊ शकेल. तसेच ते म्हणाले की,   पर्यावरण मंजूरी मिळणे मोठी समस्या आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Health :  एकनाथ शिंदें आजारी; डाॅक्टरांचा विश्रांतीसाठी सल्लाEVM Special Report : उमेदवारांचा डंका ; ईव्हीएमवर शंकाMahayuti Special Report : एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, अजित पवारांनी सांगितला फाॅर्म्युलाTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
विधानसभेतील विजय म्हणजे निवडणूक आयोग अन् भाजपनं मिळून केलेल्या पापाचं फळ; नाना पटोलेंचा घणाघात
Nagpur Crime: मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मध्यरात्री घरात घुसून फोडून काढलं, जखमी तरुणाला पहिल्या मजल्यावरून फेकणार तोच..
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
"कामाच्या बहाण्यानं घरी बोलावलं आणि बेडरुममध्ये..."; बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्यावर लैंगिक छळाचा आरोप, FIR दाखल
Embed widget