दिलासादायक! मान्सूनचा अद्ययावत दीर्घकालीन अंदाज जाहीर, देशात कसं असणार पाऊसमान?
भारतीय हवामान विभागानं (IMD) नैऋत्य मोसमी (मान्सून) पाऊस 2024 च्या हंगामासाठी (जून ते सप्टेंबर) अद्ययावत दीर्घकालीन अंदाज केलाय. देशात नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीच्या 106 टक्के राहण्याची शक्यता आहे.
India Rain News : भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) नैऋत्य मोसमी (मान्सून) पाऊस 2024 च्या हंगामासाठी (जून ते सप्टेंबर) अद्ययावत दीर्घकालीन अंदाज केलाय. नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon) देशभरात सरासरीच्या 106 टक्के राहण्याची शक्यता आहे. 2024 मधील मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशभरात पाऊसमान बहुधा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने 2024 च्या नैऋत्य मोसमी (मान्सूनच्या) पावसाच्या हंगामाबाबतच्या (जून ते सप्टेंबर) दीर्घकालीन अंदाजामध्ये सुधारणा केली आहे. नवी दिल्लीत दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या वार्ताहर परिषदेत विभागाने जून 2024साठी मासिक पाऊसमान आणि तापमानाचे भाकित देखील जारी केले आहे. हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय मोहपात्रा यांनी हा अंदाज सादर केलाय.
दीर्घकालीन अंदाजाची वैशिष्ट्ये काय?
- प्रमाणानुसार नैऋत्य मोसमी पाऊस देशभरात ± 4% मॉडेल त्रुटीसह दीर्घकालीन सरासरीच्या 106 टक्के राहण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे 2024 मधील मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) देशभरात पाऊसमान बहुधा सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.
- मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतावर मान्सूनचा पाऊस सामान्य सरासरीपेक्षा जास्त(>106 टक्के of LPA) राहण्याची आणि वायव्य भारतावर सामान्य (92-108 टक्के of LPA) आणि ईशान्य भारतात सामान्यपेक्षा कमी (<94% टक्के of LPA) राहण्याची शक्यता आहे.
- देशातील बहुतांश पावसावर आधारित कृषी क्षेत्रांचा समावेश असलेल्या मान्सूनच्या गाभा क्षेत्रामध्ये (MCZ) नैऋत्य मोसमी हंगामाचा पाऊस बहुधा सामान्यपेक्षा जास्त (>106 टक्के of LPA) राहण्याची शक्यता आहे.
- जून महिन्यात दक्षिणी द्वीपकल्पीय भाग वगळता देशाच्या बहुतेक भागात मासिक कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, तर दक्षिणी द्वीपकल्पीय भागात सामान्य ते सामान्य तापमानापेक्षा कमी तापमान असणार आहे.
एल निनोची स्थिती अतिशय वेगाने कमकुवत होतेय
या वर्षाच्या प्रारंभी कटिबंधीय प्रशांत क्षेत्राच्या वर आढळलेली भक्कम एल निनो स्थिती अतिशय वेगाने कमकुवत होत जाऊन कमकुवत एल निनोमध्ये रुपांतरित झाली आहे आणि सध्या एनसो तटस्थ स्थितीत संक्रमित होत आहे. मान्सून हंगामाच्या प्रारंभी एनसो तटस्थ स्थिती प्रस्थापित होणार असल्याचे आणि मान्सून हंगामाच्या नंतरच्या काळात ला निना स्थिती विकसित होण्याची शक्यता ताज्या हवामान भाकिताच्या मॉडेलमधून सूचित होत आहे. दरम्यान, जुलै महिन्याच्या पाऊसमानाचा आगाऊ अंदाज हवामान खात्याकडून जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जारी करण्यात येणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. .
महत्वाच्या बातम्या:
मुंबई-पुणेकरांसाठी सुखावणारी बातमी, उकाड्यापासून मिळणार दिलासा, 'या' जिल्ह्यात पडणार धो-धो पाऊस
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















