मुंबई-पुणेकरांसाठी सुखावणारी बातमी, उकाड्यापासून मिळणार दिलासा, 'या' जिल्ह्यात पडणार धो-धो पाऊस
आज मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज मुंबई आणि पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे.
Maharashtra Weather News : देशात मान्सूनसाठी (Monsoon) पोषक वातावरण तयार झालं आहे. 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये (Keral) दाखल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. दरम्यान, आज मुंबई आणि पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आज मुंबई आणि पुणेकरांची उकाड्यापासून सुटका होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिली आहे. 1 ते 5 जूनदरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
1 ते 5 जूनदरम्यान 'या' भागात जोरदार पावसाची शक्यता
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पावसाच्या शक्यता आहे. 1 ते 5 जूनदरम्यान राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबईसह कोकण, मराठवाडा 1 ते 5 जूनदरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी ओढे नदी नाले वाहतील असा अंदाजही डख यांनी वर्तवला आहे. त्यामुळं आता या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
दरम्यान, मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार याबाबतची माहिती देखील पंजाबराव डख यांनी दिली आहे. 8 जूननंतर राज्यात मान्सून दाखल होणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे. पण त्यापूर्वीच 1 ते 5 जूनदरम्यान राज्यात चांगल्या पावसाचा इशारा पंजाबराव डखांनी दिला आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे.
या जिल्ह्यात कोसळणार जोरदार पाऊस
सुरुवातीला राज्यातील सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद,लातूर, बीड परभणी, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, नांदेड, संगमनेर, नाशिक, जालना, यवतमाळ, धुळे जळगाव या भागात 1 ते 5 जूनदरम्यान जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. पश्चिम विदर्भात देखील चांगा पाऊस पडणार असल्याची माहिती डखांनी दिली आहे. तर पू्र्व विदर्भात देखील 6 7 9 जून दरम्यान चांगला पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. दरम्यान, या पावसाच्या आगमनापूर्वी शेतकऱ्यांची त्यांची सर्व शेतीकामे उरकून घ्यावीत, तसेच वादळी वाऱ्याच्या बाहेर पडू नये अशा काळात योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहान प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
मान्सून प्रगतीपथावर! 31 मे रोजी केरळमध्ये तर महाराष्ट्रात कधी? हवामानाचा अंदाज काय?