Mia Khalifa | मिया खलिफाचं पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनावर ट्वीट
माजी अडल्ट स्टार मिया खलिफाने शेतकरी आंदोलनावर पुन्हा एकदा ट्वीट केलं आहे.
नवी दिल्ली : लेबनीज-अमेरिकन मीडिया पर्सनॅलिटी आणि माजी अडल्ट स्टार मिया खलिफा हिने भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे समर्थन केल्यापासून तिला ट्रोल करण्यात येत आहे. काही जणांनी तर पैसे घेऊन ट्विट करत असल्याचा आरोप केला आहे.
या ट्रोलिंगचा मिया खलिफावर काहीही परिणाम झाला नसून शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ती सतत ट्विट करत आहेत. एका ट्विटमध्ये तिने ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत ट्विट करत राहणार असल्याचं तिने सांगितलंय.
मिया खलिफाने अमेरिकन अभिनेत्री अमांडा सर्नी यांचे ट्विट रिट्वीट करताना हे ट्विट केले आहे. खरं तर, मिया खलिफाप्रमाणेच अमांडा सर्नी यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे. यावरुन सोशल मीडियावर अमांडाला लक्ष्य केलं जात आहे.
We will keep tweeting until we’re paid!!!! #MAKETHISANAD https://t.co/Ra1udiStju
— Mia K. (@miakhalifa) February 6, 2021
अमांडा सर्नी यांचे ट्रोलर्सला उत्तर "हे ट्रोलिंग फक्त त्रास देण्यासाठी आहे, मला बरेच प्रश्न आहेत.. कोण मला पैसे देत आहे? मला किती पैसे मिळतात? मी माझं बिल कुठे पाठवू? मला पैसे कधी मिळतील? मी बरेच ट्विट केले आहेत. मला अतिरिक्त पैसे मिळतील का?" असे चोख प्रत्युत्तर अमांडा सर्नी यांनी ट्रोलर्सला दिलं आहे.
मिया खलिफाने अमांडाच्या ट्वीटला उत्तर देताना लिहिले की, "पैसे येईपर्यंत आम्ही ट्विट करत राहू."
शेतकरी आंदोलनाला पॉप स्टार रिहाना आणि पर्यावरणीय कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्यासह अनेक परदेशी सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे.
Sachin Tendulkar on Farmer Protest: शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर यांचे ट्वीट..
काय आहे प्रकरण?
शेतकरी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन जवळपास 72 दिवसांपासून सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी परदेशी कलाकारदेखील पुढे आले आहेत. मंगळवारी गायिका रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्विट केले आहे. माजी पोर्न स्टार मिया खलिफानेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. हा विषय जागतिक सेलिब्रिटींनी उपस्थित केल्यानंतर आता देशातून याला विरोध होत आहे. हा प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा असून यावर भारतीयांनाच बोलण्याचा अधिकार असल्याचे ट्वीट केले जात आहे.