(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MiG-21 Fighter Jet Crash: राजस्थानच्या बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले, 2 पायलट शहीद
MiG-21 Fighter Jet Crash: राजस्थानमधील बारमेरमध्ये भारतीय हवाई दलाचे मिग-21 विमान कोसळले असल्याची बातमीस समोर येत आहे.
MiG-21 Fighter Jet Crash: राजस्थानमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. बाडमेरमध्ये मिग-21 विमान कोसळले आहे. हवाई दलाच्या मिग-21 मध्ये दोन पायलट होते. हा अपघात इतका भीषण होता की, मिग विमानाचा ढिगारा अर्धा किलोमीटर दूर पसरला होता. हा अपघात बारमेरच्या भीमडा गावात झाला आहे. अपघातापूर्वी मिग-21 हे विमान भीमडा गावाभोवती फिरत होते. सध्या अपघाताचे कारण समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्यासह हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. या अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्याशी चर्चा केली आहे. हवाई दल प्रमुखांनी त्यांना या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे.
Rajasthan | A MiG-21 fighter aircraft of the Indian Air Force crashed near Barmer district. Further details awaited pic.twitter.com/egJweDNL4a
— ANI (@ANI) July 28, 2022
या अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा अपघात झाला त्या ठिकाणी ढिगाऱ्याभोवती अनेक लोक जमा झाले आहेत. दरम्यान, मिग-21 कोसळल्याची प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. गेल्या वर्षी बाडमेरमध्ये प्रशिक्षणादरम्यान एक मिग-21 विमान कोसळले होते. या अपघातात सुदैवाने पायलट सुखरूप बाहेर पडले. यापूर्वी 21 मे 2021 रोजी पंजाबमधील मोगा येथे मिग-21 विमान कोसळले होते. यामध्ये पायलट अभिनव शहीद झाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
आता 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बनवा मतदार ओळखपत्र, वर्षातून चार वेळा नोंदवता येणार नाव, निवडणूक आयोगाचा निर्णय
सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यांत वाद, सुप्रिया सुळेंची वेळीच मध्यस्ती; लोकसभेत नेमकं काय घडलं?
In Pics : बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा उद्घाटन सोहळा, पंतप्रधान मोदींचा स्पेशल साऊथ इंडियन लूक, पाहा सोहळ्याचे खास फोटो