एक्स्प्लोर

परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांचा राजीनामा

#MeToo मोहीमेअंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर एमजे अकबर पायउतार झाले.

नवी दिल्ली : परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी अखेर राजीनामा दिला आहे. #MeToo मोहीमेअंतर्गत लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर एमजे अकबर पायउतार झाले. एमजे अकबर यांच्याविरुद्ध 19 महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. "न्यायदेवतेच्या मंदिरात राहून न्याय मागायचा ठरवल्याने मी या पदावरुन पायउतार होत आहे. जेणेकरुन माझ्याविरुद्ध लागलेल्या खोट्या आरोपांना आव्हान देणं योग्य ठरेल," असं एमजे अकबर यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे. परराष्ट्र राज्यमंत्री एमजे अकबर यांचा राजीनामा 97 वकिलांची फौज लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्याविरोधात अकबर यांनी 97 वकिलांची फौज उभी केली आहे. प्रिया रमानी यांच्याविरोधात अकबर यांनी सोमवारी (15 ऑक्टोबर) पटियाला हाऊस कोर्टात वैयक्तिक अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. प्रिया रमानींनी जाणीवपूर्वक आणि चुकीच्या भावनेने आरोप केले आहेत, असा आरोप करत एमजे अकबर यांनी करनजावाला अँड कंपनी या लॉ फर्मच्या माध्यमातून पटियाला हाऊस कोर्टात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणारी याचिका दाखल केली आहे. अब्रुनुकसानीचा दावा ठोकणाऱ्या एम. जे. अकबर यांच्याबाबत बोलताना, प्रिया रमानी म्हणाल्या, "मी प्रचंड निराश आहे, कारण महिलांकडून झालेल्या आरोपांना केंद्रीय मंत्री राजकीय कट असल्याचं म्हणत फेटाळत आहे. माझ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करुन अकबर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीय." काय आहे प्रकरण? पत्रकार प्रिया रमानी यांनी एम.जे.अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. एम जे अकबर यांचं पत्रकारिता क्षेत्रात मोठं नाव आहे. त्यांचं नाव, सन्मान आणि कार्यामुळे त्यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता पत्रकार प्रिया रमानी यांनी शोषणाचे आरोप केल्याने माध्यम आणि राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोण आहेत प्रिया रमानी? प्रिया रमानी या मोठ्या कालावधीपासून माध्यमांमध्ये काम करत आहेत. इंडिया टुडे, इंडियन एक्स्प्रेस इत्यादींसोबत त्यांनी काम केले असून, रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेतही त्यांनी काम केले आहे. कॉस्मोपॉलिटन या आंतरराष्ट्रीय फॅशन मॅगझिनच्या प्रिया रमानी या संपादिकाही राहिल्या आहेत. 'मिंट'च्या फीचर संपादकही त्या होत्या. तसेच, प्रकाशन व्यावसायातील प्रसिद्ध अशा 'जगरनॉट'चं संपादकपदही त्यांनी भूषवलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Embed widget